सन २०११ मध्ये मायबोलीच्या संपर्कातून डॉ. कैलास गायकवाड यांची मेडिकल टीम व आमचा इनरव्हिल क्लब ऑफ उरण यांच्या वतीने उरण येथील महिलांसाठी गर्भपिशवीचा कर्करोग व हिमोग्लोबिन चेकअपचे मोफत शिबीर आयोजीत केले होते. त्यात एका उरण मधील महिलेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. ह्या शिबिरामुळे तिच्या हा आजार लक्षात येऊन तिने तातडीने उपचार घेतले.
नमस्कार,
गेली ३ वर्षे महिला दिनानिमित्त मायबोली-संयुक्ता-सुपंथ तर्फे गरजू संस्थांना वस्तू स्वरूपात मदत करण्याचा उपक्रम चालवला जातो. ह्या वर्षी पण हा उपक्रम होणार आहे पण उपक्रमाचे स्वरूप थोडेसे वेगळे ठेवत आहोत. आशा आहे उपक्रमाला अजून जास्त प्रतिसाद मिळेल.
वेगळेपणा काय असेल?
१. दोन प्रकारे उपक्रम राबविला जाईल.
- आर्थिक मदत - ज्यात दरवर्षीप्रमाणेच गरजेच्या वस्तू विकत घेऊन संस्थेला दिल्या जातील.
- श्रमदान/बुद्धी दान वगैरे... ज्यात आर्थिक मदतीची गरज नसेल
'मैत्री शाळा १०० दिवसांची - मुलांच्याच गावी' (मेळघाट २०१२ – २०१३)
स्वयंसेवक हवेत.
नमस्कार!
गेल्या १५ वर्षांपासून पुणेस्थित 'मैत्री' नावाची एक संस्था, प्रामुख्याने, मेळघाटात कुपोषणामुळे मोठ्या प्रमाणावर होणारे बालमृत्यु टाळण्यासाठी व इतर भेडसावणारे विविध प्रश्न सोडवण्यासाठी कार्यरत आहे. (अधिक माहितीसाठी भेट द्या - www.maitripune.net) तेथे पावसाळ्यात होणारे बालमृत्यूचे प्रमाण खूप जास्त असते, त्याकरता, आखून घेतलेल्या कार्य़क्षेत्रामधे 'शुन्य बालमृत्यु' हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन, धडक मोहीमा आखणे व त्याची अंमलबजावणी करणे हे काम करण्यात येत आहे.
प्रत्येक आई-वडिलांना आपल्या पाल्याने शिकून मोठे व्हावे, नाव कमवावे असे वाटत असते आणि असे सामान्यतः घडतही असते. पण ज्योतीताईंच्या बाबतीत उलटे झाले. दीपाने आपली आई,ज्योतीताईंना शिकविले ते मोठे होण्यासाठी किंवा नाव कमाविण्यासाठी नाहीतर त्यांना त्यांच्या नातवाला योग्य प्रकारे शिकविता येण्यासाठी. त्यांनी कॅलिफोर्निया विद्यापीठात शिक्षण घेतले त्या वेळेला त्या वयाच्या अश्या टप्प्यावर होत्या की पूर्वीच्या बायकांप्रमाणे हातात जपमाळ ओढत रामराम करत बसण्याच्या किंवा आजच्या काळाप्रमाणे भिशी पार्ट्या, महिला मंडळ किंवा आपले छंद जोपासण्याच्या. ज्योतीताईंचे सुखी चौकोनी कुटुंब. सचिन व दिपा अपत्ये.
नितेश बनसोडे हा तरुण अहमदनगरमध्ये अनाथ, निराधार मुलांसाठी 'सावली बालसदन' चालवतो. 'बदलाची सुरुवात स्वतःपासून झाली पाहिजे,' हे त्याचं ब्रीद आहे. मी जर बदल करू शकलो तरच सर्वजण बदल करायला तयार होतील, असं तो मानतो. लहानपणापासून नितेश फक्त विचार करायचा - समाजाचं परिवर्तन झालं पाहिजे, समाज बदलला पाहिजे, गुंडगिरी संपली पाहिजे, वगैरे वगैरे. पण हे कसं होणार, कोण करणार ते कळत नव्हतं. आपण काय करू शकतो, हेही कळायचं नाही तेव्हा. फक्त काहीतरी केलं पाहिजे एवढंच कळायचं.
टीप : माझे डोळे नुकतेच उघडलेत. सर्वांचे उघडावेत या सदिच्छेपोटी हा लेखनप्रपंच. उपरोध, उपहास या प्रकाराशी माझा संबंध येत नसल्याने सर्व लिखाण नम्रतेने वाचावे.
