संस्था
नर्स / आयाबाईंची सेवा देणार्या संस्था अथवा व्यक्ती
मी बोरिवली / दहिसर भागात सेवा देणार्या अशा संस्था अथवा व्यक्ती यान्च्या शोधात आहे. आमच्या घरी राहणार्या आणि व्रुद्धापकाळाने अन्थरूणाला खिळून असलेल्या आमच्या नातेवाईकासाठी (वय वर्षे ८९) दिवसभरासाठी एका आयाबाईची लवकरात लवकर गरज आहे.
तर अशा सन्स्थान्चे पत्ते अथवा फोन नम्बर कुणाला माहित असल्यास कृपया कळवावे.
(अथवा हि माहिती मायबोलीवर उपलब्ध असल्यास लिन्क द्यावी.)
सौ. वीणाताई श्रीकांत सहस्रबुद्धे (थर्ड आय असोसिएशनच्या संचालिका) यांच्या कार्याशी ओळख: संयुक्ता मुलाखत
नशिबाने जरी जग दाखवणे नाकारले तरी आपल्या मनःचक्षूंनी जग पाहू इच्छिणार्या दृष्टीहीनांसाठी तिसर्या डोळ्याच्या रुपात आपुलकीने मदतीचा हात पुढे करण्यार्या नाशिकच्या 'थर्ड आय असोसिएशन' (पुर्वाश्रमीची थर्ड आय फाऊंडेशन) या दृष्टीहीनांसाठी, विशेषतः दृष्टीहीन विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी कार्यरत असलेल्या संस्थेची, आणि संस्थेच्या कामाची ओळख मायबोलीकरांना करून देण्याचा हा माझा प्रयत्न! गेली १४ वर्षे विविध अडचणींवर मात करून नेटाने आपल्या ध्येयाकडे वाटचाल करणार्या या संस्थेच्या संचालिका आहेत - सौ. वीणा श्रीकांत सहस्रबुद्धे!
श्रीमती वीणा कुलकर्णी : फळप्रक्रिया (कॅनिंग) व्यवसाय (माझा छंद, माझा व्यवसाय)
कॅनिंग किंवा फळप्रक्रिया म्हटले की प्रथम नजरेसमोर येतात ते हवाबंद डबे. एखादा अन्नपदार्थ विशिष्ट प्रक्रिया करून हवाबंद डब्यात सील करून जास्तीत जास्त टिकविण्याच्या पद्धतीला कॅनिंग असे म्हटले जाते. फळांवर वेगवेगळ्या प्रक्रिया करून त्यांपासून सॉस, सरबते, पावडरी इत्यादी टिकाऊ प्रकारांत त्यांचे रुपांतर करण्याचा व्यवसाय हा जसा घाऊक प्रमाणात चालतो तसाच तो घरगुती स्वरुपातही करता येतो.
‘अर्थार्जन करणार्या महिलांचे व्यावसायिक कामाच्या ठिकाणी होणारे लैंगिक शोषण' : माहिती, प्रतिबंध व उपाय
जगाच्या पाठीवर सर्वच स्त्रियांना कधी ना कधी लैंगिक शोषणाचा / उपद्रवाचा सामना करावा लागतो. अश्लील शेरे, स्पर्श, शीळ, कटाक्ष वगैरे गोष्टी तर नेहमीच्याच असतात. कदाचित त्यांना सामान्य असेही म्हणता येईल. आणि अर्थार्जन करण्यासाठी घराबाहेर पडणाऱ्या स्त्रियांनाही अशा अनुभवांना सामोरे जावे लागते. अनेकदा पुरुषप्रधान कार्यक्षेत्रात पदार्पण करताना स्त्रियांना त्याचा जास्तच उपद्रव होतो असे म्हटले तरी ते वावगे ठरणार नाही. त्यामुळे कामाच्या ठिकाणी होणारे लैंगिक शोषण हे एकाप्रकारे हिंसेचेच दुसरे रूप आहे.
आदिपथ फाउण्डेशन आणि रिसर्च सेंटर
आदिपथ फाउण्डेशन आणि रिसर्च सेंटर ही एक अशि सेवाभावी संस्था आहे जी स्त्रिया आणि मुले यांच्या वर होणाय्रा घरगुति हिंसाचाराच्या विरोधात काम करते. तसेच या वर्गाच्या समुपदेशनाचे काम करते. स्त्रिया आणि मुले यांच्या साठि सुरक्षीत आणि मुल्याधारित समाजाची निर्मीती हे आमचे प्रमुख उद्दीष्ट आहे. त्या साठी आम्ही दु. १२ ते सा. ६ अशी एक फोन लाईन चालु (Warm Line) सुरु केलेली आहे.
कोणतेही चांगले काम सुरु करण्यासाठी समाजाच्या मदतीची अतिशय गरज असते.
आम्हाला पहिले प्रोत्साहन दिले, "क्लब नोस्टाल्जिया" यांनी. क्लब नोस्टाल्जिया हे सामाजिक कार्याला स्फुर्ती म्हणुन निधी संकलनासाठी संगीत रजनीचे आयोजन करीत असतात.
सुपंथ - दुरितांचे तिमीर जावो. एक अनोखा मदत गट
