सेवाभावी संस्था

मेळघाट शैक्षणिक प्रकल्प - ‘मैत्री शाळा २०१९-२०२०’

Submitted by हर्पेन on 19 June, 2019 - 07:24

नमस्कार मंडळी

पुण्यामधील ‘मैत्री’ संस्था अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यातील हातरु या मेळघाटमधील भागामध्ये गेली २० वर्षे काम करीत आहे. आरोग्य, शिक्षण, शेती, संघटन अशा विविध पातळ्यांवर हे काम चालते. धडक मोहिमेसोबतच गेली काही वर्षे आपण राबवत असलेले शैक्षणिक उपक्रमही मेळघाटातल्या मुलांकरता लाभदायक ठरत आहेत.

आमचा बिरादरीचा हॉस्पिटल स्टाफ

Submitted by लोकेश तमगीरे on 16 June, 2019 - 01:51

प्रिय मायबोलीकर,
मी आणि सोनू आम्ही ३ वर्ष लोक बिरादरी प्रकल्प, हेमलकसा येथील दवाखान्यात आणि आस-पास च्या २६ आदिवासी खेड्यांमध्ये आरोग्य विषयक काम केलं. नुकताच आमचा प्रोजेक्ट संपला. हॉस्पिटल स्टाफशी आमचं खूप घट्ट नातं झालय. त्यांचाच आठवणीत म्हणून मी हे त्यांना लिहिलं होतं. तेच मी मायबोली वर शेअर करतोय. धन्यवाद ..!!

प्रिय मित्र मैत्रिणींनो,

मेळघाटात आरोग्य शिबीर - डॉक्टर हवे आहेत

Submitted by हर्पेन on 22 March, 2019 - 04:46

*मेळघाटात आरोग्य शिबीर - डॉक्टर हवे आहेत*

आपल्या सर्वांच्या मदतीनं मेळघाटात कुपोषण आणि बालमृत्यूवर नियंत्रण आणण्यात आपण यशस्वी झालो. अशी कामं एकट्या-दुकट्यानं होत नाहीत. तुम्ही सारे सोबत आलात म्हणूनच ते यशस्वी झालं.

सामाजिक उपक्रम -२०१९

Submitted by निशदे on 8 March, 2019 - 12:00

सामाजिक उपक्रमाचे हे आपले दहावे वर्ष. हा उपक्रम तसा मायबोलीकरांना नवा नाही. मायबोलीकरांच्या साथीने गेली ९ वर्षे स्वयंसेवक हा उपक्रम यशस्वीपणे पार पाडत आले आहेत.समाजासाठी कार्य करणार्‍या संस्थांना सामाजिक उपक्रमाद्वारे मदत मिळवून देण्यास आपण प्राधान्य देतो. या उपक्रमात दरवर्षी ज्यांना सरकारकडून फारशी मदत मिळत नाही (वा मिळतच नाही) किंवा संस्था मुख्यत्वे फक्त देणगीदारांवर चालते अशा गरजू संस्थांना प्रामुख्याने वस्तुरुपात मदत करण्यावर आपला भर असतो.

शब्दखुणा: 

सामाजिक उपक्रम - मायबोलीकरांकडुन सिंहावलोकन

Submitted by सुनिधी on 7 February, 2019 - 16:01

नमस्कार,

मायबोलीकरांनी मिळून सामाजिक उपक्रम सुरु करुन ९ वर्षे झाली. यंदा या उपक्रमाचे १० वे वर्ष. गेली ९ वर्षे मायबोलीकरांनी व मायबोलीकर नसलेल्या दात्यांनी देखील या उपक्रमाला भरभरुन प्रतिसाद दिला. मायबोलीकरांनी सढळ हातांनी दिलेल्या देणग्यांमुळे सामाजिक उपक्रमाद्वारे अनेक गरजू संस्थांना मदत करणे शक्य झाले.

कायम चांगल्या संस्था निवडणे, त्यांच्याशी संपर्क करणे, त्यांच्या गरजा, देणग्यांचा मेळ बसविणे, सर्व देणगीदारांना पावत्या वेळेवर मिळणे ही सर्व स्वयंसेवकांची महत्वाची कामे यात केली जातात.

*अमृतमहोत्सवी गीता स्वाध्याय भजन मंडळ*

Submitted by ASHOK BHEKE on 13 January, 2019 - 00:15

रस्त्याच्या कडेला झाड उगवते त्याप्रमाणे समाजात मंडळे निर्माण होत असतात. काही जगतात तर काही पायी तुडविली जातात, काही पालनपोषण न केले की मरून जातात. परंतु घोडपदेव विभागातील गीता स्वाध्याय भजन मंडळाला आज ७५ वर्षे झाली.अजून सन्मानाने त्यांची नभात ध्वजा फडकावीत समाजात उमंग, आनंद तरंग पसरवित भजन कीर्तन प्रवचन यातून समाजाला सामाजिक प्रबोधन करीत धार्मिकतेचे ज्ञान उपलब्ध करून देण्यासाठी उगम पावलेली गीता स्वाध्याय भजन मंडळ हि संस्था आजही आपल्या जोरावर मुंबई, आळंदी, पंढरपूर या ठिकाणी आपल्या नावाचा दबदबा राखून आहे.

पराजय नव्हे, विजय!

Submitted by झुलेलाल on 14 October, 2018 - 13:20

सह्याद्रीच्या एका उंच कड्याच्या पायथ्याशी वसलेलं कोकणातलं एक टुमदार गाव... हा कडा असा उभा, सरळसोट उभा, की त्याच्या पायाशी उभे राहिल्यावर आपल्याला या निसर्गचक्रातील आपल्या क्षुद्रपणाची आपोआप जाणीव व्हावी, मनावर साचलेली अहंपणाची सारी जळमटे साफ झाल्याचा साक्षात्कार व्हावा...
तर, त्या गावात त्या दिवशी हा अनुभव घेऊन मी तिथल्या शाळेत पोहोचलो. निमित्त खासच होतं.

सामाजिक उपक्रम २०१८ आढावा

Submitted by प्राची. on 6 September, 2018 - 03:49

आपल्या सामाजिक उपक्रमाचे हे ९ वे वर्ष. नेहमीप्रमाणे यावर्षीही आपल्यापैकी काही मायबोलीकरांनी एकत्र येऊन सामाजिक उपक्रमासाठी मायबोली आणि मिसळपाववर आवाहन व घोषणा केली. याप्रकारे आवाहनात दिलेल्या यादीतून इच्छुक देणगीदारांनी आपापल्या पसंतीच्या संस्था निवडल्या व ते देणगी देऊ शकत असलेली रक्कम सामाजिक उपक्रम टीमला कळवली. तसेच त्या संस्थेकडे पैसे जमा केल्यावर त्याबद्दलही आम्हाला कळवले.

मैत्री शाळा – मेळघाट २०१८ –१९ मैत्री गणित विज्ञानाशी

Submitted by हर्पेन on 9 July, 2018 - 05:14

नमस्कार मंडळी

मैत्रीची सुरुवात मेळघाटातल्या कुपोषण निर्मूलन आणि आरोग्य विषयक कामांपासून झाली असली तरी गेली काही वर्षे आपण मेळघाटातल्या शाळा आणि मुलांचे शिक्षण सातत्य या मुलभूत बाबींकडे आवर्जून लक्ष पुरवत आहोत.

Pages

Subscribe to RSS - सेवाभावी संस्था