(मुक्काम पोष्ट घोडपदेव)

*अमृतमहोत्सवी गीता स्वाध्याय भजन मंडळ*

Submitted by ASHOK BHEKE on 13 January, 2019 - 00:15

रस्त्याच्या कडेला झाड उगवते त्याप्रमाणे समाजात मंडळे निर्माण होत असतात. काही जगतात तर काही पायी तुडविली जातात, काही पालनपोषण न केले की मरून जातात. परंतु घोडपदेव विभागातील गीता स्वाध्याय भजन मंडळाला आज ७५ वर्षे झाली.अजून सन्मानाने त्यांची नभात ध्वजा फडकावीत समाजात उमंग, आनंद तरंग पसरवित भजन कीर्तन प्रवचन यातून समाजाला सामाजिक प्रबोधन करीत धार्मिकतेचे ज्ञान उपलब्ध करून देण्यासाठी उगम पावलेली गीता स्वाध्याय भजन मंडळ हि संस्था आजही आपल्या जोरावर मुंबई, आळंदी, पंढरपूर या ठिकाणी आपल्या नावाचा दबदबा राखून आहे.

मरावे परि देहरूपी उरावे......!

Submitted by ASHOK BHEKE on 19 December, 2018 - 12:22

विशाल भिसे यांचा वाढदिवस झाला अनेकांनी शुभेच्छा देऊन हा सण साजरा केला. त्यानिमित्ताने त्यांनी समाजाला देऊ केलेली परताव्याची भेट ही अनमोल आहे. त्याविषयी विस्तृत मी खाली लिहीलच अगोदर थोडसं या तरुण रक्ताविषयी.विशाल नावाचं रत्न घोडपदेव,फेरबंदर, काळाचौकी प्रभागात सध्या कार्यरत आहे. मध्यंतरी कविता चान्दोस्कर या गतिमंद मुलीसाठी डी पी वाडीतील तरुण मंडळी या सामाजिक उपक्रमात उतरलेले पाहून स्वत:हून अभिनंदन इमारतीच्या बाहेर ते सहकारी मित्रांसोबत मदत गोळा करायला बसलेले होते. त्यांची जीवनाभिमुख वृत्ती आणि कुतूहल हे पाहिले की विंदांच्या कवितेच्या ओळीचा आशय डोळ्यासमोर उभा राहतो.

विषय: 

देवांचे दलाल

Submitted by ASHOK BHEKE on 10 November, 2018 - 23:48

मंदिरात जायचे म्हटले की, का कोण जाणे भीती वाटते. ते जागृत देवस्थान म्हटले की अजून मनात भीती निर्माण होते. भीती देवाची नसते, ती असते ती देवपण पांघरलेल्या भटजी पुजाऱ्याची. हे भाविकांचे भटजी नसतातच. ते असतात फक्त त्यांना दक्षिणा देणाऱ्या श्रीमंताचे....! दानपेटीवर त्यांची भलीमोठी थाळी म्हणजे मंदिरापेक्षा त्यांची जमापुंजी अधिक आढळून येते. मध्यंतरी आम्ही एका सुप्रसिध्द मंदिरात गेलो होतो.पंचवीस एक पुजारी त्या मूर्तीच्या भोवती.... दर्शनाला आलेल्या भक्तांच्या हृदयात त्या देवाची झेरॉक्स छापून घ्यायची ही माफक अपेक्षा.

विषय: 

आमचा सुरमयी विनू

Submitted by ASHOK BHEKE on 10 November, 2018 - 23:44

आमचा विनू म्हणजे *विनायक जोशी*. डोंबिवली सारख्या सांस्कृतिक नगरीला लाभलेले म्हणण्याऐवजी *बँक ऑफ इंडिया* सारख्या राष्ट्रीयकृत बँकेला लाभलेला आनंदाचा झरा. सतत आनंदाने पाझरत असतो. बागा फुलवीत असतो. अनेकांच्या मनातल्या बागा फुलविण्यासाठी त्यांनी उच्चारलेले, वाह .... क्या बात है....! अप्रतिम. काय त्याचं बोलणं, मधात घोळलेले आणि तुपात तळलेलं.एखाद्याने सहज फिदा व्हावं, अगदी तसं गोड बोलणं.काय विलक्षण जादु आहे या माणसात....! निखळ आनंद निर्माण करू पाहणारे श्री विनायक जोशी जसे बोलतात त्याचे कारण त्यांचं जेवणात गोडवा असतो.

विषय: 
Subscribe to RSS - (मुक्काम पोष्ट घोडपदेव)