मैत्री संस्था, गेली १३-१४ वर्षे मेळघाटात चालू असलेल्या कुपोषण मृत्यू रोखण्यासाठी काढलेल्या धडक मोहिमांबरोबरच गेली दोन वर्षे डिसेंबर ते मार्च या काळात स्वयंसेवकांच्या मदतीने शैक्षणिक उपक्रमही घेत आहे. पहिल्या वर्षी मैत्रीने मेळघाटातील चिलाटी या ठिकाणी शाळाबाह्य ४० मुलांसाठी १०० दिवसांची निवासी शाळा चालवली. त्या नंतरच्या म्हणजेच मागच्या वर्षी ३ गावांमध्ये असलेल्या जिल्हापरिषदेच्या शाळांबरोबर १०० दिवस काम केले व त्यायोगे सुमारे ७० मुलांपर्यंत आपण पोहोचलो.
नमस्कार,
खुप दिवसांपासुन मला ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्र या धरतीवर काही तरी सुरु करायची इच्छा आहे. त्यात, हास्यक्लब,ज्येष्ठांना सोसवतील असे छोटे व्यायामप्रकार,योगासनं,प्राणायाम तसेच लायब्ररी, कधीतरी एखादी छोटीसी पिकनिक अशा गोष्टींचा अंतर्भाव असेल.
त्याबद्दल मला गाईडन्स हवा आहे.
जयपूरला भर गर्दीच्या रस्त्यावर अपघात झाला. एक अख्खं कुटूंब अपघातात सापडलं.
जयपूर अपघात
पती, छोटा मुलगा जखमी तर पत्नी आणि ६ महिन्याचं बाळं अत्यवस्थ. बाजूने रहदारी चालूच आहे. जखमी माणूस मदतीची याचना करतो आहे, आणि कोणीच मदतीला येत नाही मदतीसाठी थांबत नाही.
अतोनात वाईट वाटले. खूप हेल्पलेस. माणूसकी संपली आहे का खरचं असं वाटत आहे. का झालं असावं असं. आणि असं परत होऊ नये म्हणून काय करता येईल. त्यावेळी काय करता येऊ शकलं असतं. अपघात नुसत्या पहाणार्या लोकांना कमीत कमी काय करता आलं असतं.
तिनिसांजेला माबोवरती एक टोळके वावरते
गझलांवरती दंगल होते, मन माझे अन् गांगरते!!
डू ऐड्यांचे मुडदे पडती, कत्तल होते ऐड्यांची
बिळात लपुनी घाबरलेली मदत समीती हंबरते
हवा वादळी बघून पळती दुसर्या पानावर सारे ;
कधी नव्हे ते जनसंख्येने दुसरे पानहि गुदमरते
मुख्य फरक पडतो गप्पांच्या पानांवरच्या पडिकांना
गझलांवरच्या गप्पांखाली त्यांची चिवचिव चेंगरते
तुला कशाला हवे निमंत्रण? दारे उघडी तुजसाठी!
आत्मघातकी पथक बाँबच्या पायघड्याही अंथरते
थिजलेल्या काळास कुणाची नजर न लागो म्हणून बघ....
आपल्या आजूबाजूला एक असा वर्गही आहे जो परिस्थितीने, शिक्षणाने गरीब आहे - मागास आहे. त्या वर्गातील लोकांसाठी आपण काहीतरी केले पाहिजे ही जाणीव बाळगून त्या दिशेने सदोदित कार्यशील असणारे, एक वेगळी वाट चोखाळणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे प्रगती अभियान सामाजिक संस्थेच्या संचालिका श्रीमती अश्विनी कुलकर्णी.
महाराष्ट्रातील १९९३ च्या भुकंपानंतर त्या भागामध्ये काम करण्यासाठी अनेक स्वयंसेवी संस्था पुढे आल्या. अश्या अनेक स्वयंसेवी संथांमधीलच "स्वयं शिक्षण प्रयोग" ही एक. या संस्थेने जागतीक बँकेचे काम पुर्ण झाल्यावर तेथील महिलांना सक्षम बनवण्यासाठी अनेक प्रकल्प सुरु केले. गेली २० वर्षे त्यांचे हे काम अव्याहतपणे चालु आहे. या संस्थेबद्दल अधिक माहिती http://sspindia.org/ येथे उपलब्ध आहे.
नमस्कार,
दररोजच्या वर्तमानपत्रांमध्ये आपण महाराष्ट्रातील भीषण दुष्काळा बद्दल वाचत असतोच! त्याबद्दल काही करावेसे देखील वाटते. अश्या दुष्काळी परिस्थितीत सरकार काय करते? असा प्रश्न देखील मनात येतोच. सरकारी काम त्यांच्या पद्धतीने चालु असतेच! आपण जर सकारात्मक भुमिकेतुन सरकारी कामाकडे लक्ष दिले, तर आपण आपला खारीचा वाटा उचलु शकतो.
पी. एच. डी नंतर देखील दोन वर्षे शिक्षण घेउन आता शिकायचे काही शिल्लक राहिले नाही, असे समजुन मी भारतात आल्यावर शिक्षकाची नोकरी पत्करली! पण त्या सहा महिन्याच्या कालावधीने एकुनच शिक्षण क्षेत्राकडे बघण्याचा एक नवा दृष्टीकोन प्राप्त झाला
लायकी नसणारे लोक शिक्षण संस्था चालक झाले कि काय होते त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. अन मग ठरवले, स्वतःच शिक्षण क्षेत्रात काही काम करायचे. जुने मित्र होतेच... एक प्रोजेक्ट नव्याने सुरु करत आहे!
(कार्यक्रम वेळ-सकाळी ८ ते दुपारी-२/दिनांक-२४/२/१३ रोजीhttp://maps.google.co.in/maps?hl=hi&q=घनगड&psj=1&bav=on.2,