खुन झाला पोशिंद्याचा
Submitted by जगदिश ढोरे आसेगावकर on 23 November, 2023 - 08:05
ज्याचा गेलंसाली हिरवा मळा होता,
त्याचा आज फासावर लटकून गळा होता..
कोणी दिली त्याच्या खुनाची सुपारी,
हे निकामी सरकार का बिटातले व्यापारी..
कोरडं पडलं ओंदा तो करील तरी काय,
मागच्या साली रानात घुसत होते पाय.
ओलं कोरडं करीत गेले उपासी दोन साल,
गोंडस त्याच्या पोरीचे यंदा बसलेत गाल..
निघलं कधी चांगल पिक तर पडल्या कधी गारा,
कुणबी रं गड्या तो त्याला नाही कसला थारा..
एकदा काळे माई हिरवा शालु नेसावा,
तुच आता या जगाचा पोशिंदा पोसावा..
लेखक - जगदीश ढोरे पाटील
रा. आसेगाव मो. 9370346450
शब्दखुणा: