नमस्कार,
गेली ३ वर्षे महिला दिनानिमित्त मायबोली-संयुक्ता-सुपंथ तर्फे गरजू संस्थांना वस्तू स्वरूपात मदत करण्याचा उपक्रम चालवला जातो. ह्या वर्षी पण हा उपक्रम होणार आहे पण उपक्रमाचे स्वरूप थोडेसे वेगळे ठेवत आहोत. आशा आहे उपक्रमाला अजून जास्त प्रतिसाद मिळेल.
वेगळेपणा काय असेल?
१. दोन प्रकारे उपक्रम राबविला जाईल.
- आर्थिक मदत - ज्यात दरवर्षीप्रमाणेच गरजेच्या वस्तू विकत घेऊन संस्थेला दिल्या जातील.
- श्रमदान/बुद्धी दान वगैरे... ज्यात आर्थिक मदतीची गरज नसेल
२. ह्या वर्षी मायबोलीवरील सर्वांच्याच सहकार्याने आपण गरजू संस्थांची निवड करणार आहोत.
तुमच्यापैकी बरेचजण आर्थिक अथवा श्रमदानाच्या स्वरूपात गरजू संस्थांना मदत करत असाल. त्या संस्थेबद्दल तुम्हाला आपुलकी वाटत असते. मग त्यात इतरांना पण सामील करून घेऊन संस्थेला जास्त फायदा का करून देऊ नये?
ध्यासपंथी पाउले ह्या अंतर्गत बर्याच मायबोलीकरांनी त्यांनी भेटी दिलेल्या संस्थांबद्दल उत्तम लेख लिहिले आहेत. त्याशिवाय अजूनही खूप मायबोलीकर काही संस्थांशी संलग्न असतील ज्यांची आपणांस माहिती नाही.
तर तुम्हाला एखादी अशी संस्था माहीत असेल तर ह्या धाग्यावर त्याची थोडक्यात माहिती लिहा. आलेल्या सर्व माहितीपैकी जी/ज्या संस्था जास्त गरजू असेल त्यांना ह्या उपक्रमाद्वारे मदत करण्यात येईल.
जेवढी जास्त मदत वरील दोन्ही उपक्रमात गोळा तितक्या जास्त संस्थांपर्यंत आपल्याला पोचता येईल.
वर नमूद केल्याप्रमाणे अर्थातच आर्थिक वा श्रमदान ह्यापैकी कोणत्याही स्वरूपातील मदत ज्यांना देऊ शकतो त्यांची माहिती लिहावी.
ज्या संस्थेला वस्तुरुपात मदत हवी असेल त्याबद्दल खालील माहिती द्यावी.
१. संस्थेचे नाव. (संस्था शक्यतो नोंदणीकृत असावी), संस्था कोणासाठी व कशा प्रकारचे काम करते याबद्दल थोडक्यात माहिती.
२. वेबसाइट असेल तर त्याचा दुवा
३. संस्थेला सरकारी वा बाहेरुन अतिशय कमी मदत मिळत असेल तर त्याबद्दल आवर्जून लिहावे. आपण अशाच संस्था निवडतो.
४. संस्थेला सध्या ज्या गोष्टीची नितांत आवश्यकता आहे त्याची यादी व प्रमाण. तसेच त्या वस्तू विकत घेण्यासाठी किती पैसे लागू शकतील ते.
५. आयकरात सूट मिळू शकत असेल तर तेही लिहा. पण बहुतेकवेळा ती सूट संस्थेला पैशाची मदत केली तरच मिळू शकते, वस्तुरुपात केली तर नाही.
६. संस्थेत या संदर्भात कोणाला संपर्क करायचा त्या व्यक्तीचे नाव, हुद्दा, संपर्क क्रमांक, वेळ, ईमेल इ. तपशील म्हणजे पारदर्शीपणा राहील.
ज्या संस्थेला श्रमदानाच्या स्वरूपात मदत हवी असेल त्याबद्दल खालील माहिती द्यावी.
१. संस्थेचे नाव. (संस्था नोंदणीकृत असावी), संस्था कोणासाठी व कशा प्रकारचे काम करते याबद्दल थोडक्यात माहिती
२. संस्था कोणत्या गावात आहे.
२. वेबसाइट असेल तर दुवा
३. संस्थेला कशाप्रकारे मदत हवी आहे. (उदा. हर्पेन ह्यांनी एका शाळेत शिकवण्यासाठी गरज असल्याबद्दल हल्लीच लिहिले होते. )
४. कोणकोणत्या तारखांना संस्थेला मदत हवी आहे.
५. तिथपर्यंत पोचण्यासाठी मार्ग तसेच पोचायला लागणारा वेळ व पैसा.
६. संस्थेत या संदर्भात कोणाला संपर्क करायचा त्या व्यक्तीचे नाव, हुद्दा, संपर्क क्रमांक, वेळ, ईमेल इ. तपशील
वस्तुरुपात मदत ह्याआधी करण्यात आली आहे त्यामुळे ती कशी करण्यात येते हे सर्वांना माहिती आहे व ह्यासाठी दरवेळी ५ ते ६ मायबोलीकरांची मदत लागतेच.
परंतु श्रमदान उपक्रम पार पडण्यासाठी जास्त स्वयंसेवक व त्यांचा वेळ ह्याची आवश्यकता आहे. ही मदत भारतातील संस्थेला करण्यात येणार असल्याने भारतातीलच स्वयंसेवकांच्या मदतीनेच हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पाडेल. त्यातदेखील ही संस्था ज्या गावातील असेल तिथले जास्त.
ह्याबद्दल रूपरेखा साधारण अशी आहे.
आपणाकडून संस्था ठरवली गेली तर त्यासाठी जे मदत करू शकतात त्यांची यादी व सर्वांना योग्य असा दिवस ठरवून तिथे जाऊन काम करणे. त्यासाठी मायबोलीकरच असायला हवे असेही नाही. आपण कोणालाही ह्यात सामील करू शकता.
ह्यात कितीही संस्था निवडता येतील. अगदी १० गावची १० माणसे आपापल्या गावातली एखादी संस्था निवडून तिथे जाऊ शकतात.
दोन्ही उपक्रम राबवण्यासाठी तुमच्या ह्याशिवाय काही वेगळ्या कल्पना असतील तर स्वागतच आहे. अवश्य लिहा त्याबद्दल.
श्रमदानाचा हा उपक्रम कितपत यशस्वी होईल हे आता सांगता येणार नाही. ते सर्व मायबोलीकरांच्या प्रतिसादावर अवलंबून असेल. म्हणूनच ह्या वर्षी हा प्रयोग करून पाहायचा आहे. जर हा सफल झाला तर दरवर्षी करता येईल, नाहीतर बंद करता येईल.
(इच्छा असल्यास हा उपक्रम कोणत्याही देशात करता येईल. तुमच्या गावातले लोक तुम्ही निवडून सर्व मिळून एखादा दिवस (बर्याचदा शनिवार) ठरवून संस्थेमध्ये जाऊ शकता. जसे अमेरिकेत Food Bank मध्ये जाऊन काम करणे हा अत्यंत वेगळा व आनंद देणारा उपक्रम आहे. प्रत्येक गावांत food bank असते. अजूनही बरीच माहिती इतरांना असेल. अजूनही इतर प्रकारच्या संस्थांची माहिती बाकीच्या देशातील कोणाला असेल तर अवश्य लिहा).
८ मार्च ला महिला दिन. त्याच्या आसपास संस्थांची निवड करण्यात येईल व पुढील कामाला लागता येईल.
पण श्रमदानाचा उपक्रम मायबोलीकरांच्या सहकार्याशिवाय शक्य होणार नाहीये त्यामुळे त्याला जास्त प्रतिसाद नाही मिळाला तर दुसरा उपक्रम रद्द करण्यात येईल पण वस्तुरुपात मदतीचा उपक्रम मात्र नक्की करण्यात येईल.
तेव्हा लोकहो, आपल्याजवळची मौल्यवान माहिती इथे लिहा व त्याचा सर्वांनी उपयोग करूया.
ह्या सर्व संस्थांपैकी तुम्हाला वैयक्तिकरीत्या ज्या संस्था भावल्या व त्यांना मदत करायची इच्छा आहे, तर ते देखील लिहावे.
ह्यात स्वयंसेवकांची गरज आहे. ज्यांना स्वयंसेवक म्हणून भाग घ्यायचा आहे त्यांनी संपर्क करावा.
थेंबे थेंबे तळे साचे.
मागील वर्षी केले गेलेले उपक्रम इथे वाचायला मिळतील,
२०१० - http://www.maayboli.com/node/14532
२०११ - http://www.maayboli.com/node/24887
२०१२ - http://www.maayboli.com/node/33264
सुपंथ - http://www.maayboli.com/node/4492 (नवीन वाचकांसाठी - सुपंथद्वारे आपण आर्थिक मदत त्या त्या संस्थेपर्यंत पोचवतो)
सध्या ह्यात ४ स्वयंसेवक उपलब्ध आहेत - अरुंधती कुलकर्णी, केदार जोशी (सुपंथ चे चालक), मो, सुनिधी. अजून स्वयंसेवकांची जरूरी आहे. संयुक्ताखेरीज इतर स्वयंसेवक देखील हवे आहेत कारण हा उपक्रम सर्व उत्साही मायबोलीकारांच्या मदतीने करायचा आहे.
धन्यवाद
चांगला उपक्रम. श्रमदान
चांगला उपक्रम. श्रमदान उपक्रमांतर्गत बरेच विविध उपक्रम करता येतील. शुभेच्छा!!
स्वयंसेवकांकडून कोणते सहकार्य
स्वयंसेवकांकडून कोणते सहकार्य अपेक्षित आहे
जाई, स्वयंसेवकांना - जिथे
जाई, स्वयंसेवकांना -
जिथे वस्तूरुपी मदत दिली जाते, तिथे -
ज्या वस्तूवर सगळ्यांचे एकमत होईल तिच्या खरेदीबद्दल मदत (इतर प्रॉडक्ट्सबरोवर किंमत, क्वालीटी इत्यादीच्या अनुषंगाने तुलना), वितरकांबरोबर/संस्थेच्या संचालकाबरोबर फोनवर किंवा प्रत्यक्ष भेट, वस्तू आणणे, पोहोचवणे (ट्रान्स्पोर्टेशन) इत्यादीमध्ये मदत, वस्तू पोचती केल्यावर पडताळणीमध्ये मदत इत्यादी
ह्याव्यतिरिक्त -
१. देणग्यांची नोंद ठेवणे, पोच देणे
२. बा.फ. वर अपडेट्स टाकणे, लोकांच्या शंकांचे निरसन करणे इत्यादी..
अजुन जसे आठवेल तसे टाकते.
श्रमदान्/बुद्धीदान ह्या उपक्रमात लागणारी मदत आपण कोणत्या संस्थेची निवड करु आणि त्यांना कोणत्या प्रकारची मदत हवी आहे त्याप्रमाणे ठरेल. आपल्याला माहिती असलेल्या गरजू संस्थांची माहिती इथे जरुर लिहा.
ओके मग मी तयार आहे मी मुंबैत
ओके मग मी तयार आहे
मी मुंबैत राहते
धन्यवाद जाई. संपर्कातून मेल
धन्यवाद जाई. संपर्कातून मेल करते.
नंदिनी, श्रमदानाकरता
नंदिनी, श्रमदानाकरता उपक्रमांची यादी/कल्पना नक्की लिही इथे.
