प्रार्थना
Submitted by मानसी नितीन वैद्य on 28 July, 2020 - 08:40
चिमुकल्या डोळ्यात देवा
बीज स्वप्नांचे रुजूदे,
जनहृदयी नित्य देवा
सद्विचार राहूदे...
जडेल स्वप्नपूर्तीचा
जीवा ध्यास जेव्हा ,
तत्त्व स्मरणी राहुदे
न विसरावे तेव्हा...
गवसेल जेव्हा हातांना या
आभाळ असे उत्तुंग,
पाय राहूदे धरणीवरती
मन निगर्वी, अभंग...
थकेल जीव मग जेव्हा
कृतार्थ भाव दाटूदे,
थकल्या ओंजळीतूनी
भक्तीरस वाहुदे...
चराचरातील प्रत्येकाला
तुझे अस्तित्व उमगुदे,
शुभंकर या तेजाचे
आम्हा आशिष लाभूदे...
-मानसी नितीन वैद्य
विषय: