सोशल मिडीया आणि नोकरी

Submitted by नितीनचंद्र on 13 May, 2015 - 03:03

जानेवारी २०१५ मध्ये जेव्हा I-HRD या संस्थेने एक दिवसाचा रिक्रुटमेंट युजींग सोशल मिडीया असा एक दिवसाचा वर्कशॉप घेशील का म्हणुन मला विचारले तेव्हा या विषयाची खोली इतकी आहे मला ही माहित नव्हते. जस जसा वर्कशॉप चा दिवस जवळ येतोय तस तसे माहितीच्या जंजाळातुन काय घेऊ आणि काय नको घेऊ असे झाले आहे.

२००८ मध्ये मी जेव्हा एका कंपनीमध्ये एच आर मॅनेजर म्हणुन काम पाहु लागलो तेव्हा नुकतीच मंदीची लाट सुरु झाली. या लाटेत तोटा होऊ नये म्हणुन कंपन्यांनी रिक्रुटमेंट कन्सलटंट नकोत म्हणुन सांगीतले. यावर भर की काय म्हणुन नोकरी डॉट कॉम व मोनस्टर ह्या जॉब पोर्टलचे वार्षीक सबस्क्रिपशन सुध्दा गोठवले.

जरी भरती १/४ झाली तरी नोकरीची जाहिरात कुठे द्यायची ? योग्य उमेदवार कुठे आणि कसे शोधायचे हा प्रश्न माझ्या पुढे उभा राहिला. यातुनच सुरवातीला शोध लागला तो पैसे न घेता इंटरनेटवर जाहिराती देता येणार्‍या वेब साईटस चा. याच्या पुढे जाऊन कोणाशीही चर्चा/ सल्ला न घेता मी फेसबुक, लिक्डईन आणि ट्वीटर या सोशलमिडीयाचा रिक्रुटमेंट साठी वापर सुरु केला आणि मर्यादीत यश ही मिळवले.

हे सगळे करताना सोशल मिडीयाचा रिक्रुटमेंट साठी वापर ही नोकर्‍यांच्या जगात मोठी क्रांती घडत आहे या बाबत २०१४ साला पर्यंत मी अनभिज्ञ होतो. माझा स्वतःचा सोधल प्रोफाईल मी लिंकडीनवर अपडेत करत राहिलो. नविन सोशल कॉन्टक्ट जोडत राहिलो आणि त्याचा विवीध गोष्टींसाठी वापर करत राहिलो. पण सोशल मिडीया रिक्रुटमेंट साठी कसा वापरतात यावर कोणी वर्कशॉप घ्यायला बोलावेल असा विचार सुध्दा आला नव्हता.

मायबोलीचा शोधही मला याच मुळे लागला. करायला गेलो एक आणि कथा, लेख तसेच कविता करायला लागलो हे फळ अजिबात अपेक्षीत नव्हते. नविन मित्र जोडले गेले हा भाग आणखी महत्वाचा.

आज भारत सोडला तर विकसीत देशात रिक्रुटमेंट आणि सोशल मिडीया म्हणजे लिक्डीन, फेसबुक, ट्वीटर , ब्लॉग्ज आणि युट्युबवरचा व्हिडीओ- सी व्ही शिवाय याच एक अतुट नात तयार झाल आहे. आय टी कंपन्यात तर सोशल मिडीया आणि रिक्रुटमेंट हा अविभाज्य घटक झाला आहे.

आनंदाची बाब या विषयात शोध घेताना सापडली ती म्हणजे सारंग ब्रह्मे हा मराठी युवक आपल्या प्रयत्नातुन कॅपजेमिनी या कंपनीत आपल स्थान निर्माण करण्यात यशस्वी झालेला आहे.

सारंग ब्रह्मे सध्या कॅपजेमिनी या आय टी कंपनीत ग्लोबल हेड सोशल रिक्रुटींग या पदावर काम करतोय. सोशल रिक्रुटींग हेड - इंडिया या पदावरुन ही बढती त्याने त्याच्या असामान्य कामाने मिळवली आहे.

