चिमुकल्या डोळ्यात देवा
बीज स्वप्नांचे रुजूदे,
जनहृदयी नित्य देवा
सद्विचार राहूदे...
जडेल स्वप्नपूर्तीचा
जीवा ध्यास जेव्हा ,
तत्त्व स्मरणी राहुदे
न विसरावे तेव्हा...
गवसेल जेव्हा हातांना या
आभाळ असे उत्तुंग,
पाय राहूदे धरणीवरती
मन निगर्वी, अभंग...
थकेल जीव मग जेव्हा
कृतार्थ भाव दाटूदे,
थकल्या ओंजळीतूनी
भक्तीरस वाहुदे...
चराचरातील प्रत्येकाला
तुझे अस्तित्व उमगुदे,
शुभंकर या तेजाचे
आम्हा आशिष लाभूदे...
-मानसी नितीन वैद्य
" अरे राजा, असं नसतं रे! तू असा, तरी तुला त्यांनी जिवापाड जपलं बघ. तुझी आईच करंटी, माझ्या पोराचा केसानं गळा कापेल वाटलं नव्हतं. तिनेच काहीतरी केलं असणार. पण तुझ्याबद्दल तुझ्या आई-बाबांच्या मनात खूप जीव होता! रुसू नको असा... खा बघू! मला म्हातारीला छळू नको हां! हा एक घास .... हां!
म्हातारपणात काय मेलं ध्यान नशिबी आलंय"
प्रथम तुज पाहता क्षणी
काळजाचा ठोका चुकला
प्रीतीच्या रंगात रंगूनी
जीव माझा भुलला
न दिसता तू
जीव होई कासावीस
दिसता क्षणी तू
फिरे अंगावरी मोरपीस
टाकावा तू प्रेमळ कटाक्ष
लाभावा तुझा सहवास
रहावीस तू मजसमीप
हीच या मनीची आस
जवळी असता तुला
एकटक पहावस वाटत
डोळ्यात माझ्या तुला
साठवून घ्यावस वाटत
मोहक तुझ्या हास्यान
मैत्र जीवाचे जडले जेथे
गळाले अह्मचे नाते तेथे
मैत्र जीवाचे फुलले जेथे
संपली तुझी माझी दरी तेथे
मैत्र जीवाचे वसले जेथे
अंतरीचे सूर जुळले तेथे
मैत्र जीवाचे भावले जेथे
मिटे तू तू मै मै ची रेषा तेथे
मैत्र जीवाचे जाणले जेथे
ओढ जीवीची लागतसे तेथे
मैत्र जीवाचे नांदते जेथे
स्वर्ग सुखाचा सडा पडे तेथे
गिरन चालू व्हती तरी
अंगावर कापड मिळालं न्हाय
गिरन जाउन जिंदगी गेली
पण घर काय मिळालं न्हाय
धरण बांधून वरसं लोटली
प्यायला पाणी मिळालं न्हाय
कालवा अंगण मोडून वाहिला
पण शेतापातुर पोचलाच न्हाय
नवीन प्रकल्प आला म्हनून
पुन्हा सरकार जिमीन घेतंय
वाचवायला गेला घर म्हणून
पोराचा माझ्या जीव घेतंय...
विनायक बेलोसे
http://vinayakbelose.blogspot.com/
पुण्यात इकडे-तिकडे फिरण्यासाठी मी बस किंवा रिक्षाचा वापर करतो. बर्याचदा रिक्षा हाच पर्याय पुण्याच्या बस-कंपनीच्या “एक्स्ट्रा”ऑर्डिनरी कारभारामुळे सोयिस्कर वाटतो .. आणि इतरवेळी आपला जो मार्ग असतो तो कोणत्याही बस-मार्गामधे येत नसल्याने रिक्षा हा एकच पर्याय स्वतःचं वाहन नसलेल्या कोणाही माणसांपुढे उरतो. मीं अश्या लोकांमधे येत असल्याने मी रिक्षाने फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावरून लॉ कॉलेज रस्त्याकडे जाण्यासाठी एक रिक्षा मिळवून आत बसलो. मला जिथे जायचं होतं ती कांचन गल्ली रिक्षाचालकाला माहित असल्याने मला फारसं काम उरलं नव्हतं .. मी प्रथम इकडे-तिकडे पाहात होतो ..