आमचे धोत्रे गुरुजी (भाग ३)
Submitted by मिरिंडा on 9 November, 2023 - 04:50
आजकाल मी गुरुजींना मॉर्निंग वॉकला घेऊन जायला सुरुवात केली. ते बरोबर आले तरी फारसे बोलत नसंत. किंबहुना बोलतच नसंत, असं म्हंटलं तरी हरकत नाही. पण एकतर्फी संवाद झाला,तरी मी तो चालू ठेवीत असे. कधी कधी ते रडवेला चेहरा करीत.कधी किंचित हसत.पण खळाळून हसत नसंत. अजूनही त्यांना आणल्याचा पश्चात्ताप होत नव्हता. कदाचित तो दिशाला होत असावा. पण ती माझ्या भीतीने बोलत नसावी. आता गुरुजींना येऊन महिना होत आला. माझी मुलं सुद्धा त्यांना आजोबा म्हणून हाक मारीत असंत. ते माझ्याकडे अनोळखी माणसाकडे पाहावं तसं पाहात.