अंमली! - भाग ७

Submitted by अज्ञातवासी on 31 January, 2023 - 12:14

याआधीचा भाग

https://www.maayboli.com/node/82918

त्या आलिशान फ्लॅटमध्ये तो बसला होता.
समोर ऐंशी इंची टीवी बघत.
मोठा मऊमऊ यू शेप रिक्लायनर स्टाईलचा सोफा.
आणि शेजारीच ती.
"मला असं वाटतं, तुला कुठेतरी मी बघितलंय."
तो हसला.
"तू मला खूपदा बघितलंय, स्विफ्ट चालवताना, माझ्या समोरून जायचीस."
"सॉरी डार्लिंग."
"नो सॉरी, तुझी काहीही चूक नाही."
"तरीही मला शिक्षा द्यावी, असं वाटतंय ना?"
"हो!"
"मग दे, मी तुझीच आहे..."
"त्याने तिचे केस जोरात ओढून मान वर केली, आणि ओठावर ओठ टेकवले..."
मानस भाऊराव नागरे.
उर्फ एमएन...
अतिशय यशस्वी आणि तितकाच यंग उद्योगपती.
नागरे केमिकल्स. फक्त तीन महिन्यात ह्या कंपनीने प्रचंड नफा कमावला होता.
चक्क हजार टक्क्यांपर्यंत नेट मार्जिन कंपनी उचलत होती. हळूहळू पैसा व्हाईट होत होता, पण त्याहीपेक्षा पैशांचा ओघ वाढत होता.
मानस नागरे हा हळूहळू शिखरावर चालला होता. एक एक दमदार पाऊल टाकत होता.
आता ती त्याच्या मिठीत होती.
"बेबी, तू माझ्यात काय बघितलंस?"
"खरं सांगू?"
"हो..."
"तुझा माज, गर्व, ताठा, अहंकार."
ती चरकली.
"घाबरु नकोस. जेव्हा तू स्विफ्ट चालवताना माझ्याकडे बघून रोल्स रॉइसचा आव आणायची ते मला आवडलं. माझं एक छोटंस स्वप्न होतं, फक्त तू माझी व्हावीस."
"मग मी आहे ना, तुझीच."
"आता माझं ते स्वप्न नाही. माझं जग खूप मोठं आहे, आणि त्यात तू कुठेही नाहीस."
"मग मला का आणलस इथे?" ती रागावून म्हणाली.
"आत्मविश्वास कमावण्यासाठी."
"म्हणजे?"
"तुला नाही कळणार, आणि स्वतःला इतकं स्पेशल समजू नको. सरळ व्यवहार आहे. तू ते साधं कोकेन घेत होती ना, माझ्याकडे मेथ आहे. हे बघ."
त्याने एक पुडी तिच्याकडे फेकली.
तिचे डोळे लकाकले.
"आणि तुला काय हवंय माझ्याकडून?"
"मी जेव्हा म्हणेल, तेव्हा इकडे यायचं, आणि मी जे म्हणेल, ते करायचं. तुला जे हवं, ते मी देईन. साधा सरळ व्यवहार. जबरदस्ती नाही."
ती विचारात पडली.
...आणि गोड हसली.
...मानसही हसला, आणि तिच्यावर झेपावला.
******
कधीकधी एखादा छोटासा प्रसंग तुमचं आयुष्य बदलून टाकतो.
एखादी व्यक्ती महान व्हायला वेळ लागत नाही, पण ती सोबतीला असलेल्या सर्व लोकांचं आयुष्य बदलवून टाकते.
बघा ना, साधा अकाऊंटट असलेला हेमंत आज चीफ फायनांशियल ऑफिसर झाला होता. पगार दोन लाख रुपये महिना. दिमतीला तीन सीए.
बापाची कोरडवाहू जाऊन निफाडला वट्ट चाळीस एकर बागायती आली होती. आई सगळीकडे पोराने नाव काढलं म्हणून मिरवत होती.
पण तरीही तो खूश नव्हता.
पैसा आला होता, ताकद आलेली होती.
तरीही तो खूश नव्हता.
त्याला समोर कायम एक व्यक्ती दिसायची.
खुपायची.
दादासाहेब शेलार...
हा माणूस अजूनही नाशिकवर राज्य करत होता.
अण्णा अजूनही त्याच्या समोरासमोर येऊ शकत नव्हता.
आणि इकडे मानस हळूहळू बदलत होता.
*****
"गुड मॉर्निंग सर."
"गुड मॉर्निंग."
"हा आमचा गोल्ड प्लॅन. यात सहा महिन्यात तुमचं मसल मास आपण दहा किलोने वाढवू."
"हम्म." तो म्हणाला.
"तर मग कधीपासून सुरुवात करायची?"
"हे काम दोन महिन्यात नाही होणार?"
जिमवाला खळखळून हसला.
"कसं शक्य आहे. आपण नैसर्गिक वे ने जाऊ."
"हे बघ. आय नीड टू ग्रूम मायसेल्फ. लवकरात लवकर."
"सर, प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो. इट्स नॉट लाईक मेथ, की ओढलं आणि लगेच सगळ्यात मोठं वजन उचलून वर्कआऊटला सुरुवात."
"मेथचा विषय का काढला?" मानस प्रचंड चिडला.
"रिलॅक्स सर, इट्स जोक."
"आय वॉन्ट इन्स्टंट रिझल्ट. असतील तर सांग, नाहीतर बाय." तो म्हणाला.
सॉरी सर, दुसरा मार्ग नाही.
मानस तिथून तरातरा निघून गेला.
...मात्र त्याच्या डोक्यात एक वेगळाच विचार घोळत होता...
... मेथ, आणि पॉवर....

क्रमशः

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मानस नांगरे...
आता अज्ञातवासी सीजन २ च्या शेवटच्या भागाशी थोडी लिंक लागतेय
मानस डिसोजा बरोबर गेला का त्याच दुबई शी नात जुळल ....
इंटरेस्टिंग आहे, ....
पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत