तंत्रज्ञान

प्रस्तावः आंतरजालीय कला सार्वजनीकरीत्या वाटण्याची परवानगी आणि त्यावरील चर्चेचे आवाहन

Submitted by स्पॉक on 14 May, 2015 - 14:44

माबोवरील अनेक लेखकांच्या कविता / गझला मला खुप आवडतात.
माझ्यासारखीच आवड असणा-या मित्रांना आणि ओळखितील ईतरांसोबत, ही कला वाटावी असे मला वाटते.
ब-याचवेळा या कलेवर आम्ही, आमच्या अल्पमतीने थोडीफार चर्चाही करतो.

ईथे कला म्हणजे लेख, कथा, कविता, गझल, पा.कृ किंवा प्रकाशचित्र अपेक्षीत आहे.

यामधे पेटेंटेड किंवा एखाद्या विशिष्ट कामासाठिचे कॉपीरायटेड मटेरीयल जसे की पी.एचडी संदर्भातले लेखन किंवा एखाद्या संशोधना संबंधी कॉपीरायटेड लेख अपेक्षीत नाही.

सोशल मिडीया आणि नोकरी

Submitted by नितीनचंद्र on 13 May, 2015 - 03:03

जानेवारी २०१५ मध्ये जेव्हा I-HRD या संस्थेने एक दिवसाचा रिक्रुटमेंट युजींग सोशल मिडीया असा एक दिवसाचा वर्कशॉप घेशील का म्हणुन मला विचारले तेव्हा या विषयाची खोली इतकी आहे मला ही माहित नव्हते. जस जसा वर्कशॉप चा दिवस जवळ येतोय तस तसे माहितीच्या जंजाळातुन काय घेऊ आणि काय नको घेऊ असे झाले आहे.

२००८ मध्ये मी जेव्हा एका कंपनीमध्ये एच आर मॅनेजर म्हणुन काम पाहु लागलो तेव्हा नुकतीच मंदीची लाट सुरु झाली. या लाटेत तोटा होऊ नये म्हणुन कंपन्यांनी रिक्रुटमेंट कन्सलटंट नकोत म्हणुन सांगीतले. यावर भर की काय म्हणुन नोकरी डॉट कॉम व मोनस्टर ह्या जॉब पोर्टलचे वार्षीक सबस्क्रिपशन सुध्दा गोठवले.

माहिती हवी आहे. )

Submitted by सुभाषिणी on 4 May, 2015 - 10:59

माहिती हवी आहे.
जसे इंग्लिश चुका दुरुस्ती साठी स्पेल चेक असते तसे मराठीत ह्रस्व दीर्घ ई. व्याकरण विषयक चुका दुरुस्ती साठी काही मार्ग आहे का.(कोम्पुतेर टायपिंग करताना )

Net Neutrality - भारतामध्ये आंतरजालाची तटस्थता

Submitted by धनि on 13 April, 2015 - 15:45

नेट न्युट्रॅलिटी म्हणजे सोप्या भाषेत मला कळले ते म्हणजे सध्या कुठली ही वेबसाईट किंवा अ‍ॅप सारख्याच स्पीड नी आपल्यापर्यंत पोहोचतात. म्हणजे इंटरनेट हे कुठल्याही सर्वीसच्या बाबतीत न्युट्रल आहे.

पण ट्राय (Telecom Regulatory Authority of India) च्या नविन नियमानुसार, ते काही सर्व्हीस ना ओव्हर द टॉप सर्व्हीस OTT म्हणणार आहेत (उदा: व्हॉट्स अ‍ॅप, नेफी वगैरे) म्हणजे मग नेट कंपन्यांना (एअर्टेल, वोडाफोन) या सर्व्हीसेस कडून किंवा त्यांच्या ग्राहकांकडून जादा पैसे मिळवता येतील.

म्हणजे आपण डेटा चार्ज पण भरायचा आणि व्हॉट्स अ‍ॅप वापरतो म्हणून एक्स्ट्रा पण!!

तडका - छुप्या कँमेर्‍याचे सत्य,.!

Submitted by vishal maske on 5 April, 2015 - 21:26

छूप्या कँमेर्‍याचे सत्य,..!

कुणा-कुणाच्या नैतिकतेत
नको तितकी खोट असते
त्यांच्यामुळेच माणूसकीला
पून्हा-पून्हा गाल-बोट असते

जणू अनैतिकतेच्या परामर्शाने
विचारच त्यांचे नासवलेले असतात
म्हणूनच महा-कोडगांच्या औलादींनी
कुठे छूपे कँमेरे बसवलेले असतात,..

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

पॉली हाउसेस. कान्होबाची वाडी व सातवड. जि.अहमदनगर

Submitted by मानुषी on 31 March, 2015 - 03:29

मागचा रवीवार निसर्गाच्या सान्निध्यात अगदी सार्थकी लागला. आणि वाटायला लागलं की शहरी दिनक्रमात आपण जीवनातल्या अगदी सहज साध्या छोट्या छोट्या आनंदाला मुकतो.
नगर जिल्ह्यातल्या पाथर्डी तालुक्यात कान्होबाची वाडी व सातवड या दोन्ही खेड्यात असलेल्या पॉलीहाऊसला भेट देण्याचा योग आला.
ही गावं नगरपासून पाऊण तासाच्या अंतरावर आहेत.
निसर्गाचा लहरीपणा किंवा अनियमितता कधीकधी पिकांसाठी फारच मारक किंवा हानिकारक ठरते. पण पॉलीहाऊसच्या प्रगत तंत्रज्ञानामुळे शेतकरी अश्या प्रकारच्या नैसर्गिक आपत्तींशी सक्षमपणे लढा देऊ लागलाय.

भारतात बुलेट ट्रेन व्हावी का ?

Submitted by बाळू पॅराजंपे on 29 March, 2015 - 02:50

भाजपने भारतात बुलेट ट्रेन सुरू व्हावी असं निवडणुकी आधी सूचित केलं होतं. निवडून आल्यानंतरही बोलून दाखवलं होतं. मुंबई अहमदाबाद या मार्गाचं सवेक्षण झालेलं आहे असंही सांगितलं गेलं होतं. रेल्वेमधे काय बदल व्हावेत असा भाजपाचा एक फोरम आहे, यात बुलेट ट्रेनला वाढता पाठिंबा आहे. हे सरकार बुलेट ट्रेन आणू शकेल याबद्दल शंका नाही.

पण भारतात या मार्गावर बुलेट ट्रेन यावी का ?
उत्तर हो असल्यास कारणे अपेक्षित आहेत. नाही असल्यासही कारणे अपेक्षित आहेत.

शब्दखुणा: 

तडका - पाठिंब्याच्या आशा

Submitted by vishal maske on 28 March, 2015 - 10:53

पाठिंब्याच्या आशा,...

पाठिंबा देण्या-घेण्यासाठी
मना-मनामधुन गळ असतो
पाठिंब्यात मिळालेला आधार
जणू उम्मेदिचं बळ असतो

कधी इतिहासाच्या पाऊलखुणा
वर्तमानात पहूडलेल्या असतात
अन् पाठिंब्याच्या आशा मात्र
मना-मनात दडलेल्या असतात

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

शब्दखुणा: 

व्यक्तीची योग्यता,...

Submitted by vishal maske on 27 March, 2015 - 23:02

व्यक्तीची योग्यता,...

प्रत्येक-प्रत्येक व्यक्तीची
इथे योग्यता पाहिली जाते
योग्य व्यक्तींची अप्रत्यक्षही
कधी गाथा गायली जाते

विचार आणि कार्यावरून
व्यक्तीची योग्यता कळून जाते
अन् त्यांची यशस्वीता सुध्दा
जणू त्यांच्यासाठी चालुन येते

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

शब्दखुणा: 

तडका - सन्मान

Submitted by vishal maske on 27 March, 2015 - 11:09

सन्मान,...

चांगले काम करण्याच्या
प्रत्येकाला संधी असतात
अन् प्रत्येकाच्या कार्याच्या
इथे सर्व नोंदी असतात

त्यांच्या सत्कार्याचा भाग
देशाचीही शान होतो
अन् प्रत्येकाच्या सत्कार्याचा
सन्मानानं सन्मान होतो

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - तंत्रज्ञान