शाळा शिकून जे शिकलो त्यामुळे नोकरीचे विचार सतत मनात घोळत असतानाची गोष्ट. कुणी सरकारात गेला, कुणी मल्टीनॅशनल मधे गेला कुणी नुकत्याच जम बसलेल्या आयटी क्षेत्रात गेला तर कुणी मनपा, रेशन कार्ड, जमीन महसूल खाते अशा ठिकाणी गेला. ज्याला कुठेच काही संधी मिळाली नाही त्यांच्याशी काही वर्षे संपर्क राहीला मात्र त्यांच्या अडचणींची जंत्री वाढत गेल्याने सगळेच सेटल्डस त्यांना टाळू लागले. सहानुभूती मात्र होतीच !!
आपण किती तक्रारी करत असतो सतत. एखादी गोष्ट मनाप्रमाणे झाली नाही म्हणून. नोकरी-धंद्यात प्रश्न उभे राहिले म्हणून. आर्थिक आणि शारिरिक दुखणी उद्भवली म्हणून. वीज-रस्ते-पाणी भरपूर मिळत नाही म्हणून. सरकार आणि प्रशासन नालायक आहे म्हणून. प्रेमभंग झाला म्हणून आणि आज जेवण फार बरं नाही मिळालं म्हणूनही.
खरं तर हे सारं आपण हातीपायी धड असतो म्हणून. तसे नसतो तर काय झालं असतं? सोपं आहे- देवाने दुसरं काही दिलं नाही तरी चालेल, पण हे नशीबात नको द्यायला होतं- असं रोज वाटलं असतं.
आनंदवनातल्या रहिवाशांसाठी पुस्तकांची आवश्यकता आहे.
आनंदवनात 'स्नेहसावली' हा कुष्ठरुग्णांचा वृद्धाश्रम आहे. इथे साधारण ६५० ज्येष्ठ कुष्ठरुग्ण राहतात. शिवाय आनंदवनात मुकबधिरांसाठी व सुदृढ मुलांसाठी शाळा आहेत. आनंदवनातल्या या रहिवाशांसाठी सुसज्ज ग्रंथालय असावं, अशी इच्छा आहे.
यासाठी घरातली जुनी किंवा नवीन पुस्तकं देणगी म्हणून मिळू शकतील का? पुस्तकांना विषयाचं, किंवा वयोगटाचं बंधन नाही. 'लोकप्रभा', 'सा. सकाळ', 'अनुभव', 'माहेर', 'मेनका', 'तनिष्का', 'चित्रलेखा' अशा मासिकांची वर्गणी आनंदवनासाठी भरून ही मासिकं तिथे नियमितपणे मिळण्याची व्यवस्थाही करता येईल.
भारतीय राज्यघटनेनं प्रत्येक मुलाला शिक्षणाचा अधिकार दिला आहे. म्हणजेच, कोणत्याही सामाजिक, आर्थिक, तांत्रिक, अथवा वैयक्तिक कारणांवरुन कोणत्याही मुलाला सरकारी शाळांमधून प्रवेश नाकारला जाणार नाही. तसेच, शाळा-प्रवेशासाठी किंवा शिक्षणासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क अथवा देणगी मागितली जाणार नाही. उलट शासकीय योजनेतील गणवेष, दप्तर, पुस्तकं इत्यादी सोयींचा लाभ प्रत्येक मुलाला घेता येईल. वय वर्षे सहा ते चौदा वयोगटातल्या मुला-मुलींना मोफत व सक्तीचं शिक्षण देण्याची तरतूद अलिकडेच अंमलात आलेल्या शिक्षणहक्क (राइट टू एज्युकेशन) कायद्यात करण्यात आली आहे.
नशिबाने जरी जग दाखवणे नाकारले तरी आपल्या मनःचक्षूंनी जग पाहू इच्छिणार्या दृष्टीहीनांसाठी तिसर्या डोळ्याच्या रुपात आपुलकीने मदतीचा हात पुढे करण्यार्या नाशिकच्या 'थर्ड आय असोसिएशन' (पुर्वाश्रमीची थर्ड आय फाऊंडेशन) या दृष्टीहीनांसाठी, विशेषतः दृष्टीहीन विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी कार्यरत असलेल्या संस्थेची, आणि संस्थेच्या कामाची ओळख मायबोलीकरांना करून देण्याचा हा माझा प्रयत्न! गेली १४ वर्षे विविध अडचणींवर मात करून नेटाने आपल्या ध्येयाकडे वाटचाल करणार्या या संस्थेच्या संचालिका आहेत - सौ. वीणा श्रीकांत सहस्रबुद्धे!