पणती जपून ठेवा !
Submitted by विक्रम देशमुख on 2 November, 2014 - 01:53
स्नेहालया सम्बनधी आजच्या सकाळ सप्तरन्ग मधे आलेला सन्जय आवटे यान्चा लेख.
सुविख्यात समाजसेवकांनी समर्पित होऊन उभ्या केलेल्या भव्य कामाचं कौतुक असावंच, पण स्वतःच्या संवेदनांच्या कक्षा रुंद करणं हे त्याहून महत्त्वाचं. आपल्याला जे आणि जेवढं शक्य आहे, तेवढं प्रत्येक जण अवतीभवती करत गेला तर खूप काही बदलेल. नगरच्या ‘स्नेहालय’ या संस्थेचं काम त्यासाठीच महत्त्वाचं. स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी या संस्थेनं जो प्रयोग केला, तो तर वस्तुपाठ आहे, लोकसहभागाचा. समाजाचं काम एकट्या-दुकट्यानं नव्हे, अवघ्या समाजानंच करायला हवं, अशा पद्धतीनं सगळे घटक सोबत आले, तर कामाचं रूप किती बदलू शकतं, याचा हा पुरावा.
विषय:
प्रांत/गाव:
शब्दखुणा: