सेवाभावी संस्था

जुन्या कपड्यांचे काय करावे?

Submitted by मी अमि on 16 February, 2015 - 00:52

घरी खुप जुने कपडे जमा झाले आहेत. काय करावं कळत नाही. पुर्वी आई जुने कपडे बोहारणिला देऊन भांडी घेत असे. आता सोसायटीत बोहारणी येत नाहीत. कुठे येत असतील तर त्यांना गाठायला आम्ही दिवसभर नसतो. विनाकारण भांडी जमा करायची सुद्धा इच्छा नाही.

जुने कपडे डिस्पोज करण्यासाठी काय करता येईल? मला खालील पर्यांयांबद्दल माहिती/ मदत हवी आहे. मी मुंबईत राहते.

१. एखादी सेवाभावी संस्था जर कपडे स्विकारत असेल तर उत्तम. परंतु घरी येऊन न्यायला हवेत. तुमच्या ओळखी मध्ये अशी संस्था असल्यास सांगा.
२. रद्दी प्रमाणे जुने कपडे विकत घेणारी दुकाने असतात का? कृपया माहीत असल्यास सांगा.

२०१५ बृहन्महाराष्ट्र मंडळ १७वे अधिवेशन : लवकर नावनोंदणी करा

Submitted by BMM2015 on 13 January, 2015 - 12:39

convention_transparent_with_mararathi_name1.png
बृहन्महाराष्ट्र मंडळाचे १७वे अधिवेशन या वर्षी ३ ते ५ जुलैच्या दरम्यान लॉस एंजलिस जवळच्या अॅनाहाईममध्ये भरणार आहे. जगप्रसिद्ध डिस्नीलँडच्या जवळच असलेल्या प्रशस्त कन्व्हेन्शन सेंटरमध्ये हे अधिवेशन होणार आहे. जगभरातील मराठी मंडळींना लॉस एंजलिस परिसरातील पर्यटन स्थळांना भेट देण्यासाठी ही एक आगळी वेगळी संधी चालून आली आहे.

आपला कट्टा चर्चा निष्कर्ष संकलन

Submitted by शांताराम कागाळे on 7 January, 2015 - 09:13

१ ले चर्चा सत्र :

विषयः मोदींना पर्याय काय, मोदींना पर्याय का नाही, मोदींना पर्याय निर्माण होणे आवश्यक आहे की नाही!
दिवसः ७ जानेवारी २०१५

१. मोदींसारख्या नेत्यांना पक्षांतर्गत व पक्षबाह्य असे दोन्ही ठिकाणी समर्थ पर्याय निर्माण होणे एका देशासाठी आवश्यक आहे.

२. काँग्रेसने तूर्त नवीन चेहर्‍यांचा विचार करावा व पक्षबांधणीवर फोकस ठेवावा. ज्योतिरादित्य शिंदे हे नांव दोन सदस्यांनी सुचवले.

प्रश्न गतिमंद मुली पिडीतांचा

Submitted by निक्षिपा on 29 December, 2014 - 02:33

नमस्कार, मला मायबोलीकरांकडून एक मदत हवी आहे. थोडीशी नाजूक बाब असली तरी योग्य व्यक्तींपर्यंत कसे पोहोचावे हे मला समजत नसल्यामुळे इथे मांडतेय. माझी अगदी जवळीची मैत्रिण मुंबईतील गतीमंद शाळेत गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षीका आहे. मुलांची मानसिकता ओळखणे, त्यांना शिकवणे, यामध्ये ती माहिर आहे. तिच्या शाळेमध्ये एका गतिमंद निवासी संस्थेतून दर महिन्याला काही या गतिमंद मुलांना विविध गोष्टी शिकवण्यासाठी पाठवले जाते. त्यातील काही म्हणजे नीटनेटके राहणे, कपडे बदलणे, स्वतःची स्वच्छता राखणे इत्यादी. हे शिकवत असताना त्या मुलांची इन जनरल शारिरीक चाचणीपण केली जाते.

स्त्रीविरोधातील हिंसा नष्ट करण्याचा आंतरराष्ट्रीय दिवस : २५ नोव्हेंबर! (सार्वजनिक धागा)

Submitted by अरुंधती कुलकर्णी on 25 November, 2014 - 01:16

स्त्रियांबाबत केली जाणारी हिंसा ही काही नवीन गोष्ट नाही. परंतु दिवसेंदिवस या हिंसेचे वाढत चाललेले उग्र रूप ही एक अत्यंत चिंतेची व शरम आणणारी वस्तुस्थिती बनत चालली आहे. आजूबाजूच्या या परिस्थितीकडे काणाडोळा करून उपयोग नाही, कारण त्याची झळ कधी तुम्हांला लागेल ते सांगता येत नाही. अनेकदा स्त्रियांचे बाबतीत घडणारा हिंसाचार हा त्यांच्या जोडीदाराकडून होतो. इ.स. २०१२मध्ये हत्या झालेल्या स्त्रियांमधील जवळपास अर्ध्या स्त्रिया त्यांच्या जोडीदाराकडून किंवा कुटुंबसदस्याकडून मारल्या गेल्या.

मुक्तांगण, फर्स्ट एक्सटेन्शन इनचार्ज, प्रधान सर

Submitted by अतुल ठाकुर on 24 November, 2014 - 08:02

जुन महिना हा तसा मुक्तांगणमधला गजबजलेला महिना. जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन या महिन्यात येतो. त्या निमित्ताने मुक्तांगणचे अनेक अवेअरनेस कार्यक्रम सगळीकडे होत असतात. मुक्तांगणच्या संचालिका मुक्ता मॅडमचा वाढदिवस याच महिन्यात असतो. मुक्तांगणमध्ये रक्तदान शिबीरही ठेवले जाते. शिवाय नेहेमीप्रमाणेच या महिन्याच्या शेवटच्या शनिवारी देखिल व्यसनमुक्तीचा वाढदिवस असतोच. मात्र या वाढदिवसाचेदेखिल एक वेगळे महत्त्व यासाठी असते कि जुन महिन्यात खुद्द मुक्तांगणच्या अनेक काऊंसिलर्सच्या व्यसनमुक्तीचा वाढदिवस या महिन्यात येतो. एक वाढदिवस जन्माचा आणि एक व्यसनमुक्तीचा.

शब्दखुणा: 

पणती जपून ठेवा !

Submitted by विक्रम देशमुख on 2 November, 2014 - 01:53

स्नेहालया सम्बनधी आजच्या सकाळ सप्तरन्ग मधे आलेला सन्जय आवटे यान्चा लेख.

सुविख्यात समाजसेवकांनी समर्पित होऊन उभ्या केलेल्या भव्य कामाचं कौतुक असावंच, पण स्वतःच्या संवेदनांच्या कक्षा रुंद करणं हे त्याहून महत्त्वाचं. आपल्याला जे आणि जेवढं शक्‍य आहे, तेवढं प्रत्येक जण अवतीभवती करत गेला तर खूप काही बदलेल. नगरच्या ‘स्नेहालय’ या संस्थेचं काम त्यासाठीच महत्त्वाचं. स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी या संस्थेनं जो प्रयोग केला, तो तर वस्तुपाठ आहे, लोकसहभागाचा. समाजाचं काम एकट्या-दुकट्यानं नव्हे, अवघ्या समाजानंच करायला हवं, अशा पद्धतीनं सगळे घटक सोबत आले, तर कामाचं रूप किती बदलू शकतं, याचा हा पुरावा.

प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - सेवाभावी संस्था