माझ्या मित्राच्या गाडीला पहाटे ३-३.३० च्या दरम्यान स्विफ्ट गाडीने मुद्दाम धडक दिली. त्याच्या घराजवळच्या हॉटेलमधून दारू पिऊन निघालेल्या कारमधली लोक, वेडीवाकडी गाडी चालवता आहेत हे पाहून त्याने गाडी रस्त्याच्या एक्स्ट्रीम डाव्या बाजूला गाडी घेतली. तर त्यांनी मुद्दाम अंगावर गाडी आणली. हे पाहून हा थांबला, तर क्षणभर ते ही थांबले आणि नंतर जोरात रेस करून जाणून बुजून धडक दिली. फरफटवत नेली. त्याचा उजवा हात फ्रॅक्चर आहे, आणि खूप मुका मार, पायांना दृश्य जखमा, सूज अशी अवस्था आहे. त्याच्या जीजाजींनाही लागलेय. पण पोलीस कंप्लेंट केल्यानंतरही, त्यांनी पक्की एफ आय आर लिहून घेतलेली नाही, चौकशीसाठी आले असतांना, पोलीस त्याच गाडीतून बसून आले होते. हे लक्षात आले. याचा अर्थ त्यांची ऑलरेडी सेटलमेंट झालेली आहे. वर तक्रार करावी की नाही? कुणी ऐकेल का? आणि काय प्रोसिजर करता येईल? ही घटना रविवारी पहाटे घडलीय.
हिट अॅंड रन मधील विक्टीमची मदत कशी करावी?
Submitted by हर्षल_चव्हाण on 2 June, 2013 - 15:40
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
तुमच्याकडे ४ चाकी आहे का
तुमच्याकडे ४ चाकी आहे का ?
असेल तर बरे झाला की लक्ष ठेवून त्यांना धडक मारा ...१-२ महिने होउ द्या अॅडमीट..
१. पोलिस स्टेशन ला जाण्यापूर्वी वकील घेउन जावा.
२. मिडीया मध्ये पोलिस मॅनेज झाल्याची बातमी पसरवा..
३. मुख्यमंत्र्यांना , गृह मंत्र्यांना पत्र लिहा ..त्याची एक प्रत पोलिस स्थानका मध्ये द्या..त्याची पोच पावती घ्य कमिशनर इत्यादी व्यक्तींना सुद्धा लिहा ..( नंतर न्यायालयात , पेपर मध्ये द्यायला उपयोगी पडतात )
४. जर कारवाइ झाली नाही तर तुम्ही न्यायालयात जाउ शकता..
५.पोलिसांकडे कोणतीही गोष्ट लिखित मागा ..अर्ज देताना लिखित द्या..प्रती वर पोच घ्या
६. स्थानिक आमदार, नगर सेवक यांची मदत घेउ नका ...ते सर्व सेटल मेंट करतात..
७. डॉ़क्टरचे प्रमाणपत्र आताच घ्या ...नंतर ते नाही म्हणतात.
*संयम , सहन शीलता यासाठी विरुद्ध , सारांश इत्यादी चित्रपट बघत चला ..
हर्षल सी, मित्राचे मेडिकल
हर्षल सी, मित्राचे मेडिकल रिपोर्ट, त्याच्या अंगावरच्या जखमांचे फोटोग्राफ्स, ही घटना प्रत्यक्ष पाहिलेल्या व्यक्तींची स्टेटमेन्ट्स, गाडीचे झालेले नुकसान, गाडीचे अगोदरचे व अपघातानंतरचे फोटो व झालेल्या नुकसानाबद्दलचे रिपोर्ट्स, मित्राच्या वैद्यकीय उपचारांचा खर्च - पावत्या, डॉक्टर्सचे काही लिखित स्वरूपात प्रमाणपत्र मिळाल्यास ते या सर्व गोष्टी रेकॉर्डसाठी आवश्यक आहेत. त्यानुसार ते रेकॉर्ड मित्राला ठेवायला सांगा. ओळख तर अवश्य काढाच. नगरसेवक, सरकारी उच्चपदस्थ अधिकारी किंवा समाजातील जबाबदार - प्रतिष्ठित नागरिक यांपैकी कोणाशी ओळख असेल तर ती अशा वेळी कामी येतेच. पोलिसांत ओळख असेल तर अजून चांगले. ओळखीमधून प्रोसिजर काय असते ते समजावून घ्या. एफ आय आर दाखल करायचा असेल तर त्यासाठी काय काय आवश्यक आहे हे जाणून घ्या व सर्व तयारीनिशीच पुढच्या हालचाली करा. वकिलांचा सल्ला जरूर घ्या. ऑल द बेस्ट!
हर्ष.. मित्राची काळजी घे आणि
हर्ष.. मित्राची काळजी घे आणि ऑल द बेस्ट!
काय बोलणार ...... आम आदमी
काय बोलणार ......
आम आदमी पार्टीला वोट द्या पुढच्या इलेक्शन मध्ये.
तुमच्या मित्राची तब्येत लवकर बरी होउ दे हि प्रार्थना!
पण पोलीस कंप्लेंट
पण पोलीस कंप्लेंट केल्यानंतरही, त्यांनी पक्की एफ आय आर लिहून घेतलेली नाही,<<< पक्की एफ आय आर लिहून घ्या. यासाठी पोलिस स्टेशनमधे जातानाच वकील घेऊन जा. ओळख असेल तर एक दोन पत्रकार पण घेऊन जा. न्युज चॅनलवाले असल्यास उत्तम. त्यांचा कॅमेरा ऑन झाला की बरीचशी अडलेली कामे मार्गी लागतात हा स्वानुभव.
अवघड आहे! अन सगळीकडे हीच
अवघड आहे! अन सगळीकडे हीच परिस्थिती आहे बळी तो कान पिळी
अरेरे, म्हणजे 'तक्रार करणे'
अरेरे, म्हणजे 'तक्रार करणे' इतक्या साध्या हक्कासाठी सुद्धा ओळख असावी लागते का? कठीण आहे.
वकीलांना घेऊन जा व तक्रार
वकीलांना घेऊन जा व तक्रार पक्की करता येते का बघा.नाहितर मॅजिस्ट्रेटकडून ऑर्डर घेऊन ती दाखवा ,तक्रार दाखल करावीच लागेल.
गाडीचा नंबर लिहून घेतलाय का.
गाडीचा नंबर लिहून घेतलाय का. त्यावरुन शोध घ्या. पोलिसांना आणि इतर कुणालाही पत्रे पाठवाल ती स्पीड पोस्टनेच पाठवा. ( मुख्यमंत्री, गृहमंत्री, वर्तमानपत्रे ) आणि न्यूज चॅनेल कडे अवश्य जा.
शक्य तितके पुरावे जवळ ठेवा. पुढे उपयोगी पडतील. एकदा कोर्ट केस केली तर तूमच्याशी पण सेटलमेंट करायला येतील. जिथे जॉन अब्राहम / सलमान खान अशा आरोपातून सुटू शकलेले नाहीत, तिथे बाकिच्यांचा बचाव होईल,
हे शक्य नाही. नेटाने प्रयत्न करा.
अरेरे, म्हणजे 'तक्रार करणे'
अरेरे, म्हणजे 'तक्रार करणे' इतक्या साध्या हक्कासाठी सुद्धा ओळख असावी लागते का? कठीण आहे
खरेच.. आम्ही तर कुठेही ओळख नसलेले सामान्य नागरीक आहोत, असे काय झाले तर मग झालेच, गुमान चुप्प बसावे लागेल...
कठिण आहे.
कठिण आहे.
खरेच कठीण आहे.
खरेच कठीण आहे.
'तक्रार करणे' इतक्या साध्या
'तक्रार करणे' इतक्या साध्या हक्कासाठी सुद्धा ओळख असावी लागते का? >> ओळख असली तर फायदा नक्कीच होतो. पण ओळख नसेल तरीसुद्धा जर तुम्ही तुमच्या मागणीवर ठाम असाल तर त्यांना तक्रार दाखल करून घ्यावीच लागेल. आणि FIR ची कॉपी हातात आली की तिथून धन्यवाद म्हणून सरळ निघून यायचे. किती द्यायचे वगैरे विचारायचे नाही (त्यांनी कितीही तोंड वाकडं केलं तरी).
वकिलाला विचारून कसल्याप्रकारचा गुन्हा नोंदवायचा ते विचारून घ्या (दखलपात्र की अदखलपात्र).
