घरी खुप जुने कपडे जमा झाले आहेत. काय करावं कळत नाही. पुर्वी आई जुने कपडे बोहारणिला देऊन भांडी घेत असे. आता सोसायटीत बोहारणी येत नाहीत. कुठे येत असतील तर त्यांना गाठायला आम्ही दिवसभर नसतो. विनाकारण भांडी जमा करायची सुद्धा इच्छा नाही.
जुने कपडे डिस्पोज करण्यासाठी काय करता येईल? मला खालील पर्यांयांबद्दल माहिती/ मदत हवी आहे. मी मुंबईत राहते.
१. एखादी सेवाभावी संस्था जर कपडे स्विकारत असेल तर उत्तम. परंतु घरी येऊन न्यायला हवेत. तुमच्या ओळखी मध्ये अशी संस्था असल्यास सांगा.
२. रद्दी प्रमाणे जुने कपडे विकत घेणारी दुकाने असतात का? कृपया माहीत असल्यास सांगा.
३. रिसायकलींग करून देणारे कुणी ओळाखीचे आहे का? म्हणजे जुन्या कपड्यांपासून गोधड्या, रजया, पिशव्या इ. शिवुन देईल का?
कबीर यांनी दिलेली माहिती:
विशेष विनंती - कृपया सायंकाळी ६.३० नंतर आमच्या स्वयंसेवकांशी फोन द्वारे संपर्क साधावा. ऑफिस वेळेत संपर्क करायचा असेल तर व्हाट्स अप किंवा फोन मेसेज द्वारे संपर्क करा.
आपल्या सोयीसाठी आमच्या विभागवार स्वयंसेवकांची नावे व फोन नं खाली दिले आहेत:-
CENTRAL ZONE⌛
● प्रथमेश दिवेकर #9029714387 » कल्याण ते अम्बरनाथ
आपली हकाची,
टीम प्रोजेक्ट फँड्री
संपर्क : projectfandry@gmail.com
आमचे फेसबुक पेज
https://m.facebook.com/profile.php?id=711562668909315
सारिका संगिड़वार » मुलुंड
● संदेश तटकरे #8108508193, शर्मिला यादव व पूनम यादव » भांडुप
● रुपेश तटकरे #8080682205 » मुलुंड ते विक्रोली
● दीपेश कांबळे #9892323553 » घाटकोपर-W
● महेश खेडेकर #8097574009 » घाटकोपर-E
● प्रविण दाभोळकर #9773770507, दिलीप वरेकर #9664138181 » लालबाग ते दादर
● अमेय & सुखदा जोशी #9833998187 » दादर
● किशोर झोरे #7506640338, प्रियंका लाखन » भायखळा ते वरळी
● योगेश चव्हाण #9869404046 » मसजिद, CST
http://goonj.org/?page_id=85
http://goonj.org/?page_id=85
हे पहा.
१) कपडे धुतलेले स्वच्छ आहेत
१) कपडे धुतलेले स्वच्छ आहेत का? फाटके आहेत का? परत घालणेबल आहेत का?
२) आजारी माणसाचे वापरलेले असतील तर डिस्पोज ऑफ करावे लागतील. कारण संसर्ग जन्य आजार फैलावू शकतात. अंतर्वस्त्रे वगैरे पण शक्यतो डिस्पोज ऑफ केली तर बरी.
३) हे सोडून उरलेले कपडे घरी येउन नेणारे लोक्स आहेत. तुमच्या एरिआतील रद्दीवाला सांगू शकेल.
४) सेवाभावी संस्था पण आहेत. अनिरुद्ध बापूंच्या सेवेतील लोक जास्त सांगू शकतील. वनवासी कल्याण आश्रम पण आहे. इथे मायबोलीवर जागुंनी लिहीलेली आर्टिकल्स आहेत त्यात आदिवासी मुलांच्या शाळांची माहिती आहे. तिथे विचारून बघा. स्वेटर, मुलांचे कपडे नक्की जातील.
https://www.facebook.com/page
https://www.facebook.com/pages/Project-Fandry/711562668909315
कृपया यांना देण्यात यावी.
