चिरुमाला (भाग १७)
Submitted by मिरिंडा on 17 July, 2022 - 05:07
सध्या माझा मूडही नव्हता,की मी भुयारात उतरेन. इतका वेळ मला काळजी वाटली नाही.पण आता कानविंदेंपासून भीती वाटू लागली.. पोलीस लोक काय करतील सांगता येत नाही.माझ्या बोलण्याचा मला अजिबात पश्चात्ताप वाटतं नव्हता. मला जाम भूक लागली होती.अचानक काल आणलेल्या ब्रेडची आठवण झाली.मी उघडल्यावर दोनच स्लाइस दिसल्या.उरलेल्या श्रीकांतने खाल्ल्या असतील.मी स्लाइस भाजल्या . कांदे बटाट्याची भाजी बनवली आणि सॅन्डविच बनवून खाल्लं.तेव्हा बरं वाटलं.मग हॉलमध्ये येऊन बसलो. लीनाला जाऊन बरेच महिने झाले होते.जेवताना झोपताना तिच्या आठवणीशिवाय एकही दिवस गेला नाही.सारखी जेवणं बनवायला मी सुद्धा कंटाळलो होतो.