गेल्या आठवड्यात माझ्या नातवाचं बोर - न्हाण केलं. जरा वेगळ्या पद्धतीनी.
आपल्या बाळांचे आपण निरनिराळे कार्यक्रम करतो त्यांबद्दल थोडंसं. त्यांना उत्सवमूर्ती म्हणायचं खरं, पण त्यांना त्यात अजिबात रस नसतो. कौतुक आपल्यालाच असतं आणि असावं देखील. आपण आपल्या मित्रमंडळी, नातेवाईक यांच्या उपस्थितीत ते साजरे करतो कारण आपल्याला आपला आनंद त्यांच्याबरोबर वाटण्याची इच्छा असते आणि ती सफलही होते. मात्र पाहुण्यांच्या दृष्टीनी हा अनुभव काही एकमेवाद्वितीय (unique) नसतो.
पैसा
आपल्या कुवतीनुसार
जो-तो कमवतो पैसा
चढ-ऊतार करत कधी
माणसांना रमवतो पैसा
पैशामुळं तर कधी कधी
माणूसकीलाही डागणं आहे
जगण्यासाठी हा पैसा की
पैशासाठी हे जगणं आहे,.?
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३
नमस्कार,
सदर लेख हा आम्ही तरुणानी आमच्या गावी सुरु केलेल्या 'पातोंडा परीसर विकास मंच' करीता वस्तु वा आर्थिक स्वरुपात मदतीचे आवाहन म्हणुन लिहला असून जमेल त्या पध्दतीने सध्या स्थीती मांडण्याचा प्रयत्न करतोय…
शुभेच्छा नव-वर्षाच्या
करा निर्धार नव-वर्षाचा
यशप्राप्तीसाठी झटण्याचा
सुख-शांती-यश देखील
खुशी-खुशीने वाटण्याचा
मिळत राहील यश सदैव
तुमच्या सार्या प्रयत्नांना
जीवनी तुमच्या तत्परतेने
डिस्चार्ज मिळो यातनांना
झाला प्रफूल्लित मन:पुर्वक
हा घ्या शब्दफूलांचा गुच्छा
देतो आपणास स्नेहबंधाच्या
नव वर्षाच्या नव शुभेच्छा
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३
आमचे संविधान
स्वातंत्र्य समता बंधुत्वाचा
चरा-चरात मिळतो मान
अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा
इथे मिळतो हो बहूमान
धर्मनिरपेक्षता समाजवादी
आहे एकात्मतेचा प्राण
मानवतेच्या कल्याणासाठी
जगात भारी आमचे संविधान
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३
लवकरच येत आहे… माझी पी. एच. डी. - उवा आणि मानवी उत्क्रांती...
आमचे गाईड -आमचा न्हावी
पृथ्वीच्या पाठीवर न्हाव्याचा जेवढा संबंध डोक्याशी (दुसर्याच्या) येतो तेवढा क्वचितच कुणाचा येत असावा. असा डोकेबाज माणूस माझा गाईड असावा हा तर दुग्ध शर्करा योग. त्याच न्यायाने जी जमातच मुळात डोक्यावर राहते ती तर किती डोकेबाज असेल विचार करा.….
नमस्कार!
यंदा आपण शबरी सेवा संस्थेला सौरदिवे बसवण्याकरीता रु.३५,०००/- इतकी देणगी दिली. सौरदिवे बसवण्याचे काम नुकतेच पुर्ण झाले असून त्याचे काही फोटो खाली सगळ्यांच्या माहितीसाठी देत आहे.




कुठे फिरून आले की लगेच त्या आठवणी लिहून काढायची सवय म्हणा, हौस म्हणा किंवा विरंगुळा म्हणा, आहे खरा! हे काम करायला मजा येते आणि नंतर त्या आठवणी कधीतरी वाचताना गंमत वाटते. पण सगळेच अनुभव व्यक्त करता येतातच असं नाही अन काही वेळा सांगावेसेही वाटत नाही तो आपला सुखद ठेवा असतो... आठवणींच्या गाभार्यात मखमली वेष्टणात गुंडाळून ठेवलेला. फक्त आणि फक्त आपणच त्याचे खजिनदार व राखणदार.
आपल्याला वेगवेगळ्या माहिती स्रोतांद्वारे अनेक खात्रीशीर, सेवाभावी व लोकहितकारी अशा सामाजिक प्रकल्प व उपक्रमांची माहिती नित्यनियमाने मिळत असते. सोशल मीडियातून तर अशी माहिती रोजच प्रसृत होत असते. खात्रीलायक, नोंदणीकृत संस्थांद्वारे जसे मोठे उपक्रम व सेवाकार्य प्रकल्प हाती घेतले जातात तसेच अगदी छोट्या पातळीवरही एकट्या दुकट्या लोकांनी मोठ्या तळमळीने चालू ठेवलेल्या कल्याणकार्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचते खरी, परंतु ही माहिती इतर लाटांमध्ये विरूनही जाते. तर या धाग्याचा उद्देश हा की, अशा प्रकारचे चांगले काम व उपक्रम संकलित स्वरूपात आपल्या माहितीसाठी एकत्र पाहाता यावेत.