आपल्याला वेगवेगळ्या माहिती स्रोतांद्वारे अनेक खात्रीशीर, सेवाभावी व लोकहितकारी अशा सामाजिक प्रकल्प व उपक्रमांची माहिती नित्यनियमाने मिळत असते. सोशल मीडियातून तर अशी माहिती रोजच प्रसृत होत असते. खात्रीलायक, नोंदणीकृत संस्थांद्वारे जसे मोठे उपक्रम व सेवाकार्य प्रकल्प हाती घेतले जातात तसेच अगदी छोट्या पातळीवरही एकट्या दुकट्या लोकांनी मोठ्या तळमळीने चालू ठेवलेल्या कल्याणकार्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचते खरी, परंतु ही माहिती इतर लाटांमध्ये विरूनही जाते. तर या धाग्याचा उद्देश हा की, अशा प्रकारचे चांगले काम व उपक्रम संकलित स्वरूपात आपल्या माहितीसाठी एकत्र पाहाता यावेत.
आपणा सर्वाना माहित असेलच कि यंदा मराठवाड्यात भीषण दुष्काळ आहे आणि आत्ता पर्यंत जवळ पास दोन महिन्यात ४०० शेत कर्यांनी आत्महत्या केल्या आहेत , सरकार आपले काम करीत आहेच , आपणही सामाजिक बांधिलकी म्हणून बळी राजाला मदत करावी , नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी मदद करायला सुरवात केली आहे , आणि खूपच पारदर्शी पद्धतीने काम सुरु आहे , तरी सर्व मिपा कारण विनंती कि यथा शक्ती मदत नाम foundation ला करावी
आपण online हि पैसे पाठवू शकता
Account name : NAAM foundation
Account No . : 35226127148
IFS Code : SBIN0006319
SWIFT कडे : SBINBB238
सस्नेह नमस्कार! सालाबादाप्रमाणे मेळघाटात मैत्रीच्या शिक्षण संदर्भातले काम चालू होत आहे त्याची माहिती देत आहे.
मागील कामाचा आढावा :
गेली चार वर्षे मेळघाटामध्ये आपण जिल्हा परिषदेच्या शाळांमधील मुलांसाठी अभ्यासपूरक अनेक उपक्रम घेत आहोत. आपली त्यांच्याबरोबर चालू असलेली ही ‘मैत्रीशाळा’ च आहे. गावामधील थोडेसे शिकलेले तरुण, (प्रत्येकी एक ) ज्यांना आपण ‘गावमित्र’ म्हणतो, संपुर्ण शैक्षणिक वर्षात (जुलै ते एप्रिल) शाळा भरण्याच्या आधी मुलांना जमा करुन त्यांचे शाळेचे शिकणे सोपे व्हावे यासाठी काम करतात. काय काय करतात ते?