बोहारणीला द्यावे.
बोहारणीला द्यावे.
अमी उरणला वनवासी आश्रम शाळेचे
अमी उरणला वनवासी आश्रम शाळेचे कार्यकर्ते अशा जुन्या कपड्याचे वाटप करतात आदीवासी वाड्यांमध्ये. पण इथपर्यंत पोहोचवावे लागतील.
स्वच्छ, न फाटलेले, परत
स्वच्छ, न फाटलेले, परत घालण्यास योग्य (साइझ बदलला, कंटाळा आला म्हणून ठेवून दिलेले) असे कपडे असतील तरच ते कुठेतरी डोनेट करा.
गोधड्या वगैरेंसाठी द्यायचे कपडे हे ही स्वच्छ केलेले असावेत. विटले वा फाटलेले चालू शकतात.
जुन्या साड्यांचे काठ आणि पदर आणि काही प्रमाणात बुट्टी काढून घेऊन नवीन कापड घेऊन त्यावर ते काठ पदर वगैरे लावून नवीन साडी बनवता येईल. असेच कपड्य़ांमधले चांगले तुकडे एकत्र करून क्विल्ट स्टोल/ दुपट्टा बनवता येईल. किंवा ते चांगले तुकडे पॅचवर्क डिझाइन म्हणून नवीन कपड्यांवर, कुशन कव्हर्सवर, इतर गृहसजावटीच्या वस्तूंवर लावता येतील.
खूप जुनी खरी जर असलेली आणि रेशमी भागाची पार वाट लागलेली अशी साडी असेल तर सोनाराकडे जाऊन त्यातले सोने/ चांदी काढून घेऊ शकता.
अंतर्वस्त्रे अगदी स्वच्छ धुवून मग अगदी बारीक तुकडे करून ते कुशन्स किंवा तत्सम गोष्टी भरायला वापरू शकता. हे बारीक तुकडे करून भरणे इतर कुठल्याही कपड्यांचेही करता येते.
ललिता, गूंज बहुतेक ड्रॉपिंग
ललिता, गूंज बहुतेक ड्रॉपिंग सेंटर मध्ये द्या असं सांगताहेत. सेंटर्स घरापासून दूर आहेत. तिथे फोन करुन विचारते की घरी येऊन कलेक्ट करणार का
अमा कपडे घालणेबल आणि स्वच्छ आहेत. रद्दीवाल्याला देण्याऐवजी कुणितरी घालावे असे वाटते. जागुची आर्टीकल्स पाहते.
कबीर, इथे फेबु ओपन होत नाही. तुम्ही दुसरी कुठली लिंक असल्यास द्याल का?
नविन वाचक, बोहारणि बद्दल मी वरच लिहिलय की
जागु अगं घेऊन जाणे हा
जागु अगं घेऊन जाणे हा प्रॉब्लेम आहे. घरून कुणि घेऊन जाणारे असेल तर प्लिज सांग.
नी, टिप्स बद्दल धन्स
विशेष विनंती - कृपया सायंकाळी
विशेष विनंती - कृपया सायंकाळी ६.३० नंतर आमच्या स्वयंसेवकांशी फोन द्वारे संपर्क साधावा. ऑफिस वेळेत संपर्क करायचा असेल तर व्हाट्स अप किंवा फोन मेसेज द्वारे संपर्क करा.
आपल्या सोयीसाठी आमच्या विभागवार स्वयंसेवकांची नावे व फोन नं खाली दिले आहेत:-
CENTRAL ZONE⌛
● प्रथमेश दिवेकर #9029714387 » कल्याण ते अम्बरनाथ
आपली हकाची,
टीम प्रोजेक्ट फँड्री
संपर्क : projectfandry@gmail.com
आमचे फेसबुक पेज
https://m.facebook.com/profile.php?id=711562668909315
--------------------------
तुमचा एरिआ सांगा मी तुम्हाला त्या एरीआ मधल्या स्वयंसेवकाचा नंबर देतो
कुर्ला
कुर्ला
मी अमि....... आमच्या
मी अमि.......
बाकी सजेशनचे वाईट न मानावे. (बोहारणीला द्या.)
आमच्या ऑफिसमध्ये दिवाळीला उपहारगृहात एक बॉक्स ठेवला जातो ...........मी माझ्या मुलींचे तोकडे झालेले कपडे माझे व नवऱ्याचे न वापरणारे कपडे व्यवस्थित प्याक करून तिकडे देते. ते बहुदा असेच सेवाभावी संस्थाना देत असावे.
● सारिका संगिड़वार » मुलुंड ●
● सारिका संगिड़वार » मुलुंड
● संदेश तटकरे #8108508193, शर्मिला यादव व पूनम यादव » भांडुप
● रुपेश तटकरे #8080682205 » मुलुंड ते विक्रोली
● दीपेश कांबळे #9892323553 » घाटकोपर-W
● महेश खेडेकर #8097574009 » घाटकोपर-E
● प्रविण दाभोळकर #9773770507, दिलीप वरेकर #9664138181 » लालबाग ते दादर
● अमेय & सुखदा जोशी #9833998187 » दादर
● किशोर झोरे #7506640338, प्रियंका लाखन » भायखळा ते वरळी
● योगेश चव्हाण #9869404046 » मसजिद, CST
माझे कपडे अति टिकतात. होत
माझे कपडे अति टिकतात. होत नाहीत म्हणून बाजूला ठेवलेले कपडेही मी नीट धुवून इस्त्री करून रचून ठेवते. त्यामुळे माझ्याकडच्या मला न होणार्या कुर्त्यांचा एक गठ्ठा माझ्या असिस्टंटने 'मॅम, मला हे पाहिजेत हां!' करून लंपास केलाय. अजून एक फॅशनेबल स्कर्ट्स, शॉर्टस, टीज वगैरेंचा गठ्ठा एका मानलेल्या भाचीने उचलून नेलाय.
तर कपडे व्यवस्थित टिकत असतील, ठेवणे नीट असेल तर तुमचा ड्रेसिंग सेन्स आवडत असणारी तुमची मैत्रिण, बहीण, भाची, पुतणी कुणाचा तरी डोळा असू शकतो तुम्ही वापरत नसलेल्या तुमच्या कपड्यांवर.
मी असे माझ्या मावशीचे ड्रेसेस कायम ढापायचे. मला काही कमीपणा वाटायचा नाही त्यात.
धन्स कबीर. नवीन वाचक, वाईट
धन्स कबीर.
नवीन वाचक, वाईट वाटण्यासारखे काय आहे त्यात? खरंतर आमच्या ऑफिसमध्येही असे उपक्रम होतात. पण खचाखच भरलेल्या लोकलने कपड्याचे बोचके घेऊन ऑफिसमध्ये जाणे माझ्यासाठी अशक्य आहे.
पण खचाखच भरलेल्या लोकलने
पण खचाखच भरलेल्या लोकलने कपड्याचे बोचके घेऊन ऑफिसमध्ये जाणे माझ्यासाठी अशक्य आहे.>>> हो तेही आहेच .......मी हे शनिवार पाहून नेते सगळे.
अमी तुझे बरेचसे काम कबीर
अमी तुझे बरेचसे काम कबीर ह्यांनी हलके केले आहे.
हो जागु.
हो जागु.
मी आमच्या जवळच्या
मी आमच्या जवळच्या झोपड्यांमध्ये राहणार्या मुलाना हेरून ठेवलेय, मुलाचे कपडे शर्ट पँट (विशेषत: लहान झालेले) व नवर्याचे सुद्धा जरा मोठ्या मुलाना बघून देते, आल्टर करून घ्यायला सांगते ते परवडते त्याना. मुले ते कपडे घालताना दिसतात नि बरे वाटते.