मदती-साठी किती त्रास करून
मदती-साठी किती त्रास करून घेण्याची तयारी आहे? न्यायासाठी किती अन्याय सोसायची तयारी आहे? न्याय मिळाला नाही तर आयुष्यातील हा कटू अनुभव विसराल का?
असे उगाच कोणालाही ठोकायचं
असे उगाच कोणालाही ठोकायचं
आपली काहिही चूक नसताना एवढा मानसिक व शारिरीक त्रास? कठीण आहे खरचं
प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद.
प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद. मित्राच्या हाताचं ऑपरेशन झालं बुधवारी. त्याच दिवशी त्याच्या घरच्यांनी डीसीपींशी ओळख काढून तक्रार नोंदवण्यासाठी त्या कॉन्स्टेबलला भाग पाडलं. तर त्याने फोन करून "तुम्ही माझ्या सिनिअर्सकडे कशी तक्रार केलीत?" असे म्हणून धमकावण्याचा प्रयत्न केला. पण त्याला जबाब घेणं भाग पडलं. आमच्या हातात अजुनही एफआयआरची प्रत आली नाहीये. पण त्याचे आईवडील वकील, कोर्ट कितपत करण्यास तयार होतील, किंवा त्या सगळ्याचा होणारा त्रास त्यांना झेपेल हे अजुनही स्पष्ट नाही, कारण तो एकुलता एक आणि ते दोघेही रीटायर्ड शिक्षक आहेत. याबाबत कशी मदत होऊ शकेल. पोलीस केवळ तपास चालू आहे एवढंच सांगणार. कोर्ट कचेरीला खूप वेळ लागणार. मित्राची अवस्था अजुनही आधाराशिवाय चालता येण्यासारखी नाही. सोशल मिडीयाचा किंवा प्रिंट आणि टीव्हीचाही कसा उपयोग होईल? गोष्टी स्पीड अप होऊ शकतात का? हे सगळं करतांना त्याच्या परीवाराच्या सुरक्षिततेची खात्री हा प्रश्न येतो. वाईट याचं वाटतं की त्या कॉन्स्टेबलला सगळं माहीत असूनही, तो प्रत्येक वेळी एकच गोष्ट सांगतो, "तुम्ही आपला मुलगा जीवंत आहे यात धन्यता माना... कशाला या लफड्यात पडता..."
कोर्टात जाव लागणार असेल तर
कोर्टात जाव लागणार असेल तर दहा वेळा विचार करा... साध्या साध्या केसेस टेक्स मेनी इअर्स ... 'डेट पे डेट' हा सनीचा डायलोग आठवा तो आजही खरा आहे. पैश्या परी पैसा जाइल + मनस्ताप + सत्विक चिडचिड इतक करून न्याय मिळेल ह्याची हमी शुन्य! त्यातुन जर गाडि चालवणारे लोकल गुंड किंवा कुठल्याही राजकिय पक्षाने पोसलेले असतील तर अजुनच अवघड....
सोशल मिडीयाचा किंवा प्रिंट
सोशल मिडीयाचा किंवा प्रिंट आणि टीव्हीचाही कसा उपयोग होईल? गोष्टी स्पीड अप होऊ शकतात का? >> होतो.
काहीही करून "योग्य" एफआरआय करून घ्याच.
योग्य म्हणजे, आवश्यक ती कलमं लागू करून. नाहीतर पोलिस ते करत नाहीत, म्हणून गुन्हेगार सुटतात.
अगदी चिडचिड आहे भारत म्हणजे ह्या (ही) बाबतीत. फ्रस्ट्रेशन येतं..
फार वाईट अनुभवातून गेल्यानंतरचा सल्ला आहे हा.
सोशल मिडीयाचा किंवा प्रिंट
सोशल मिडीयाचा किंवा प्रिंट आणि टीव्हीचाही कसा उपयोग होईल? गोष्टी स्पीड अप होऊ शकतात का? ><<< उपयोग चिक्कार होतो, पण सावधानतेने केला पाहिजे. सोशल मीडीयापेक्षा टीव्ही आणि प्रिंटवाल्या लोकांना आधी बोलवा, ते रिपोर्टर पक्के तयार असतात, बरोबर पकडीत आणतात समोरच्याला खास करून पोलिस आणि नगरसेवकांना. मात्र, बातमी छापून आणायचे पैसे वगैरे विचारले तर बाहेरचा रस्ता दाखवा.