पुण्यात वनराई नावाचे एक
पुण्यात वनराई नावाचे एक संस्था, गेली अनेक वर्षे, महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात पर्यावरणपूरक विकास कामे करत आहे. (http://vanarai-trust.org/)
आम्ही २००९ मधे कॉलेजतर्फे वनराईसाठी 'पाणी अडवा-पाणी जिरवा' उपक्रमासाठी गेलो होतो. डोंगर उतारावर पाणी अडवण्यासाठी दगडांचे (तिथलेच गोळा करून) बांध घालण्याचे काम आम्ही केले होते. त्यांच्याकडे कंपनीतल्या लोकांसाठी (जरा सोपे असे CSR Work ) आटलेल्या नाल्या-ओहोळांमधे रेती-खडीच्या पिशव्यांचे बांध घालण्याचे काम सुध्दा करायला मिळते. सध्याच्या दुष्काळाच्या सावटामुळे मला आठवलेले हे (श्रमदानाचे) काम !
आणि हो अशा (एकाच रवीवारी संपणार्या ) उपक्रमांसाठी मी कार्यकर्ता / स्वयंसेवक म्हणून काम करायला तयार आहे.
अशासारख्या (एकाच रवीवारी
अशासारख्या (एकाच रवीवारी संपणार्या ) उपक्रमांसाठी मी कार्यकर्ता / स्वयंसेवक म्हणून काम करायला तयार आहे.>> +१
सम्पर्कासाठी माझा इमेल आयडी केदार कडे आहे.
हर्पेन ऊत्तम उपक्रम मलाही
हर्पेन ऊत्तम उपक्रम
मलाही अशाच ऊपक्रमात सहभागी व्हायला आवडेल
अशासारख्या (एकाच रवीवारी
अशासारख्या (एकाच रवीवारी संपणार्या ) उपक्रमांसाठी मी कार्यकर्ता / स्वयंसेवक म्हणून काम करायला तयार आहे.<<<< मी पण
मी आर्थिक मदत करू इच्छिते.
मी आर्थिक मदत करू इच्छिते. शैक्षणिक आणि पर्यावरण क्षेत्रात ( सध्याच्या दुष्काळाबद्दल रोज ऐकतेय ) काम करणार्या संस्थेला मदत करायला आवडेल.
हर्पेन, छान. त्यांचे पुढचे
हर्पेन, छान. त्यांचे पुढचे कार्यक्रम, केव्हा कामाची गरज आहे ते माहिती काढुन लिहिणार का? साधारण ४-५ तारखा असलेल्या बर्या म्हणजे इतरांना जमेल की नाही ते ठरवायला सोपे जाईल. पहा, तुम्हाला ४ कार्यकर्ते मिळाले पण.
अर्पणा, नोंद केली आहे.
मला आर्थिक मदत करायला आवडेल.
मला आर्थिक मदत करायला आवडेल.
सुनिधी - मी वनराईशी संपर्क
सुनिधी - मी वनराईशी संपर्क साधून त्यांना सध्या कशा प्रकारची मदत हवी आहे ते इथे लिहितो.
(माझ्या आठवणी / माहीती प्रमाणे, वनराई सारख्या ठिकाणी असे श्रमदानाला जायचे म्हणजे किमान २५-३० जण तरी हवेत)
सुनिधी, जागूने लिहिलेला
सुनिधी, जागूने लिहिलेला वैद्यकीय शिबिराचा बीबी वाचला असशीलच. त्यापद्धतीचा उपक्रमदेखील मायबोली स्वयंसेवकांतर्फे राबवला जाऊ शकतो.
दुसरे म्हणजे याच भागामधे स्त्रियांसाठी एक दिवसाचे प्रशिक्षण शिबिर (गावातल्या बचत गटाच्या सहाय्याने महिलांना व्यावसायिक स्वरूपावर प्रशिक्षण देता येऊ शकते.) या भागातील कुपोषण, व्यसने इत्यादि समस्या लक्षात घेता त्यावर आपण व्याख्याने आयोजित करू शकतो.
कॉलेज-शाळकरी मुला-मुलींसाठी करीअर गाईडन्स उपलब्ध करून देऊ शकतो. विविध मायबोलीकर अनेक क्षेत्रांमधे आहेत त्या क्षेत्रांबद्दल आपण थोडक्यात माहिती देऊ शकतो. गरज भासल्यास नंतरदेखील फोन्-मेल द्वारे मार्गदर्शन करता येऊ शकेल..
हर्पेन, नक्की लिहा.
हर्पेन, नक्की लिहा. त्याप्रमाणे कितपत आवाक्यात आहे ते कळेल व आवाहन करता येईल.
नंदिनीच्या कल्पना छान आहेत. त्या अंमलात आणण्यात येऊ शकतील का हे चाचपण्यासाठी कोणी मार्गदर्शन करु शकेल का? जागुचा धागा वाचलाय. जागु, काही सुचना?
नंदिनी सुनिधी विवेक देसाई
नंदिनी सुनिधी
विवेक देसाई नावाचे माबोकर कुडाळ मधे शैक्षणिक मार्गदर्शन ऊपक्रम करतात
बरेचसे माबोकरच सहभागी आहेत
सुनिधी मला माहित असलेल्या
सुनिधी मला माहित असलेल्या संस्थांची मी तुला काही दिवसांत माहीती देते. अरुंधती मला नेहमी ह्या माहीतीसाठी फोन करायची पण तेंव्हा मी प्रेगनंट असल्याने धावाधाव होत नव्हती आता फोनाफोनी करुन तरी ही माहीती मी काढून देते.
श्रमदानाबद्दल मला थोडे सुचवायचे आहे. पहिला श्रमदान करायला किती मायबोलीकर उपलब्ध आहेत ते पाहून एखाद्या ठिकाणी वृक्षारोपण करु शकतो. पण झाडे अशा ठिकाणी लावली गेली पाहीजेत जिथे पाणी घालण्याची सोय होईल. एखाद्या शहराच्या अथवा गार्डनच्या आवारात आता दुर्मिळ होत जाणारी झाडे लावू शकतो. अशी झाडे नर्सरीत उपलब्ध असतात. त्या ठिकाणी आपण पत्र्याचा मायबोलीचा फलकही लावू शकतो. त्यासाठी परवानगीची आवश्यकता आहे का तेही पाहून घ्यावे लागेल. अशा उपक्रमामुळे निदान नामशेष होत चाललेली झाडे पुढच्या पिढीला पहायला मिळतील.
सार्वजनीक एरिया जसे समुद्र किनारा, नदी काठ, गार्डन्स ह्यांची काही ठिकाणी स्वच्छता नसते. अशा ठिकाणी एक दिवस स्वच्छता अभियान करुन तिथेही मायबोलीची स्वच्छतेचे महत्व पटवून देणारी पाटी लावू शकतो.
अजुन सुचेल तसे सांगते.
जाई, धन्यवाद. विवेक देसाईना
जाई, धन्यवाद. विवेक देसाईना तुम्ही ओळखत असाल तर त्यांना इथे लिहायला विनंती करु शकाल का?
निबंध, नोंद केली आहे.
जागु - मस्तच कल्पना. काही जागा माहिती आहेत का? ठिकाणे सांगितलीस तर इथेच विचारता येईल.
असामी ह्यांनी पण स्वयंसेवक होण्याची तयारी दाखवली आहे. शक्य होईल ती मदत ते जिथे रहातात तिथुन करणार आहेत. थँक्स असामी.
लोकहो, इथेपण लिहा ना. .. हर्पेन, जागु ने छान कल्पना दिल्या आहेत. या, सामील व्हा.
जागु ने लिहिल्याप्रमाणे श्रमदान करायला कोणकोण तयार आहे? मार्च १ पर्यंत कळवलेत तर आकडा कळेल.
मदतीची तयारी दाखवणार्या
मदतीची तयारी दाखवणार्या सगळ्यांचे आभार. नंदिनी, जागू, हार्पेन, जाई ह्यांची सजेशन्स पण चांगलीच आहेत.
