वाचलेले ऐकलेले : ओरहानचा कालप्रवास आणि संस्कृतिसंघर्ष !!! (My Name is Red) १
Submitted by अनिह on 7 August, 2023 - 04:56
तुर्कस्थान हा तसा एका मोक्याच्या जागचा देश. त्याच्या आधीच्या राजधानी इस्तंबूलचा एक भाग युरोपमध्ये तर दुसरा आशियामध्ये एवढं सांगितलं तरी बस आहे. त्यामुळे तिथे इस्लामी/आशियायी आणि युरोप या दोन्ही संस्कृतीचं अस्तित्व जाणवत. तुर्कस्थान मुस्लिम बहुल देश आहे त्यामुळे त्याची मुस्लिम/आशियायी प्रकृती त्यातील धर्म समाजकारण राजकारण कला यांनी स्थापित केलेली जगण्यातली आणि कलात्मक मूल्ये आणि जवळीकीमुळे युरोपातून येऊन आदळणार्या वैचारिक, कलात्मक, आणि सांस्कृतिक लाटा याच्या घुसळणीत हा देश विशेषतः इस्तंबूल सतत गोंधळलेल्या अवस्थेत असते .
विषय: