कुठे फिरून आले की लगेच त्या आठवणी लिहून काढायची सवय म्हणा, हौस म्हणा किंवा विरंगुळा म्हणा, आहे खरा! हे काम करायला मजा येते आणि नंतर त्या आठवणी कधीतरी वाचताना गंमत वाटते. पण सगळेच अनुभव व्यक्त करता येतातच असं नाही अन काही वेळा सांगावेसेही वाटत नाही तो आपला सुखद ठेवा असतो... आठवणींच्या गाभार्यात मखमली वेष्टणात गुंडाळून ठेवलेला. फक्त आणि फक्त आपणच त्याचे खजिनदार व राखणदार.
व्रत-वैकल्ये, उपासतापास, अध्यात्म ह्याच्याशी माझा फारसा संबंध नाही. धार्मिकता व अध्यात्म ह्यात पुसटशी रेषा आहे किंवा आजकाल आय एम नॉट रिलीजियस बट स्पिरिच्युअल अशी म्हणायची पध्दत (फॅशन) आहे अशी काही वाक्य वाचनात येत असतात. पण म्हणजे नक्की काय? अध्यात्म म्हणजे काहीतरी गूढ, अगम्य, गंभीर, आकलना पलीकडचा विषय असा आपला माझा समज. कुतूहल होतं. ती शमविण्याची वेळ व वय यावं लागतं . विवेकानंद केंद्राच्या साईटवर वर्षातून दोनदा होणार्या आध्यात्मिक शिबिराची सूचना फेब्रुवारीत पाहिली होती पण काही कारणाने जमले नाही. ऑगस्ट महिन्यात जायचे नक्की केले होते, त्याप्रमाणे जाऊन आलो. वर म्हटल्याप्रमाणे काही अनुभव शब्दातीत असतात. फक्त एवढंच म्हणीन पुनश्च अनुभव घ्यावासा वाटतोय. व्यक्तीपरत्वे अनुभूती वेगवेगळी असू शकते, नाही, वेगवेगळीच असते. "जितुके आपणांसि ठावे, तितुके लोकांसि सांगावे" ह्या उक्तीप्रमाणे ह्या खजिन्याचं वेष्टणच फक्त उलगडून सांगते. त्याचा थोडक्यात तपशील पुढीलप्रमाणे :
दिवस पहिला: नांव नोंदणी, सायं प्रार्थना
दिवस दुसरा:
प्रथम सत्रः प्रातःस्मरण ५:१५, योगासन वर्गः ६ ते ७:१५, ७:१५ ते ८:२० स्नान, चहा नाश्ता. ८:२० साठ शिबिरार्थीची गट विभागणी. सांख्य व योग महिला गण, पुरुषांचे न्याय, वैशिशीक, मीमांसा व वेदांत. ८:३० ते ९:३० श्रम संस्कार (भोजन व्यवस्था, बागकाम, साफसफाई आलटून पालटून) ९:३० ते १०.३० बौद्धिक - अध्यात्म की संकल्पना, वक्ता : रेखादिदी १०:४५ ते ११:३० मंथन श्री एकनाथजी रानड्यांच्या उत्तिष्ठत जाग्रत (A Rising call to a Nation) पुस्तकातील लेख वाचन व त्यावर चर्चा. ११:४० ते १२:१५ वैदिक पठण व गीत पाठांतर. १२:३० ते ३ - भोजन व विश्रांती
द्वितीय सत्रः ३:३० ते ४:४५ - उद्द्येशपूर्ण जीवन - निवेदितादिदी, ४:४५ ते ५:३० ध्यान, ५:३० ते ६:१५ प्रकृती दर्शन, ६:३० ते ७:१५ सायंप्रार्थना व भजन, ७:२० ते ८:१५ रात्री भोजन. ८:३० ते ९:३० आनंद मेळा - ऍक्शन साँग, खेळ, हनुमान चालिसा पठण, दिनचर्येची उजळणी.
अशी रोज दिनचर्या होती त्यात बौद्धिकाचे विषय व वक्ता बदलायचे.
* उद्देश्यपूर्ण जीवन दोन दिवस : (निवेदितादिदी) विवेकानंद स्मारक की कथा (राधादिदी), कर्मयोग (मा. हनुमंतजी) श्रीमदभगवत गीता (मा. भानुदासजी) दोन दिवस , राष्ट्रभक्त स्वामी विवेकानंद, विवेकानंद केंद्रः वैचारिक आंदोलन और गतिविधीयाँ (राधादिदी)
*आवर्ती ध्यान प्रकारावर एक दिवस व्याख्यान व एक दिवस प्रात्यक्षिक.
* केंद्राच्या कार्यप्रणालीवर चित्रफीत, स्मारक बांधणीवर एक चित्रफीत
* बालपण देगा देवा.... श्वेतादिदीने घड्याळाचे काटे उलटे फिरवले अन प्रत्येकात दडलेलं लहान मुलं बाहेर काढत सगळ्यांना बालक मंदिरात नेलं 'कोल्ह्याला द्राक्ष आंबट' ह्या गोष्टीवर आधारित संस्कृत बालगीत नाचत म्हणताना, बालपण अनुभवताना खूपच मजा आली. रम्य ते बालपण!
*केंद्राच्या आवारातच असलेलं 'परिवज्रकाचार्य स्वामी विवेकानंद' व मा. एकनाथजी रानड्यांचं जीवन दर्शन घडवणार 'गंगोत्री'प्रदर्शन भेट
*शिलास्मारक भेट, बाजार भेट
*ग्रुप फोटो काढण्यात आला व नावांसहित शेवटच्या दिवशी प्रत्येकाला त्याची प्रत मिळाली.
*शेवटच्या दिवशी सूर्योदय दर्शन, मा. बालकृष्णजींच व्याख्यान, शिबिरार्थीचं मनोगत व खास मेजवानी म्हणजे रांगोळ्यांनी सजवलेल्या केळ्यांच्या पानावर वाढलेलं सुग्रास जेवण!
सहा दिवसात अध्यात्म ह्या विषयाची फक्त तोंडओळख झाली, एवढंच म्हणता येईल.
'संपलं एकदाचं' असं न वाटता अरेच्च्या! संपलं ? अजून काही दिवस असायला हवं .... असं शिबिरार्थींना वाटणं हे ह्या शिबिराचं फलित!
काही ठळक वैशिष्ट्ये (सुख - सुविधा):
१)केंद्राचा परिसर निसर्गरम्य व स्वच्छ आहे. आजूबाजूला मोर हिंडत असतात. चित्रातल्या सारखा पिसारा फुलवलेला मोर प्रत्यक्ष पहिल्यांदा बघितला.
२) महिला व पुरुषांकरिता वेगवेगळी हॉलमध्ये सोय केली होती. झोपायला मॅट्रेसेस होत्या. पलंग नव्हते. तिथली साफसफाई श्रमसंस्कारामध्ये आपल्यालाच(गणाप्रमाणे) करावी लागते.
३) संडास बाथरूम जुने होते ... स्वच्छ असले तरी तसे दिसत नव्हते.
४) सकाळी पोटभर चहा व नाश्ता. दुपारी सौदेंडियन चवीच्या भाज्या, रस्सम, सांबार, ताक, भात, पोळी असं सात्त्विक पोटभर जेवण व रात्री हलका आहार. ताटवाटी, पेले आपआपली धुऊन ठेवावी लागतात.
५) प्रेमाने व अदबीने बोलणारे स्वयंसेवक
६) वक्तशीरपणा व शिस्त, वाखाणण्याजोगी
७) जास्त दिवस राहायचे असल्यास माफक दरात रूम्स मिळतात.
८) एकापाठोपाठ कार्यक्रम असले तरी कंटाळवाणे होत नाही निदान आम्हाला तरी झाले नाही.
९)नि:शुल्क वैद्यकीय सेवा, वाचनालय (वाचायला वेळ मिळत नाही) उपलब्ध आहे.
