प्रथम तुज पाहता क्षणी
काळजाचा ठोका चुकला
प्रीतीच्या रंगात रंगूनी
जीव माझा भुलला
न दिसता तू
जीव होई कासावीस
दिसता क्षणी तू
फिरे अंगावरी मोरपीस
टाकावा तू प्रेमळ कटाक्ष
लाभावा तुझा सहवास
रहावीस तू मजसमीप
हीच या मनीची आस
जवळी असता तुला
एकटक पहावस वाटत
डोळ्यात माझ्या तुला
साठवून घ्यावस वाटत
मोहक तुझ्या हास्यान
होई जगाचे विस्मरण
मधाळ त्या शब्दांनी
गळूनी पडे माझे मीपण
तुझ्याविना रित माझे जीवन
अपूर्ण भासे आयुष्याचे ईक्वेशन
माझ्या आयुष्यात तुझं असण
करील परिपूर्ण माझं जगण
कविता होशील माझ्या आयुष्याची
तरच या जगण्याला अर्थ आहे
नाहीतर तुझ्याविना जगण म्हणजे
निव्वळ शून्यात शून्य मिळवण आहे
जीव भुलला
Submitted by ओबामा on 9 November, 2017 - 02:38
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा