नमस्कार मायबोलीकर,
दरवर्षी महिला दिनाच्या निमित्ताने मायबोली-संयुक्ता-सुपंथ परिवारातर्फे गरजू संस्थांसाठी मदत गोळा केली जाते. मायबोलीकरांच्या समृद्ध सामाजिक जाणिवांचे व जबाबदारीच्या भावनेचे या उपक्रमातून उत्कृष्ट दर्शन होत असते.
सामाजिक उपक्रमांत कोणकोणत्या संस्था मदतीसाठी निवडाव्यात ह्याबद्दल नेहमीच पेच असतो. ज्या संस्थेत आपण गोळा केलेली मदत वस्तूरूपात देणगी म्हणून देता येईल अशा संस्था शोधणे, त्यांची काय गरज आहे याचा आढावा घेणे, त्यानुसार आपण करावयाच्या मदतीचे स्वरूप ठरविणे इत्यादी काम संयुक्ताच्या सदस्या दर वर्षी आवडीने व उत्साहाने करतात.
गेले वर्षभर आपण मायबोलीच्या संयुक्ता सुपंथ परिवारातर्फे ह्या ना त्या रूपात पुण्यातील सावली सेवा संस्थेच्या गरजू मुलामुलींना शैक्षणिक मदत करत आहोत. परंतु या संस्थेच्या विश्वस्त मृणालिनीताई भाटवडेकर व संस्थेच्या देखभालीतील काही मुलांना भेटायचा माझा योग आला तो मायबोलीकरीण रुनी पॉटर हिच्या पुणे भेटीत! या भेटीचा हा वृत्तांत व अनुभव मांडण्याचा प्रयत्न केलाय!
स्थळ : पुण्यातील सुप्रसिद्ध बी. एम. सी. सी. कॉलेजचे टाटा सभागृह. सकाळची वेळ. खच्चून भरलेल्या सभागृहातील तरुण विद्यार्थिनींमध्ये उत्सुकता, कुतूहल व कार्यक्रम सुरू होण्याअगोदरची अस्वस्थ चुळबूळ. थोड्याच वेळात कार्यक्रमाला सुरुवात होते. पांढरे टी-शर्ट व निळ्या जीन्स या वेशातील तरतरीत कॉलेज कन्या मायक्रोफोनचा व मंचाचा ताबा घेतात. समोरील श्वेतपटावर सरकणार्या अतिशय नाजूक व संवेदनशील विषयावर आधारित चित्रांसोबत दिल्या जाणार्या माहितीचे गांभीर्य लक्षात येताच सभागृहातील अस्वस्थ चुळबूळ थांबते व सार्या श्रोत्या तरुणी - स्त्रिया बघता बघता कार्यक्रमाच्या विषयात समरस होऊन जातात...
अब्दुल लाट, कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यातलं एक छोटं गाव. या गावाचं नावच फक्त वेगळं नाहीये तर इथले प्रयोगही वेगळे आहेत. काही वर्षांपूर्वी विद्यार्थी विकास प्रबोधिनीच्या माध्यमातून बालोद्यान नावाचा अनाथाश्रम सुरू केला गेला. या प्रयोगात गावातून बाहेर नोकरी, शिक्षणाच्या निमित्ताने गेलेले अनेक लोक सहभागी झाले. हे माझं आजोळ. मालदीवच्या भारतीय दूतावासाचे उच्चायुक्त ज्ञानेश्वर मुळे, कुलभूषण बिरनाळे, जितेंद्र चुडाप्पा, राजेंद्र देसाई, राजकुमार कारदगे अशी अनेक नावं त्यात आहेत.
झोपडी तिथे बालवाडी।
मूल तिथे शाळा।
चाकांवरती पुस्तकमेळा।
आली आली दारी शाळा॥
वर्तमानपत्रात छोट्या जाहिरातींमध्ये एक ठळक अक्षरातील जाहिरात लक्ष वेधून घेते : वधू पाहिजे, वर सुशिक्षित/ उच्चशिक्षित, परदेशात कायमचे वास्तव्य / ग्रीन कार्ड, स्वतःचे घर, गाडी इत्यादी इत्यादी, कोणतीही जबाबदारी नाही.... वधूबद्दल अपेक्षा....
आणि मग एवढ्या माहितीच्या आधारे अनेक वधुपिते त्या स्थळाच्या मागे लागतात. भराभर सोयीच्या तारखांना भेटीगाठी ठरविल्या जातात, चट मंगनी पट ब्याह होतो, नवरा-नवरी परदेशी त्यांच्या घरी रवाना होतात, किंवा नवरा अगोदर जातो - नवरी काही कालाने व्हिसा वगैरे औपचारिकता पूर्ण करून मग जाते. सारे काही आलबेल होते. पण ते तसे खरेच होते का?
..............................................................................................................................................
..............................................................................................................................................
सत्तर वर्षाच्या डॉ. सिंग यांना दोन वर्षांपूर्वी पत्नीशोक झाला. पण आपला मुलगा, सून व नातू यांच्या सहवासात आपले दु:ख कमी होईल असे त्यांना वाटले. पण खरे दु:ख तर पुढेच होते. आपल्याच मालकीच्या घरात डॉ. सिंगांना हळूहळू जगणे असह्य झाले. मधुमेहाचे रोगी असलेल्या डॉक्टरांच्या खाण्यापिण्याच्या वेळा, घरातील वावरणे, घरातील व्यवहारांत सहभाग याविषयी त्यांच्याच घरच्यांनी उदासीनता दाखवायला सुरुवात केली. नियमित वेळेला खाणे, पथ्य वगैरे तर राहूच दे, पण त्यांनी काही सांगितलेलेही घरच्यांना पटेना. गोष्टी एवढ्या थराला गेल्या की डॉ.