एका धावकाचे ‘मैत्री’ खातीर आवाहन
मी बराच काळ कामाच्या निमित्ताने एका गावी फार स्थिर असा राहू शकलो नव्हतो. त्यामुळे मला माझे छंद जोपासायला नीट सलग असा कालावधी मिळालाच नाही. त्याकारणाने माझे छंद एक ना धड भाराभर चिंध्या अशा प्रकारचे आहेत / होते. पण गेले काही वर्षे पुण्यात रहायला आल्यापासून जीवनाला जरा स्थिरता आली आणि मग साधारण एकाच सुमारास चालू झाले, मैत्री (नावाची एक संस्था जी मेळघाटात काम करते तिच्या) करता स्वयंसेवक म्हणून काम करणे आणि माझे धावणे.
सामाजिक उपक्रमाचे हे आपले आठवे वर्ष. हा उपक्रम तसा मायबोलीकरांना नवा नाही. मायबोलीकरांच्या साथीने गेली ७ वर्षे स्वयंसेवक हा उपक्रम यशस्वीपणे पार पाडत आले आहेत. समाजासाठी कार्य करणार्या संस्थांना सामाजिक उपक्रमाद्वारे मदत मिळवून देण्यास आपण प्राधान्य देतो.
या उपक्रमात दरवर्षी ज्यांना सरकारकडून फारशी मदत मिळत नाही (वा मिळतच नाही) किंवा संस्था मुख्यत्वे फक्त देणगीदारांवर चालते अशा गरजू संस्थांना प्रामुख्याने वस्तुरुपात मदत करण्यावर आपला भर असतो. यावर्षी निवडलेल्या संस्थांना गरज असलेल्या गोष्टींची यादी मागवण्यात आली आहे.
मुम्बई मधे अपंग व्यक्तीसाठी काम करणारी संस्तानची नावे संपर्क क्रमांक अणि त्यांचे कार्य या बद्दल माला माहिती हावी आहे. तर जर कोणाकडे माहिती असेल तर कृपया करून माला दयावी.
तुम्हाला अभिमान वाटेल, भारतातली पहिली आजीबाईंची शाळा भरतेय महाराष्ट्रातल्या एका खेड्यात...
या शाळेत नाव दाखल करायचं असेल तर तुमचं वय किमान ६० वर्षं असायला हवं बरं का... ही भारतातली पहिलीच आजीबाईंसाठीची शाळा आहे. ही शाळा पुण्यासारख्या मोठ्या शहरात नाही, तर आहे एका लहानशा खेडेगावात. या नावाचं गावही तुम्ही कधी ऐकलं नसेल. हे आहे आपल्या ठाणे जिल्ह्यातल्या मुरबाड तालुक्यातलं फांगणे नावाचं गाव. गेल्या वर्षी ८ मार्च २०१६ ला म्हणजेच जागतिक महिला दिनी या शाळेचं उद्घाटन झालंय आणि महिन्याभरात या शाळेला एक वर्ष पूर्णही होईल.
काही दिवसांपूर्वी लोकलट्रेनने प्रवास करीत असताना एका स्टेशनवर ५-६ अंधव्यक्ती, गाडी सुटता सुटता माझ्या डब्यात चढले. मी त्यांच्या शेजारीच ऊभा असल्याने मला त्यांचे आपापसातील बोलणे ऐकू येत होते. आपण सर्वसामान्य जेव्हा एकत्र प्रवास करतो, तेव्हा आपल्या बोलण्यात आपल्या पोराबाळांचे, ऑफिसचे, राजकारणाचे वगैरे विषय येत असतात. तर त्या अंधव्यक्तींच्या बोलण्यात कोणते विषय होते? तर कोणता डबा कुठे येतो. डब्यात चढताना पकडायचा मोठा दांडा कुठल्या डब्याचा कुठे असतो. कुठल्या स्टेशनचा प्लॅटफॉर्म फार वर आहे. कुठला फार खाली आहे. कोणता डबा पुलाच्या अगदी जवळ येतो.
मेळघाट मैत्री - आनंदमेळावा २०१६
मला गेले तीन वर्षे मेळघाटात जायला जमवता आले नव्हते. त्यामुळे मी यावर्षी अगदी ठरवलेच होते की आपण जाउन यायचे आणि अखेर तसे जमवलेच. मेळघाटातल्या ज्या शाळांमध्ये आपले काम चालते त्या सर्व मुलांकरता गेली ३-४ वर्षे दिवाळीनंतर एक आनंद मेळावा भरवला जातो. यावर्षी मला त्यात सहभागी होण्याचा योग होता.
ते न्हवं आपली एक शंका
.
.
.
.
.
.
स्पर्धा लावून मोठमोठ्या इफ्तार पार्ट्यांचं आयोजन करणारे नेतेमंडळी दिवाळी फराळाचं आयोजन करताना का दिसत नाहीत?
आपणा सर्वांना काय वाटते?
खूप सार्या लोकाना कळत देखील नाही की दिवाळी म्हणजे नेमके काय.....
थोड्या दिवसांपूर्वी एक पोस्ट टाकली होती, पणत्या रंगवून विकण्याचा प्रयोग करणार होते म्हणून. http://www.maayboli.com/node/60405 पणत्या विकण्याचा प्रयोग करण्यामागे दिलेल्या अनेक कारणांमध्ये अजून एक कारण होतं. ते पूर्ण झाल्यावरच बोलायचं म्हणून थांबले होते. पणत्या रंगवण्यात आनंद मिळत होताच तरी त्या विकून त्याच्यातून मिळणाऱ्या पैशांची तुलना नकळत माझ्या नोकरींशीही होत होती. खरंच त्यात इतका वेळ घालवावा का हे कळत नव्हतं. त्यांची क्वालिटी चांगली असली तरीही लोक त्यासाठी जास्त पैसे द्यायला तयार होतील का हाही विचार येत होता मनात.
दादर माटुंगा बांद्रा माहिम या परिसरातील समुपदेशकांबद्दल माहिती हवी आहे. जवळच्या नात्यातील एका व्यक्तीला डिप्रेशन सिंड्रोम्स दिसत आहेत. कृपया कोणाला एखाद्या चांगल्या समुपदेशकाबद्दल माहिती असल्यास सांगा. धन्यवाद.