मायबोली सदस्य सस्मित यांच्या सख्ख्या भावाच्या डोक्याला मार बसल्या कारणाने ऑपरेशनसाठी पैश्यांची गरज आहे. काही पैसे त्यांनी जोडले आहेत. काही जोडायला मदत हवी आहे.
छोटीशी का होईना मदत करायची ईच्छा असल्यास संकोच बाळगू नका. कारण पैश्यापेक्षाही जास्त किंमत त्या वेळेला असते. Anonymously देखील मदत करायचा पर्याय आहे. आर्थिक मदत केल्यास ईथे नोंद करू शकता. किंवा त्यांना विपू वा संपर्कातून मेल करू शकता. अधिक माहितीसाठी त्यांना किंवा मला व्हॉटसप मेसेज करू शकता. हा माझा व्हॉटसप नंबर आहे - 8425888364. अधिक माहितीसाठी संपर्क साधू शकता.
आज सुरेवारसिंगला ट्रकलोड घेवून मध्यप्रदेशातल्या सतना या गावी जायचे होते. नवी मुंबई ते सतना या प्रवासासाठी त्याने मनाची तयारी काल दुपारीच केली होती. साधारण चार दिवसाचा एकूण प्रवास होणार होता. इकडून काहीतरी केमीकल फिल्टर प्लांटचे मशिनरी घेवून तिकडे एका फॅक्टरीत अनलोड करायचे अन तिकडून इंदूरपर्यंत अनलोड येवून इंदूर जवळच्या पिथमपूरहून बजाज टेंम्पोमधून सामान घेवून ते चाकणला उतरवून परत नवी मुंबई. त्याच्या अनुभवाने एखादा दिवस जास्तच लागणार होता हे त्याला जाणवले होते.
आपल्या विशाल मुंबई शहरात व उपनगरांत रोज अनेक अपघात घडतच असतात. पण आज सकाळीच ही बातमी वाचनात आली व मन हेलावून गेले. जान्हवी गडकर ह्या ३५ वर्षीय वकील महिलेने दारुच्या नशेत उलट दिशेने ऑडी गाडी चालवली. ताशी १२०किमी च्या आसपास स्पीड होता. इस्टर्न फ्रीवे हा दिवसा उजेडी पण भरधाव जाणार्या वाहनांमुळे जरा डेंजरसच आहे. पण हा अपघात व जीवित हानी टाळता आली असती.
मूळ बातमी इथे आहे.
http://www.mumbaimirror.com/mumbai/cover-story/Drunk-corp-lawyers-Audi-r...
शक्ती मिलमधील घटनेच्या निमित्ताने ....
या आणि अशा घटना आता सर्रास कानावर येऊ लागल्या आहेत. लोकांची मानसिकता, सिनेमा-टिव्हीचा तरूण पिढीवर होणारा परिणाम, झटपट पैसे, सुख मिळवण्याची लालसा, त्याकरता कसलीही चाड न बाळगता कोणत्याही थराला जाण्याची वाढत चाललेली प्रवृत्ती अशा अनेक घटक याला कारणीभूत आहेत.
कधी तर वाटतं स्त्रिया बलात्काराला न घाबरता गुन्हा नोंदवत आहेत त्यामुळे हे असले गलिच्छ मनोवृत्तीचे गुन्हेगार गुन्हा करायला घाबरण्याऐवजी गुन्हा करून त्या स्त्रीला मारूनही टाकतील. भयंकर त्रास होतो हे सगळं सतत वाचून......
माझ्या मित्राच्या गाडीला पहाटे ३-३.३० च्या दरम्यान स्विफ्ट गाडीने मुद्दाम धडक दिली. त्याच्या घराजवळच्या हॉटेलमधून दारू पिऊन निघालेल्या कारमधली लोक, वेडीवाकडी गाडी चालवता आहेत हे पाहून त्याने गाडी रस्त्याच्या एक्स्ट्रीम डाव्या बाजूला गाडी घेतली. तर त्यांनी मुद्दाम अंगावर गाडी आणली. हे पाहून हा थांबला, तर क्षणभर ते ही थांबले आणि नंतर जोरात रेस करून जाणून बुजून धडक दिली. फरफटवत नेली. त्याचा उजवा हात फ्रॅक्चर आहे, आणि खूप मुका मार, पायांना दृश्य जखमा, सूज अशी अवस्था आहे. त्याच्या जीजाजींनाही लागलेय.
