सामाजिक उपक्रम २०१९ आढावा
सर्वप्रथम हा आढावा प्रकाशित करण्यास यंदा विलंब झाल्याने आम्ही दिलगिरी व्यक्त करतो.
सर्वप्रथम हा आढावा प्रकाशित करण्यास यंदा विलंब झाल्याने आम्ही दिलगिरी व्यक्त करतो.
आपल्या सामाजिक उपक्रमाचे हे ९ वे वर्ष. नेहमीप्रमाणे यावर्षीही आपल्यापैकी काही मायबोलीकरांनी एकत्र येऊन सामाजिक उपक्रमासाठी मायबोली आणि मिसळपाववर आवाहन व घोषणा केली. याप्रकारे आवाहनात दिलेल्या यादीतून इच्छुक देणगीदारांनी आपापल्या पसंतीच्या संस्था निवडल्या व ते देणगी देऊ शकत असलेली रक्कम सामाजिक उपक्रम टीमला कळवली. तसेच त्या संस्थेकडे पैसे जमा केल्यावर त्याबद्दलही आम्हाला कळवले.
सामाजिक उपक्रमाचे हे आपले नववे वर्ष. हा उपक्रम तसा मायबोलीकरांना नवा नाही. मायबोलीकरांच्या साथीने गेली ८ वर्षे स्वयंसेवक हा उपक्रम यशस्वीपणे पार पाडत आले आहेत.समाजासाठी कार्य करणार्या संस्थांना सामाजिक उपक्रमाद्वारे मदत मिळवून देण्यास आपण प्राधान्य देतो. या उपक्रमात दरवर्षी ज्यांना सरकारकडून फारशी मदत मिळत नाही (वा मिळतच नाही) किंवा संस्था मुख्यत्वे फक्त देणगीदारांवर चालते अशा गरजू संस्थांना प्रामुख्याने वस्तुरुपात मदत करण्यावर आपला भर असतो.
आपल्या सामाजिक उपक्रमाचे हे ८वे वर्ष. या उपक्रमांतर्गत चांगले काम करणाऱ्या; गरजू व नोंदणीकृत सेवाभावी संस्थांची नावे, त्यांबद्दलची माहिती आणि त्या संस्थेची सध्या काय गरज आहे याची एक यादी करुन, त्या माहितीची शहानिशा करून यादीतील संस्थांना मदत करण्यासाठी आपण मायबोली.कॉम, मिसळपाव.कॉम तसेच फ़ेसबुकच्या माध्यमातून एक जाहीर आवाहन केले.
नमस्कार,
गेली ३ वर्षे महिला दिनानिमित्त मायबोली-संयुक्ता-सुपंथ तर्फे गरजू संस्थांना वस्तू स्वरूपात मदत करण्याचा उपक्रम चालवला जातो. ह्या वर्षी पण हा उपक्रम होणार आहे पण उपक्रमाचे स्वरूप थोडेसे वेगळे ठेवत आहोत. आशा आहे उपक्रमाला अजून जास्त प्रतिसाद मिळेल.
वेगळेपणा काय असेल?
१. दोन प्रकारे उपक्रम राबविला जाईल.
- आर्थिक मदत - ज्यात दरवर्षीप्रमाणेच गरजेच्या वस्तू विकत घेऊन संस्थेला दिल्या जातील.
- श्रमदान/बुद्धी दान वगैरे... ज्यात आर्थिक मदतीची गरज नसेल
आपण किती तक्रारी करत असतो सतत. एखादी गोष्ट मनाप्रमाणे झाली नाही म्हणून. नोकरी-धंद्यात प्रश्न उभे राहिले म्हणून. आर्थिक आणि शारिरिक दुखणी उद्भवली म्हणून. वीज-रस्ते-पाणी भरपूर मिळत नाही म्हणून. सरकार आणि प्रशासन नालायक आहे म्हणून. प्रेमभंग झाला म्हणून आणि आज जेवण फार बरं नाही मिळालं म्हणूनही.
खरं तर हे सारं आपण हातीपायी धड असतो म्हणून. तसे नसतो तर काय झालं असतं? सोपं आहे- देवाने दुसरं काही दिलं नाही तरी चालेल, पण हे नशीबात नको द्यायला होतं- असं रोज वाटलं असतं.