तन्मय

कृष्णार्पण

Submitted by पुरंदरे शशांक on 13 December, 2024 - 21:12

कृष्णार्पण

गरगर फिरवी ऐहिक पाही
मला तुझा आधार हवा रे
असो नसो वा पुण्य गाठीशी
मोरपीसही फिरवून जा रे

व्याकुळ ह्रदयी बरसत जा रे
थेंब सावळा एक पुरे रे
मेघ कृपेचा तूच आसरा
चातक आर्ती पुरवी अता रे

नसे पात्रता ज्ञान योग हो
यम दम सारे अवघड की रे
हाक मारता रुद्ध कंठ तो
कसे बोलवू जाणत ना रे

अशीच राधा व्याकुळ होता
तन्मय पाही ह्रदी तुला रे
हाच दिलासा मला एकला
संशय ते ही फिटले सारे

नुरो देह हा नुरो जाणिवा
बंधन काही नको नको रे
आर्त एकचि हृदी रहावी
कृष्णार्पण ते सारे सारे

२०१३ रिकॅप - फोटो आणि व्हिडीओ क्लिप

Submitted by तन्मय शेंडे on 1 January, 2014 - 11:07

आपणा सर्वांना नविन वर्षाच्या हार्दिक शूभेच्छा !!

२०१३ हे वर्ष भरपूर सुंदर आठवणी देउन संपल. स्वप्नातल्या बर्याच जागांना भेटी देउन झाल्या यलोस्टोन, टीटान, ग्रॅन्ड कॅनीयन....
काही चांगली माणसं भेटली त्याच्याशी संवाद साधता आला, आणि बरचं काही.....

मागच्या वर्षी फोटोग्राफी छंद मी खूप एन्जॉय केला आणि येणार्या नविन वर्षात माझ्या छंदात प्रगल्भता आणण्याचा प्रयत्न करणार आहे.

माझ्या २०१३ च्या काही खास आठवणी या छोट्या व्हिडीयो क्लीप मध्ये सामावल्या आहेत. फोटोवर किंवा लींक वर क्लिक HD व्हिडीयो बघता येईल.
रेकमेंडेड - HD फूल स्क्रीन व्ह्यू, क्लिपची वेळ : २ मिनीटे

मी चुप्प

Submitted by तन्मय शेंडे on 25 August, 2012 - 20:29

कविता - 'मी चुप्प'

येताना खुपत
जाताना बोचत
कितीही दुखलं तरी मी चुप्प !!

स-दैव सुज्ञ
विचारात महात्म्य
घर जळलं तरी मी चुप्प !!

संस्कृती दक्ष
केल लक्ष
झालो भक्ष तरी मी चुप्प !!

रांगेत सुस्त
प्रगतीचा अस्त
सगळच फस्त तरी मी चुप्प !!

मंत्र्यानचं तंत्र
हाती जातीचा मंत्र
केल माझ यंत्र तरी मी चुप्प !!

दाखवलं संत्र
हेच हल्लीच सूत्र
मोडक्या स्वप्नांची रात्र तरी मी चुप्प !!

करून कष्ट
शून्य प्राप्त
वेळ समाप्त तरी मी चुप्प !!

पाणी लुप्त
वीज गुप्त
सारे होती असे आसक्त तरी मी चुप्प !!

गप्प, गप्प
आवाज ठप्प
मजले गर्दीत हुप्प तरी मी चुप्प !!

Subscribe to RSS - तन्मय