मी सरळ असे वापरण्यायोग्य कपडे
मी सरळ असे वापरण्यायोग्य कपडे पिशवीत भरून दरवाजाबाहेर ठेवते. सकाळी केरवाला घेऊन जातो. तो पुढे काय करतो कुणास ठाऊक पण कुणीतरी वापरतच असणार ना. शिवाय नी म्हणते तसे चांगले ड्रेस, शर्ट घरी काम करणार्या बायकांना देते त्यांची मुले वापरतात. अगदीच वाटले तर अशी पिशवी भरून तयार ठेवायची गाडी काढून कुठे दूर जाताना वाटेत काही गरीब पण गरजू लोक दिसले की देऊन टाकायचे ते कपडे!
कृपया कपडे द्यायचेच असेल तर
कृपया कपडे द्यायचेच असेल तर गरजु लोकांना द्यावे. प्रॉजेक्ट फाँड्रीगृप आपले जुने कपडे घेउन गरजु लोकांना देतात
डिविनिता, माझ्या मुलाचे कपडे
डिविनिता, माझ्या मुलाचे कपडे मी असेच ओळखीत देऊन टाकते. मुलांचे कपडे तर खुप लवकर तोकडे होतात. एक कपडा दोन मुले वापरु शकतात.
बिग बझारचा सेल असतो जुने
बिग बझारचा सेल असतो जुने द्या नवे घ्या तिथे घेउन जाता येइल व त्या बदल्यात नवे कपडे/ वस्तू घेता येतील. पण कारमध्ये घालून तिथपरेन्त नेणे भाग आहे. शॉपर्स स्टॉप पण जुने कुर्ती वगिअरे घेउन नव्यावर काही सूट देतात. म्हणजे डिस्काउंट. नवा सलवार सूट नाही.
बारीक तुकडे करून ते भरून स्टफ्ड टॉइज पण बनवता येतील. पण् डोनेशन बेस्ट. वरील कबीर यांनी दिलेली माहिती हेडर मध्ये अपडेट करावी.
आम्ही महिन्यातून एकदा क्लीनिन्ग स्टाफ कडे अशीच पिशवी देतो.
आम्ही वर्षातून कमीत कमी एकदा
आम्ही वर्षातून कमीत कमी एकदा असा घरातील कपडे वाटपाचा कार्यक्रम रोटरी मार्फत करतोच. अर्थात कुणी न घालण्यालायक कपडे देत नाहीत. स्वच्छ आणि न फाटलेलेच कपडे देतात सगळे. आदिवासी पाड्यांतील मुलांना खरच खुप गरज असते अशा कपड्यांची. एक वर्ष आम्ही स्वत; घेऊन गेलो होतो तेंव्हा झुंबड पडली होती बायकांची. एक मुलगी तिच्या मापाचे मिळाले नाही म्हणून रडत होती. खुप वाईट वाटले तिच्याकडे पाहून तेंव्हापासून ठरवले असे डायरेक्ट नेउन द्यायचे नाहीत. कार्यकर्त्यांमार्फत द्यायचे. ते व्यवस्थित वयोमानानुसार त्यांची वर्गवारी करून वाटप करतात.
अनाथाश्रमातील मुलींना देखील
अनाथाश्रमातील मुलींना देखील गाउन वगैरे धड मिळत नाहीत. पूर्वी एकदा मी फूडवर्ल्ड मध्ये गेले होते तर एक मुलगी असेच विचारत होती गाउन वगैरे आहेत का तिचीच आठवण झाली मला तुमचा बाफ वाचून.
मी यावर्षी नवे कपडे घ्यायचेच नाहीत सर्व जुने सूट्स, साड्या संपे परेन्त वापरायचे असे न्यू ईअर रेसोल्युशन केले आहे. त्यामुळे घरातील क्लटरही कमी होते. पैसे वाचतात. मॉल संस्कृती/ ऑनलाइन शॉपिन्ग व सेल वगैरे मुळे भाराभर कपडे गरज नसताना उगीच घेतले जात आहेत का ते ही बघावे.
म्हणजे तुमचे असे नाही जनरली. ही चूक माझ्याहातून होत असे.
एक मुलगी तिच्या मापाचे मिळाले
एक मुलगी तिच्या मापाचे मिळाले नाही म्हणून रडत होती. >>>>सो स्याड
बिग बझारचा सेल असतो जुने द्या नवे घ्या तिथे घेउन जाता येइल व त्या बदल्यात नवे कपडे/ वस्तू घेता येतील. >>>>>तसे नाही ते लोक कुपन्स देतात ५० / १०० / २०० अशी .......आणि मग आपण खरेदी करताना ती कुपन्स आणि अर्धे आपले पैसे द्यायचे.