जयपूरला भर गर्दीच्या रस्त्यावर अपघात झाला. एक अख्खं कुटूंब अपघातात सापडलं.
जयपूर अपघात
पती, छोटा मुलगा जखमी तर पत्नी आणि ६ महिन्याचं बाळं अत्यवस्थ. बाजूने रहदारी चालूच आहे. जखमी माणूस मदतीची याचना करतो आहे, आणि कोणीच मदतीला येत नाही
मदतीसाठी थांबत नाही.
अतोनात वाईट वाटले. खूप हेल्पलेस. माणूसकी संपली आहे का खरचं असं वाटत आहे. का झालं असावं असं. आणि असं परत होऊ नये म्हणून काय करता येईल. त्यावेळी काय करता येऊ शकलं असतं. अपघात नुसत्या पहाणार्या लोकांना कमीत कमी काय करता आलं असतं.
काल घडलेली अतिशय सुन्न करणारी घटना.
आनंद अभ्यंकर, अक्षय पेंडसे आणि त्याच्या दोन वर्शाच्या मुलाचं पुणे मुंबई एक्सप्रेस वे वर झालेलं अपघाती निधन.
या आधीपण अशा कितीतरी मंडळींना अपघातात आपला जीव गमवावा लागला आहे. हे फक्त एक्सप्रेस वे वर होतं आहे असं नाही, पुण्यात रोज एकतरी अशी बातमी असते. मुंबईत हिट & रन केस असतेच असते.
२००४ मोठ्या मुलाला एक सकाळचे काम मिळाले होते. धाकट्याला कॉल सेंटरचे काम मिळाले होते त्यामुळे ६००० घराचे भाडे व घर खर्च फारसे त्रासदायक भासत नव्हते. मुलांचे रात्री अपरात्री घरात येणे जाणे त्यामुळे सगळे वातावरण बिघडलेले होते. ह्या सगळ्याचा परिणाम घरात अशांतता जाणवत होती. कॉल सेंटरचे कधी रात्रीचे ९ वाजता तर कधी पहाटे ३ वाजता काम मुलाला झेपत नव्हते. त्यामुळे दिवसभर तो झोपेत असायचा. एका सुटीच्या दिवशी सकाळी ११ वाजता मित्रा कडे जातो म्हणून घरातून निघाला तासाभरात मोठ्या मुलाला त्याचा फोन आला म्हणून मोठा घरातून बाहेर गेला. अर्ध्या तासाने घाबरेला मोठा मुलगा घरात आला.
हा दोष कुणाचा
माझ्यामधील संस्कारांचा कि
कायद्याला भिऊन रहा या शिकवणीचा,
माझ्यातील हळवेपणाचा कि
चाकोरीबाहेर पाउल न टाकणार्या भित्रेपणाचा,
हा दोष कुणाचा
तुझ्यामधील मस्तीचा कि
मन मानेल तसे वागणार या बेदरकारपणाचा,
तुझ्यातील उन्मत्तपणाचा कि
चाकोरीबाहेरचे जीवन जगणार्या जोषाचा,
हा दोष कुणाचा
माझ्यामधील अवयवांचा कि
सहन करु शकले नाहीत आक्रोश वेदनांचा,
माझ्या डोक्यातील विचारांचा कि
स्तब्धच झाले अर्थ न जाणवे यातनांचा
हा दोष कुणाचा
माझ्यामधील सुरिक्षत कारचालकाचा कि
नियम पाळून दुखावल्या गेलेल्या मनाचा,
हा दोष कुणाचा
तुझ्यातील बेफाम वेगाचा कि
अपघात करूनही शीळ वाजिवणार्या तारुण्याचा