स्त्रियांना नटायची आवड उपजत असते का?
बहुतांश बायकांना नटायची आवड जास्त असते. छानछान फॅशनेबल कपडे घालायची आणि दागदागिने घालायची आणि या सर्वांची खरेदी करायचीही आवड पुरुषांच्या तुलनेत जास्त असते.
अर्थात हे विधान ओवरऑल समाजाच्या निरीक्षणावरून केलेले आहे. त्यामुळे असे काही नाही, हल्ली पुरुषही नटतात. किंवा आमच्याशेजारी अमुक तमुक जोडपे राहते त्यात बाईपेक्षा जास्त पुरुषच नटतो. वगैरे विधाने करू नका. किंवा माझे वरील विधान खोटे आहे असेही म्हणू नका. ते खोटे बोलणे होईल.
कालच्या अंगमोड मेहनतीनं ठसठसणार्या हाडांकडं दुर्लक्ष करून ती भल्या पहाटे उठली. नवर्याचा चहा, न्याहारी, पोरांचा डबा, पोरींची येणीफणी, धुणंचुणं आवरून दिवसभराचं रांधून ती शेतावर रोजंदारीवर निघाली, तेव्हा तिचं पोरगं म्हणालं, 'माय, महिला दिनाच्या तुला सुबेच्च्या'... लेकराकडं कौतुकानं पाहत माय म्हणाली...' ते काय आसतंय रे? '
देशातल्या कुठल्यातरी मंदिरात स्त्रियांच्या प्रवेशावरून पुन्हा वाद सुरू झाला आहे. एका मित्राच्या फेसबूक वॉलवर या संदर्भात पोस्ट वाचली. तो या प्रवेशाच्या विरोधात होता. मी त्याच्या विचारांच्या विरोधात भलामोठा प्रतिसाद दिला. प्रतिसादाचा आशय साधारण असा होता - तुम्ही लोकांनी मुलींना शिक्षण घ्यायची आणि त्यानंतर कमवायला बाहेर पडायची, स्वत:च्या पायावर उभे राहायची परवानगी दिलीत ईथेच तुम्ही चुकलात. आता त्यांना जिथे जायचेय तिथे त्या जाणारच. भोगा आपल्या कर्माची फळे.
आजकाल सगळीकडे सगळे "वेळकाढू" आरक्षण ह्या विषयावर तावातावाने मत मांडत भांडताहेत.
"आरक्षण" कोणासाठी आहे, का आहे, आज ही त्याची गरज का आहे हे मुद्दे विचारात न घेता, केवळ एकाच विचाराने मत मांडणे चालू आहे
"त्यांना आरक्षण दिले आहे तसे आम्हालाही द्या. अन्यथा त्यांचे आरक्षण काढून टाका"
भेंडी!
हे काय गल्लीतील क्रिकेटचा सामना आहे का, "मला लवकर आऊट का केले. जर मग मी आऊट असेल तर मला परत खेळू द्या वा कोणीच क्रिकेट खेळायचे नाही. नाहीतर मी मैदानात धिंगाणा घालेल." असे बोंबलायला.
महाराष्ट्रातील १९९३ च्या भुकंपानंतर त्या भागामध्ये काम करण्यासाठी अनेक स्वयंसेवी संस्था पुढे आल्या. अश्या अनेक स्वयंसेवी संथांमधीलच "स्वयं शिक्षण प्रयोग" ही एक. या संस्थेने जागतीक बँकेचे काम पुर्ण झाल्यावर तेथील महिलांना सक्षम बनवण्यासाठी अनेक प्रकल्प सुरु केले. गेली २० वर्षे त्यांचे हे काम अव्याहतपणे चालु आहे. या संस्थेबद्दल अधिक माहिती http://sspindia.org/ येथे उपलब्ध आहे.
रविवारची सकाळ. दिवाणखान्यात सोफ्यावर बसलेलो मी. टिव्ही वर चिकनी चमेली के शीला की जवानी. मात्र त्याकडे जराही लक्ष नाही. एका हातात चहाचा कप. दुसर्या हातात पोह्याने भरलेला चमचा, जो ‘आ वासलेल्या’ तोंडाच्या अगदी जवळ येऊन तसाच थांबलेला. विस्फारलेले डोळे समोरच्या पेपरावर खिळलेले. अजूनही विश्वास बसत नव्हता. पण वस्तुस्थितीचे भान आले तेव्हा जाणीव झाली की बातमी "दैनिक फेकानंद" मध्ये आली असल्याने तिला हसण्यावारी नेणे शक्य नव्हते. हि बातमी दिवाणखान्यामधून स्वयंपाकघरापर्यंत पसरण्याआधी तिचा छडा लावणे गरजेचे होते.
(हि कविता नाही
केवळ काल महिला दिना निमित्त सुचलेल्या काही ओळी आहेत)
मला देवत्व देवु नका
मला मखरात बसवु नका
पण मला हिणवु देखिल नका
मला अबला, असहाय्य समजु नका
मला फ़क्त माणुस म्हणुन जगु द्या
अगदी तुमच्या सारखच
भोंडला,हादगा : भुलाबाईची गाणी
बालपणीच्या अशा फ़ारच कमी आठवणी असतात ज्या माणसाच्या आयुष्यभर सावलीसारख्या सोबत-सोबत चालतात. जीवनाला कितीही रंग बदलू देत, आचार-विचारांच्या संरचनेत कितीही बदल झालेत तरीही त्या आठवणी मात्र वास्तवाचे कायम स्मरण करून देत असतात. एका अर्थाने ह्या आठवणी माणसाला "डोळस दृष्टी" प्राप्त करून देत असतात. आज महिला दिनाच्या निमित्ताने झालेली अशीच एक आठवण.