अधिक गंभीर, निखळन्या आतुर
तंद्रीतले डोळे, हरवण्यास कारण
आठवणींची गोळाबेरीज एक सल,
जेव्हा डायरीत सापडते एक मोरपीस..
खुप दर्द, मन भावनातुर
अंतःकरण गहिवरलेले, वर्तमान हरण
सुख दुःखाची वजाबाकी एक सल,
जेव्हा डायरीत सापडते एक मोरपीस..
अजाण मर्म, ह्रदय चिंतातुर
श्वास भिजलेले, कल्पनेचे मरण
अश्रूंचा गुणाकार, ओठी एक सल,
जेव्हा डायरीत सापडते एक मोरपीस..
-- दीप
पौर्णिमेला दिसे चंद्र पूर्वेकडे,
अंगणी पुन्हा चांदण्यांचे सडे
ही अशी सांज दारावरी ठेपली,
युगांची प्रतीक्षा आता संपली
आवरावा मनाचा सारा पसारा
वाहावा तुझ्या दिशेनेच वारा
गंध या फुलाचा तुजला मिळावा
मनाचा मनाशीच संवाद व्हावा
तुझी धून, आतुर कानी पडावी
क्षणाचीच या वाट मी पाहिली
ही अशी सांज...
फिरवलेस ना रे मोरपीस तू ही?
शहारल्या बघ पुन्हा तारकाही
तुझे स्मित मंद या नभी उमटले,
नक्षत्र बघ इथे पुन्हा लाजले
बुडाली तव स्वप्नात ही चांदणी,
विसरले भान, मग मंदावली
ही अशी सांज...
प्रथम तुज पाहता क्षणी
काळजाचा ठोका चुकला
प्रीतीच्या रंगात रंगूनी
जीव माझा भुलला
न दिसता तू
जीव होई कासावीस
दिसता क्षणी तू
फिरे अंगावरी मोरपीस
टाकावा तू प्रेमळ कटाक्ष
लाभावा तुझा सहवास
रहावीस तू मजसमीप
हीच या मनीची आस
जवळी असता तुला
एकटक पहावस वाटत
डोळ्यात माझ्या तुला
साठवून घ्यावस वाटत
मोहक तुझ्या हास्यान
'रेहान'
मला कायमच समुद्राबद्दल प्रचंड आकर्षण वाटतं.. अथांग, खळखळता तरीही गूढ असा समुद्र! समुद्राची वेगवेगळी रूपं, किनार्यावरचा खारा वास, लाटांचा-वाळूचा पायाला होणारा स्पर्श.... सगळी समुद्राची मोहकता..! याच समुद्राच्या साक्षीने घडत-उलगडत जातो 'रेहान'.. रेहान.. मनस्वी, मनमौजी, आपल्या माणसांसाठी जीवही झोकून देणारा रेहान! अन अशा रेहानची सखी प्रिया! अथांग अन जिच्या मनाचा तळ गाठणं अशक्य.. अशी प्रिया! खरतर शब्दातून उलगडणार्या या कथेत आपण कधी हरवतो, कळंतच नाही.
मन घुंघुर घुंघुर
लडिवाळ त्याचा नाद|
सवे दारी-अंगणात
पारिजात पारिजात|
मन खळखळ लाट
मन शंखले-शिंपले|
ओंजळीत साठवले
नभ सूर्य चंद्र तारे|
मन मोगर्याचे फूल
मन कस्तुरी दरवळ|
पहाटेच्या नीरवात
मन काकड्याचा स्वर|
मन माथी मोरपीस
मन सुरेल बासरी|
उभ्या 'सावळ्या'च्या संगे
मन चैतन्याच्या सरी|
मन समईची वात
त्यात 'मी'पण जळावे|
मन सोने उजळता
मन 'सावळे'ची व्हावे|
लय जुळता सख्याची
मन होई निराकार|
मागे उरे माझे मन
त्यात 'सावळा' साकार||
कॅमेरा हातात आला की मला काळ-वेळ आणि भोवतालच्या जगाचा विसर पडतो..माझी फोटोग्राफी "photographic grammar" च्या व्याख्येनूसार चांगली-वाईट कशी आहे, हे मला खरंच माहिती नाही, पण ती मला आनंद नक्कीच देते..
काही सूचना असतील तर नक्की सांगा..समीक्षण करावसं वाटलं तर ते ही करा आणि कौतूक करावसं वाटलं, तरीही नक्की करा!
-
भानुप्रिया!
प्रचि. १
प्रचि. २