सुनिधी, छान पोस्ट.
लोकहो, इथेपण लिहा ना. >> +१
सुनिधी सांगून बघते
सुनिधी सांगून बघते
सुनिधी, मी इथे चेन्नईमधे
सुनिधी, मी इथे चेन्नईमधे असल्याने प्रत्यक्ष सहभागी होणे अशक्य आहे पण तरीदेखील काही मदत लागलीच तर करायला तयार आहे. बहुतेक मायबोलीकर मुंबईपुणे पट्ट्यातील असतील तर याच भागांमधली एखादी संस्था अथवा कार्यक्षेत्र विचारात घ्या, जेणेकरून जास्तीत जास्त मायबोलीकर सामिल होऊ शकतील.
जागूच्या स्वच्छता अभियानाच्या कल्पनेमधे देवळांसारखी धार्मिक स्थळेदेखील अवश्य विचारात घ्या. कित्येक देवळांमधे गेल्यावर "जगात देव कुठेपण असेल पण या देवळांत नक्की नसेल" अशीच भावना मनात येते घाणीमुळे.
घारूअण्णा दरवर्षी डोंगरांमधे जून-जुलैमधे वृक्षारोपण करतात, त्याविषयी मायबोलीवर त्यांनी कुठेतरी लिहिले आहे. पण सध्या मार्च चालू असल्याने वृक्षारोपण करायचे झाल्यास नंतरची निगराणी फार कठिण होईल, त्यामुळे जिथे पाणी देणारे कुणी उपलब्ध असेल अशाच ठिकाणांचा विचार करा.
माझे वडिल काहि वर्षे शबरी
माझे वडिल काहि वर्षे शबरी सेवा समिती ह्या संस्थेसाठि काम करतात.
दुवा इथे देत आहे. http://shabarisevasamiti.org/
बरीचशी माहिती वेब साइट वर आहे.
अधिक माहिती साठी संपर्कः
Email ID: shabarisevasamiti@yahoo.co.in
Cell Ph.# 9920516405 (Pramod Karandikar)
धन्यवाद भक्ती!! खूप छान काम
धन्यवाद भक्ती!!
खूप छान काम करतेय ही संस्था! मदत करायला नक्कीच आवडेल.
माहितीसाठी धन्यवाद भक्ती.
माहितीसाठी धन्यवाद भक्ती.
मी वनराईशी संपर्क साधायचा
मी वनराईशी संपर्क साधायचा प्रयत्न केला. त्यांचे फोन लागत नाहीयेत. त्यांना ईमेल लिहिली होती त्याचे उत्तर आलंय ज्यात म्हटले आहे की प्रत्यक्ष भेटायला ऑफीसवर या. त्यांचे ऑफीस पुण्यात मित्रमंडळाजवळ आहे. मला जमणे अवघड आहे (ईमेल येऊन आठवडा झालाय, अजून जमलेले नाही, आणि इतक्यात जमेल की नाही याबाबत पण शंकाच आहे).त्यांना तसे कळवून फोन नं विचारणारी ईमेल पण पाठवली होती, त्याचे अजून उत्तर नाही. इतर कोणी जाऊ शकतील का?
त्यांचा पत्ता आहे.
वनराई ट्रस्ट,
Aditya Residency,
498, Parvati,
Near Mitramandal Chowk,
Pune 411 009
Phone : 020-2444035,
020-24449351
Contact Person - Shri Shriram Gomarkar, Secretary
थँक्स हर्पेन. आमच्या गावात
थँक्स हर्पेन.
आमच्या गावात मार्च, एप्रिल, मे असे प्रत्येक महिन्यात १ ह्याप्रमाणे ३ उपक्रम होतील. कोणाला इंटरेस्ट असेल तर संपर्क करा. रुपरेषा अजुन पक्की नाही पण गावातच होणार व नक्की होणार आहेत.