"न्याय हवा आहे" म्हणजे नक्की कशापद्धतीने ते स्वत:शीच ठरवा, कायद्याने शिक्षा व्हायला हवी, नुकसानभरपाई व्हायला हवी, औषधोपचारांचा खर्चाची जबाबदारी घ्यायला हवी की माफी मागायला हवी, की अजून काही ते आधी ठरवा, मग लढाई कशी लढायची त्याचे डावपेच आखता येतील.
हे सगळे वाचुन अरुण साधू यांची
हे सगळे वाचुन अरुण साधू यांची एक कथा आठवली ग्लानिर्भवती भारत: कथासंग्रहातली....
मात्र, बातमी छापून आणायचे पैसे वगैरे विचारले तर बाहेरचा रस्ता दाखवा
विश्वास बसणार नाही पण हेही होते आणि आपण विचारले तर सरळ अशी पद्धतच आहे म्हणुन सांगतात हे लोक.
भयंकर आहे हे सगळे. दुर्दैवी
भयंकर आहे हे सगळे. दुर्दैवी आहे. ही मोगलाईच म्हणायची, दुसरे काय?
हिट अॅण्ड रनसाठी ३०४ कलम
हिट अॅण्ड रनसाठी ३०४ कलम लावण्यात येते, ज्यानुसार व्हिक्टीमचा मृत्यू झाला तरी २ वर्ष शिक्षा किंवा दंड किंवा दोन्ही होतील. याच्या केसमध्ये दारू पिऊन गाडी चालवणे, चुकीच्या दिशेने गाडी चालवणे आणि मुद्दाम ठोकून पळून जाणे याबरोबरच रात्री ३ वाजेपर्यंत दारू सर्व्ह करणार्या त्या हॉटेलवर कार्रवाई होणे अपेक्षित आहे. मात्र हॉटेल यात कुठेच येत नाही, त्यांचा हफ्ता घेतलेला असतो रात्री १-२ च्या दरम्यानच.
यासाठी कुठली कलमे योग्य असू शकतील? कुणी मदत करू शकेल काय?
विश्वास बसणार नाही पण हेही
विश्वास बसणार नाही पण हेही होते आणि आपण विचारले तर सरळ अशी पद्धतच आहे म्हणुन सांगतात हे लोक.<<< साधना, माझा विश्वास काहून बसणार नाही? हम इस सिस्टीमसे गयेगुजरे है.
कोर्टात भरपूर वेळ जाणार आहे.
कोर्टात भरपूर वेळ जाणार आहे. लोकन्यायालय भरले तर तडजोड होऊ शकेल. निदान खर्च तरी भरून मिळेल.
लक्षात ठेवा, आपल्या न्यायपद्धतीत आरोप सिद्ध करण्याची पूर्ण जबाबदारी फिर्यादीवर असते. त्यालाच आरोपीच्या उलटतपासणीला तोंड द्यावे लागते. वकीलांना कुठलेही प्रश्न विचारायची मुभा असते.
त्यामूळे त्यासाठी मानसिक आणि कगदोपत्री तयारी बरीच करावी लागते.
पोलिसात गेलात तर त्यांनी चार्जशीट नीट आणि वेळेवर दाखल करावी यासाठी प्रयत्न करावे लागतात. सर्व कागदपत्रे त्याचवेळी जोडायची असतात ( नंतर जोडता येत नाहीत. ) त्यामूळे पोलिसांचे सहकार्य "मिळवावेच" लागेल.
आरोपीला कोर्टात प्रत्येक तारखेला हजर राहणे बंधनकारक आहे. फिर्यादीला मात्र प्रत्यक्ष सुनावणी सुरु झाल्यावरच हजर रहावे लागते. तोपर्यंत वकील कोर्ट संभाळेल, असाच बघायचा. खरंतर तडजोडीसाठी पण तो मदत करु शकेल.
मित्राची पर्सनल अॅक्सिडेंट
मित्राची पर्सनल अॅक्सिडेंट पॉलिसी होती का / लाईफ पॉलिसी मधे तो क्लॉज होता का ? त्यांच्याकडे पण क्लेम करता येईल.