साहित्य

⚔️⚔️डेथ बाय थाऊसंड कटस्...!!!⚔️⚔️ भाग 2

Submitted by मधुरा कुलकर्णी on 17 April, 2023 - 11:04

भाग १
https://www.maayboli.com/node/83282

प्रकरण २:- रिटर्न्स

स्थळ :- ABC न्यूज ऑफिस
वेळ :- रात्रीचे ०९:१५

विषय: 

⚔️⚔️डेथ बाय थाऊसंड कटस्...!!!⚔️⚔️. भाग १

Submitted by मधुरा कुलकर्णी on 16 April, 2023 - 11:41

प्रकरण १:- पास्ट इज प्रॉलोग्

         निरभ्र, मोकळं, निळशार आकाश, अधून मधून डोकावणारे ढगांचे पांढरे पुंजके, दूरवर पसरलेला तो निळा-पांढरा पट्टा, मधूनच डोकावणारा एखादा चुकार सोनेरी किरण, हळूच एका इमारतीमागून दर्शन देणारा, लालबुंद झालेला, मावळतीच्या दिशेने अस्ताला जाणारा सूर्य, संध्याकाळची वेळ होत असल्याने आपापल्या घरी परतणारे एकटे दुकटे कधी थव्याने परतणारे पक्षी आणि आसमंतात भरून राहिलेली निःशब्द पण तरी हवीहवीशी शांतता ...

विषय: 

मी वाचलेलं पुस्तक : केतकर वहिनी

Submitted by अनया on 6 April, 2023 - 08:06

मी वाचलेलं पुस्तक : केतकर वहिनी
लेखिका : उमा कुलकर्णी
प्रकाशक : मेहता पब्लिशिंग हाउस

लोकभ्रम- गूढचिकित्सामंडळ

Submitted by प्रकाश घाटपांडे on 5 April, 2023 - 04:02

मला माझ्या ज्योतिषछंद जोपासताना एक वाईट सवय आहे. एखाद्या संदर्भ वा माहिती साठी त्याच्या मागे हात धूवुन लागण्याची. तसे ही अनुत्तरीत प्रश्न मला अस्वस्थ करतात त्यामुळॆ मी त्या प्रश्नांच्या मागे लागतो. . तेव्हा मी मुंबईला नोकरीला होतो. मी पॅंटच्या मागच्या खिशात एक छोटी डायरी ठेवत असे. त्यात मी माहिती, संदर्भ असे संकीर्ण टिप्पण ठेवत असे.ग्रंथालयात गेलो वा एखाद्या भाषणाला गेलो व तिथे काही दुर्मिळ माहिती मिळाली की मी ती डायरीत लिहित असे. अगदी आता आता पर्यंत ती सवय होती. मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयात जुने ग्रंथ चाळताना एकदा मला रा.ज.

भेट

Submitted by किरण कुमार on 6 March, 2023 - 11:12

(वृत्त - मालिनी , अक्षरगणवृत्त ,१५ अक्षरे , गण - न न म य य,
यती ८ व्या अक्षरावर )

सजल नयन झाले पाहताना तुला मी
अधर अधिर होते पत्कराया गुलामी
भरभर कर माझे चुंबताना जराशी
थरथर मन हे का खेटताना उराशी

प्रहर उलटला तो पांघरोनी नभाला
अवखळ रजनी ही येतसे स्वागताला
सहज हसत तेंव्हा तू मिठी मारताना
नितळ दगड झालो प्रेम हे पेलताना

बिलगुन बस आता मागणे फार नाही
वचन शपथ मिथ्या अंतरीचे बोल काही
शितल पवन येई प्रेम हे पेटवाया
सृजन समय आला आपुली भेट व्हाया

- किरण कुमार

इतस्ततः

Submitted by रंगारी on 18 February, 2023 - 02:43

आजकालपासून – किंवा असं म्हणता येईल की कालपरवापासून – सामाजिक स्थितीमुळे आपल्या वैयक्तिक जीवनातील कोणत्याही कृतीत बेगडीपणा घुसून जणू काही मुरून बसलाय. हा बेगडीपणा हल्ली इतका सामान्य झालाय की कोणी ‘सामान्य’ वागला तर तोच इतरांना ‘बेगडी’ वाटायचा! इतरांना सामान्य वागणं वेगळेपणाचं वाटेल की नाही ते मला निश्चित सांगता यायचं नाही; पण सामान्य वागण्याला ‘मागास’ समजण्याची नवीन रीत निर्माण झाली आहे. हा सुद्धा आपल्या सामाजिक व्यवस्थेचा दुष्परिणाम आहे, असे ना का! आपण पुन्हा बेगडीपणाकडे वळूयात.

Pages

Subscribe to RSS - साहित्य