यंदा मराठवाड्यात भीषण दुष्काळ
यंदा मराठवाड्यात भीषण दुष्काळ आहे. मराठवाड्यातल्या मुलांना शाळा सोडून स्थलांतरित व्हावं लागल्याच्या बातम्या आहेत. यासंदर्भात काही करता येईल का आपल्याला?
अरेरे!!! अजुन माहिती काढुन
अरेरे!!! अजुन माहिती काढुन ह्याबद्दल काय करता येईल ह्याची थोडी कल्पना देणार का चिनुक्स.
मुलींच्या अंधशाळेला दरवर्षी
मुलींच्या अंधशाळेला दरवर्षी हायजीन प्रॉडक्ट्स दिले जातात. त्या उपक्रमातील वस्तू उपलब्ध करुन देण्यात माझा सहभाग नेहमीप्रमाणे असेलच. यात मला हक्काने गृहित धरा
चिनूक्स, एखादे अगदीच ग्रासलेले गाव घेऊन तिथल्या शाळेच्या पटावर असलेल्या मुलांसाठी धान्य (तांदूळ / ज्वारी / डाळ) होलसेलमध्ये खरेदी करुन आपण वाटप करु शकतो का? Data उपलब्ध होण्याजोगा असेल आणि स्थानिक रहिवाश्यांकडून को-ऑपरेशन मिळू शकत असेल तर हे होऊ शकतं. कपडे, धान्य व इतर लागणार्या वस्तूंच्या वाटपाचा, वाटपापुर्वी लागणार्या तयारीचा अनुभव आहे. आमच्या संस्थेतर्फे हे काम नियमित होत असते. त्यामुळे त्यासाठी लागणार्या मेहनतीचा आणि प्लॅनिंगचाही अंदाज आहे. निधी लवकरात लवकर जमा होत असेल तर ती मुलं गाव सोडून जायच्या आधी हे करावं लागेल. मराठवाड्यातील मायबोलीकरांनी असे विद्यार्थी असलेली शाळा निवडून द्यावी आणि ठरलेल्या दिवशी मुलांना शाळेत बोलावण्यासाठी मुख्याध्यापकांशी यशस्वी बोलणी करावीत. त्या बेसिसवर पुर्व तयारी इथूनच होऊ शकेल. प्रत्यक्ष वाटपाच्या कामासाठी स्पॉटवर २ दिवस पुरे आहेत (१ दिवस धान्य मोजून पॅक करुन त्यावर मुलाच्या नावाची आणि इयत्तेची चिठ्ठी लावणे आणि दुसरा दिवस मुलांना शाळेत बोलावून वाटप करणे). मी हे दोन दिवस तिकडे जाऊन रहायला तयार आहे. आधीच्या कामातही सहभाग घेईन. धान्य किती वाटायचं, एकूण किती धान्य लागेल, किती पिशव्या लागतील, खर्च किती येईल, कमीत कमी पैश्यांत नॉर्मल प्रतीचं जास्तीत जास्त धान्य खरेदी इत्यादी गोष्टी इथून कराव्या लागतील.
फक्त अनुभवाने एकच गोष्ट लक्षात येते की कधी कधी वाटलेल्या वस्तू मुलांचे आई वडिल पैसे उभे करण्यासाठी बाजारात कवडी मोलाने विकून टाकतात. पण स्वतःचे पोट जाळणे यासारखा दुसरा स्वार्थ जगात नसल्याने दुष्काळी भागात कदाचित धान्याच्या बाबतीत हे होणार नाही. त्यांचे निदान काही दिवस तरी आपल्याला पुढे ढकलता आले तरी उत्तम. आकाश फाटल्यावर एखादं ठिगळ तरी लावायचा प्रयास करावासा वाटतो.
ही कल्पना योग्य न वाटल्यास फक्त अनुल्लेख करावा. स्वतः अश्या वाटपाच्या कामांमध्ये इन्वोल्व असल्यामुळे हे क्लोज टू हार्ट आहे.
Pages