१०)माननीय वक्त्यांबरोबर चर्चा, शंकासमाधान व प्रश्नोत्तरे व्हायला पाहिजे.
११)ही गोष्ट ऐच्छिक होती ती सक्तीची करायला हवी ती गोष्ट म्हणजे मोबाइलच्या वापरावर बंदी. स्वानुभव - माध्यमांच्या उपास शारीरिक व मानसिक आरोग्याकरिता हितकारक असतो.
माननीय श्री एकनाथजी रानड्यांचं चरित्र सांगणारं हे शिबीरगीत प्रत्येक दिवशी गायला जायचं....
शतशः नमन श्री एकनाथजी
शतशः नमन श्री एकनाथजी
ह्रुदयसे नमन श्री एकनाथजी ||धृ||
देश में छाई थी जब घोर निराशा
विवेकानंद स्मारक की ना रही आशा|
संगठित देश की उर्जा आप किये
भव्य स्मारक शिला पर आप साकार किये ||१||
सीमित न किया स्मारक पत्थरों में
समर्पण, सेवा, त्याग हो युवा के जीवन में|
सेवा संगठन की आप स्थापना किये
ध्येयगामी जीवन आप सदा जिये||२||
उत्तरपुर्व क्षेत्र को दी प्राधान्यता
आध्यात्मप्रेरित सेवा की कराई मान्यता|
'एक जीवन एक ध्येय' का मंत्र सिखाया
सेवा ही साधना का अर्थ समझाया||३||
समर्पण और निष्ठा से कार्यरत रहे
अमृत के हम सुपुत्र है ये बोध भी रहे|
आदान से सदैव हम अधिक प्रदान करे
वैभवशाली भारत का निर्माण हम करे ||४||
कर्म पुष्पों से हो वन्दना आपकी
ह्रुदय से नमन श्री एकनाथजी|
अप्रतिम लेख, अनुभव.. आणि लेखन
अप्रतिम लेख, अनुभव.. आणि लेखन नेहमी प्रमाणेच..
पण सगळेच अनुभव व्यक्त करता येतातच असं नाही अन काही वेळा सांगावेसेही वाटत नाही तो आपला सुखद ठेवा असतो... आठवणींच्या गाभार्यात मखमली वेष्टणात गुंडाळून ठेवलेला. फक्त आणि फक्त आपणच त्याचे खजिनदार व राखणदार. +++++१ खुप खुप आवडलेल वाक्य..
छान आहे हे .. प्रचि टाका ना
छान आहे हे ..
प्रचि टाका ना अजुन ...
फार सुंदर लेख.
फार सुंदर लेख.
सायली, प्रकु, अंजु धन्यवाद!
सायली, प्रकु, अंजु धन्यवाद! प्रचि टाकीन....
अतिशय सुन्दर लेख आहे
अतिशय सुन्दर लेख आहे मन्जुताई!
छान माहिती दिलीत.
वाह, मंजूताई - फारच सुंदर लेख
वाह, मंजूताई - फारच सुंदर लेख / अनुभव ..... आणि हे सारे आमच्याबरोबर शेअर केलेत याकरता अनेकानेक धन्यवाद ... ____/\___
खूप वर्षांपूर्वी मा. एकनाथजी पुण्यात आले असता त्यांच्या दर्शनाचा योग आला होता. एकनाथजी म्हणजे अद्वितीय ध्येयप्रेरित समर्पित व्यक्तिमत्व .....
धन्यवाद शशांकजी ... तुम्ही
धन्यवाद शशांकजी ... तुम्ही म्हणता ते अगदी खरंय ... त्यांच चरित्र वाचलं/ऐकलं की भारावून जातो...
माझे सासू-सासरे ह्या शिबिराला
माझे सासू-सासरे ह्या शिबिराला औरंगाबादहून आले होते.
अध्यात्मिक शिबीर १८ ते २५
अध्यात्मिक शिबीर १८ ते २५ फेब्रुवारीला कन्याकुमारीला आहे.