माझ्या मुलाचे कपडे मी असेच ओळखीत देऊन टाकते. >>>>>माझी आई आम्ही लहान असताना तिच्या वापरात नसलेल्या साड्या, वडिलांचे जुने कपडे, आमचे न होणारे कपडे, अर्धवट वापरलेल्या वह्या, शाळेची पुस्तके इत्यादी मे महिन्यात गावी जाताना सोबत नेत असे व गावी गावठाणाबाहेर राहणाऱ्या वस्त्यांवर देत असे.
बारीक तुकडे करून ते भरून
बारीक तुकडे करून ते भरून स्टफ्ड टॉइज पण बनवता येतील. पण् डोनेशन बेस्ट. <<<
ते तुकडे करून भरण्याचे सजेशन जे कपडे डोनेट करायच्या लायकीचे नसतात, पुसणी म्हणून त्यांचा वापर होऊ शकत नाही, कापडातला चांगला भाग कापून नवीन ड्रेसमधे वापरायला घेतल्यामुळे चिंध्या उरलेल्या त्यासाठी.
मला पण हाच प्रश्न सतावतोय.
मला पण हाच प्रश्न सतावतोय. पुण्यात गुंज चे कलेक्शन सेंटर नाहिये. आमच्या ऑफिसमध्ये दिवाळीत गुंज चे लोक येत असतात पण गेल्या दिवाळीत आलेच नाहीत. त्यामुळे जवळ जवळ १-१.५ वर्षाचे साठलेले कपडे आहेत. सगळे चांगले आहेत. त्यातले काही वॉचमन, कामवाल्या मेड्स यांना दिले. पण साइझचा प्रशन असतो. प्रत्येकाला आम्चे साइझ होतीलच असं नाही. ते लोकही ऑल्टरेशनवर किती पैसा खर्च करणार?
तर असे कपडे पुण्यात कोणी घेईल का? मी नेऊन देऊ शकते. मला ते कपडे वापरले जावेत असं वाटतं.
दुसरं म्हणजे काही ड्रेसेस ला खुप सुंदर बॉर्डर्स वगैरे असतात. असे ड्रेसेस टाकून द्यायला मला फार जीवावर येतं. पण "काहीतरी करु" म्हणून जमवलेल्या अशा ड्रेसेस चं काय करावं? मला काही बॉर्डर्स कुशन कव्हर्स ला लावायच्या अहेत. पण मला शिवता येत नाही. माझ्या खानदानात कुणाकडेच शिवण्याची मशीनही नाही. कोणी टेलर माहीतेय का जो अशा अतरंगी ऑर्डर्स घेईल?
मी अमि, आम्ही भारतात असताना,
मी अमि, आम्ही भारतात असताना, कपडे व्यवस्थित धुऊन इस्त्री करुन जिथे जवळपास बांधकाम चालु असेल तिथे घेऊन जायचो. मग ज्याला जे हवे ते निवडुन घेऊ देत असु. इथुनही जाताना एखाद बॅग, लहान झालेल्या कपड्यांनी भरुन नेते.
कबीर वेस्टर्न लाइन वर
कबीर वेस्टर्न लाइन वर अंधेरी/विलेपार्ले मध्ये कोणी असे स्वयंसेवक आहेत का ?

बाकी मी माझे जुने कपडे घरात काम करणाऱ्या बायकांना देते
त्या त्यांच्या मुलांना तरी देतात नाहीतर त्यांच्या वस्तीत वाटतात
नताशा, पुण्यात निवारा
नताशा, पुण्यात निवारा वृद्धाश्रमात जुने कपडे स्वीकारतात. हे कपडे विकून आलेले पैसे ते वापरतात. कुठल्याही प्रकारचे (वापरण्याजोगे / फाटलेले) जुने कपडे त्यांना दिलेले चालतात.
Pages