घरगुती व्यवसाय

रंगबीरंगी दुनिया : पोशाख भाड्याने देण्याचा व्यवसाय : श्रीमती प्रेरणा जामदार (माझा छंद, माझा व्यवसाय)

Submitted by अरुंधती कुलकर्णी on 18 January, 2012 - 03:10

आयुष्यात वेगळे काहीतरी करावे, आपले छंद जोपासताना त्याबरोबरच अर्थार्जनही करावे आणि नव्या वाटा चोखाळताना त्यात आपल्या कुटुंबियांची सर्वार्थाने साथ मिळावी अशी आकांक्षा अनेक स्त्रियांच्या मनात असणे सहज शक्य आहे. परंतु सर्वांनाच ते साधते असे नाही. वयाची चाळीशी उलटल्यावरही आपण काही करू शकतो, त्यातून व्यावसायिक यशासोबत इतरही बरेच काही कमावू शकतो ह्याची कल्पनाच अनेकींना नसते. सांसारिक जबाबदार्‍या सांभाळून आपल्या छंदाला एका वेगळ्या प्रकारच्या व्यवसायाचे स्वरूप देणार्‍या नागपूर येथील प्रेरणाताईंनी आपली कल्पना प्रत्यक्षात आणून ते साध्य केले.

श्रीमती वीणा कुलकर्णी : फळप्रक्रिया (कॅनिंग) व्यवसाय (माझा छंद, माझा व्यवसाय)

Submitted by अरुंधती कुलकर्णी on 14 December, 2011 - 04:12

कॅनिंग किंवा फळप्रक्रिया म्हटले की प्रथम नजरेसमोर येतात ते हवाबंद डबे. एखादा अन्नपदार्थ विशिष्ट प्रक्रिया करून हवाबंद डब्यात सील करून जास्तीत जास्त टिकविण्याच्या पद्धतीला कॅनिंग असे म्हटले जाते. फळांवर वेगवेगळ्या प्रक्रिया करून त्यांपासून सॉस, सरबते, पावडरी इत्यादी टिकाऊ प्रकारांत त्यांचे रुपांतर करण्याचा व्यवसाय हा जसा घाऊक प्रमाणात चालतो तसाच तो घरगुती स्वरुपातही करता येतो.

Subscribe to RSS - घरगुती व्यवसाय