यावर्षीचे दिवाळी अंक प्रकाशित व्हायला सुरवात झाली आहे. कोणते अंक घेतले, घ्यायचे आहेत आणि वाचले याबद्दल चर्चा करायला हा धागा.
नेहेमीप्रमाणे यावर्षी सुद्धा बऱ्याच मायबोलीकरांचे साहित्य दिवाळी अंकांमध्ये असेल / आहे. त्याची सुद्धा इथे माहिती द्यावी.
पांडूबाबा आमच्या वाडीतील सगळ्यात जुना माणूस. जुना म्हणजे इतका जुना कि त्याच्यासमोरची लहान लहान मुलं आता म्हातारी झालेली. हाता-पायाची कातडी लोंबू लागलेली, दातांनी तोंडाचा केव्हांच निरोप घेतलेला. त्यामुळे गालाला जिथे खळी पडते, तिथं खड्डा पडलेला. भाकर खाताना सुद्धा त्याला डाळीत कुसकरून खावी लागायची.
एकदा मी सहज त्याला विचारलं," बाबा, तुझं वय किती?"
माझा प्रश्न ऐकून तो जरा विचारात पडल्यासारखा दिसला. नंतर," तुझ्या पणज्याचं वय किती?" हा प्रश्न विचारून मलाच कोड्यात टाकलं.
पुलाखालून वाहून गेलेले पाणी
एका रम्य सकाळी शहरातील पाॅश एरीया मयलापूरात चहा पिनारे काही अभिजन तरूण ऊत्साहात दिसत होते. ते सामान्य तरूण नव्हतेच. एक कचेरीत प्रतिष्ठीत वकील होता, एक “द हिंदू”तील प्रथम स्तंभलेखकात होता, एक सिवील सर्वंट होता, एक रिअल ईस्टेट मालक, एक प्रोफेसर. हा ईंग्रजींच्या तालमीत तयार झालेल्या काही ब्राम्हण तरूणांचा घोळका होता जे समजायचे की ह्या देशाच्या भविष्याची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आहे. तसंच जसं पुणे-मुंबई आणी कलकत्त्यातील ऊच्चभ्रू सवर्णांना वाटायचं. हा भारताचा ताजा एलीट क्लब होता, जो मॅकालेवादी ईंग्रजी शिक्षणाच्या पायावर ऊभा होता. रक्ताने भारतीय विचारांनी ईंग्रज.
आठवण
--------
बर्याच दिवसांनी दोघींना मोकळा वेळ मिळाला होता . नाही म्हणलं तरी काही वर्षं लोटली होती. पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं होतं. अचानक एकीचं लक्ष तिकडे गेलं. अरे, हे काय ? ...
नदीच्या विस्तीर्ण पात्रात काही बोटी डौलाने फिरत होत्या .
एक बोटीत तो होता . भडक फॅशनचे कपडे घातलेला . त्याने एक पेडल बोट घेतली होती . टू सीटर . त्याच्याबरोबर एक तरुणी होती . तीही भिरभिरीच ! दोघेही एकमेकांशी हसून , स्पर्शून बोलत होते .
सुखकर्ता दु:खहर्ता वार्ता विघ्नाची,
नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची
सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची
कंठी झळके माळ मुक्ता फळांची..
बर्याच दिवसांनी दोघींना मोकळा वेळ मिळाला होता. नाही म्हटले तरी काही वर्षे लोटली होती. पूलाखालुन बरेच पाणी वाहून गेले होते. अचानक एकीचे लक्ष तिकडे गेले. अरे हे काय .....
तिसरी आज इतक्यात?
तशा त्या रोजच भेटतात. मोकळा वेळ वगैरे शब्दांचे बुडबुडे! अंधार पडला की अनादि कालापासून रंगणारा खेळ सुरू!
अरे, चौथी पण आली, पाचवी, सहावी...
बर्याच दिवसांनी दोघींना मोकळा वेळ मिळाला होता. नाही म्हटले तरी काही वर्षे लोटली होती. पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले होते. अचानक एकीचे लक्ष तिकडे गेले. अरे हे काय .......
"इतक्यात तिसरीही आली?!" ती चकित होऊन उद्वेगाने म्हणाली.
"माझी जुळी बहीण आहे ती." दुसरी खिन्नतेने म्हणाली.
"म्हणजे दोघींबद्दलही कळतं का त्यांना?" पहिलीने इवलुसा प्रश्न विचारला.
"हो! आता सगळंच कळतं आधीच ताई!" तिसरी शांतपणे म्हणाली.
"काय तरी बाई एकेक नवीन! आमच्या वेळी असलं काही नव्हतं!" पहिली उद्गारली.
"पण मग तुला कसं इकडे आणलं?"
"माझ्या नशिबात दूध होतं गं बाई!"