बर्याच दिवसांनी दोघींना मोकळा वेळ मिळाला होता. नाही म्हटले तरी काही वर्षे लोटली होती. पूलाखालुन बरेच पाणी वाहून गेले होते. अचानक एकीचे लक्ष तिकडे गेले. अरे हे काय .......
तिच्या घशाला कोरड पडली, हात-पाय थरथरू लागले,पोटात गोळा आला.
हे बघून आश्चर्याने दुसरी पुढे झाली आणि तिच्या डोळ्यासमोर अंधारीच आली. शेजारच्या भिंतीला हात धरून ती कशी-बशी बसली आणि तिने घटाघटा पाणी प्यायलं.
ठार बहिर्या सासूबाईंना ऐकायला जाणार नाही म्हणून दोघी जावा बिनधास्त इतका वेळ उखाळ्या-पाखाळ्या काढत होत्या. तिथेच सासूबाई त्यांचं कानाचं भारीतील नवीन यंत्र घालून शांतपणे रेडिओ ऐकत बसल्या होत्या.
बर्याच दिवसांनी दोघींना मोकळा वेळ मिळाला होता. नाही म्हटले तरी काही वर्षे लोटली होती. पूलाखालुन बरेच पाणी वाहून गेले होते. अचानक एकीचे लक्ष तिकडे गेले. अरे हे काय .......
एक खडखड वाजणारी निळी सनी गेटमधून आत येत होती. २०२२ मधे कोणी सनी चालवत असेल या गोष्टीचं फिसक्कन हसूच आलं सीमाला.
टेरेसमधे थोडं पुढे जाऊन तिने बघितलं आणि तिच्या काळजाचा ठोकाच चुकला.
तेवढ्यात मुग्धा पुढे आली आणि म्हणाली “अगं, हा समीर, माझा नवरा”.
सीमाच्या चेहर्यावरचे विचित्र भाव पाहून ती पुढे म्हणाली “अगं, हा दर १४ फेब्रुवारीला त्याची जुनी-पानी सनी चालवायला बाहेर काढतो”
बर्याच दिवसांनी दोघींना मोकळा वेळ मिळाला होता. नाही म्हटले तरी काही वर्षे लोटली होती. पूलाखालुन बरेच पाणी वाहून गेले होते. अचानक एकीचे लक्ष तिकडे गेले. अरे हे काय! मैत्रिणीच्या घरातल्या टीपॉयवर पडलेल्या वर्तमानपत्राने तिचे लक्ष वेधून घेतले. कुठलीही खाडाखोड न करता अतिशय सुवाच्य अक्षरात सोडवलेले शब्दकोडे आणि त्याखाली ठोकलेली लफ्फेदार सही!
सोडवलेल्या शब्दकोड्याखाली स्वताची सही करण्याची जगावेगळी सवय असणारा जगात अजुनही कुणीतरी आहे याचे आश्चर्य वाटून डोळ्यावरची चाळिशी सांभाळत ती उठली.
#बेस्टफ्रेंड
ती आणि तो एकाच वर्गात शिकत होते. शेजारी घरे असल्याने एकत्र शाळेत जाणे येणे आलेच!तिच्या आईने तिला शाळेत नेण्याची आणि आणण्याची जबाबदारी तिच्या नकळत त्याला दिली होती आणि त्याने ही ती सहर्ष घेतली होती.त्यांच्या ही नकळत ते बेस्टफ्रेंड झाले.
काळपुढे सरकत होता. ती पायाने लंगडत पुढे पळायची आणि तो तिच्यामागे तिची मात्र चिडचिड व्हायची.
“धडधाकट मुलगा असून मुंगीच्या पायाने चालतोय?”
तो मात्र गालात हसायचा आणि मनात बोलायचा
“मी तर तुझ्यापुढे धावू शकतो पण बेस्टफ्रेंड आहे ना तुझा म्हणून तुझ्यामागे असतो.”
सध्या माझा मूडही नव्हता,की मी भुयारात उतरेन. इतका वेळ मला काळजी वाटली नाही.पण आता कानविंदेंपासून भीती वाटू लागली.. पोलीस लोक काय करतील सांगता येत नाही.माझ्या बोलण्याचा मला अजिबात पश्चात्ताप वाटतं नव्हता. मला जाम भूक लागली होती.अचानक काल आणलेल्या ब्रेडची आठवण झाली.मी उघडल्यावर दोनच स्लाइस दिसल्या.उरलेल्या श्रीकांतने खाल्ल्या असतील.मी स्लाइस भाजल्या . कांदे बटाट्याची भाजी बनवली आणि सॅन्डविच बनवून खाल्लं.तेव्हा बरं वाटलं.मग हॉलमध्ये येऊन बसलो. लीनाला जाऊन बरेच महिने झाले होते.जेवताना झोपताना तिच्या आठवणीशिवाय एकही दिवस गेला नाही.सारखी जेवणं बनवायला मी सुद्धा कंटाळलो होतो.
मी चिडून म्हणालो," सगळ्यांनी मिळून जुडेकरच्या बाबतीत मलाच टार्गेट करायचं ठरवलंय का? " मग तो थोडा समजावणीच्या सुरात म्हणाला,"तू थांबवलं असतंस तरी तो थांबला नसता. जरी रजा दिली नसतीस तरी तो गेलाच असता. त्यात तुझाही दोष नाही म्हणा. "....मी थोडा नरमाईने म्हणालो " चल, जेऊन घेऊ या". जेवणाच्या टेबलावर बसता बसता,मी उद्या भुयारातून चर्चच्या भागात जायचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले, तेव्हा त्याला बरं वाटलेलं दिसल़ं. त्याला नवीन काहीतरी करायला आवडत हे मला माहीत होतं.जेवणं होऊन टीव्ही बघेपर्यंत दहा वाजायला आले. आम्ही हॉलमधेच बिछाने घातले.त्याला मधेच काहीतरी आठवून त्याने त्याची बॅग उघडली.