यातला आश्चर्यकारक भाग असा की भारतात सोशल मिडीयाचा प्रभाव अजुन वाढतोय. विकसीत देशात मात्र लिकडीन वर प्रोफाईल नाही अस घडत नाही. अश्या वेळेला याचे महत्व समजुन सोशल रिक्रुटमेंट या क्षेत्रात आघाडी मिळवायची आणि सर्वात उच्च पदावर ताबा मिळवायचा तो ही एका मराठी युवकाने ?

प्रिंड मिडीया म्हणजे वर्तमानपत्रातल्या नोकरीच्या जाहिराती किंवा नोकरी डॉट कॉम सारखे जॉब पोर्टल्स उमेदवारांना कंपन्या विषयक फारशी माहिती पुरवत नाहीत. उमेदवारांना अगदी नोकरीचा अर्ज पाठविण्यापुर्वी कंपनी विषयक, कंपनीच्या कर्मचारी विषयक धोरणांबाबत, फॅसीलीटी बाबत, व्यवसायातल्या प्रगती बाबत सातत्याने महिती हवी असते. ही पुरविण्यासाठी जुन्या पध्दतीत खर्च जास्त असतो आणि पुन्हा त्याचे एक आयुष्य असते. सोशल मिडीयाचा वापर करुन संभाव्य उमेदवारांपर्यंत ही ताजी माहिती बिनखर्चात, तात्काळ पोचवण्याचा मार्ग म्हणजे सोशल मिडीया.

जसा ग्राहक एखादी वस्तु पडताळुन खरेदी करतो तसा संभाव्य उमेदवार सुध्दा कंपनीची माहिती घेतल्याशिवाय जॉब ऑफरच काय पण नोकरीसाठी आपली माहिती पुरवायला फारसा राजी नसतो. हे सत्य फक्त आय टी कंपनीच्या बाबतीत आहे असे नाही. तीन वर्षांपुर्वी एका आय टी आय मधे शिकाऊ उमेदावार भरती करायला गेलो असताना आय टी आय चे प्राचार्य मला म्हणाले की पुर्वी कंपन्या उमेदवारांच्या मुलाखती घ्यायच्या. आज फक्त आय टी आय शिक्षण झालेले संभाव्य उमेदवार कंपनीत काय स्टायपेंड आहे ? कॅन्टीन आणि बस फॅसीलीटी आहे का ? यासारखे प्रश्न विचारुन मगच निर्णय घेतात.

काळ बदलतो आहे तश्या पध्दती ही बदलत आहेत याचा अनुभव सर्वच क्षेत्रात येतो आहे. मग नोकरी शोधायला निघाल्यावर आपला प्रोफाईल सोशल मिडीयावर आहे का ? आपला व्हिडीओ सी वी यु ट्युब वर आहे का ? आपली सोशल माहिती फेस बुक वर आहे का? ह्या प्रश्नांना उत्तरे मिळाल्याशिवाय आपल्याला नोकरीच्या संधी हव्या तितक्या येणे अशक्य आहे. यातुन परदेशात नोकरी करायला निघाला असाल तर मग हे हवेच.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वेगळा विषय..... अनभिज्ञ आहे याबाबत.
लिन्क्डैन वर गंमत म्हणुन मी देखिल अपलोड केलय माझे प्रोफाईल, पण लिन्कडैन चा कॅन्डिडेट सर्चसाठी वापर होत असेल याचा अंदाज नव्हता.

लिंक्ड-इन हे प्रोफेशनल नेटवर्क अतिशय उपयुक्त आहे. मुलाखतीस जाण्याआधी मुलाखत घेणार्‍याची माहिती मिळवणे त्याप्रमाणे कोणते प्रश्न येतील ह्याचा अंदाज घेणे हे अशा नेटवर्कमुळे सहज करता येते. त्याचप्रमाणे मुलाखतीस येणार्‍या उमेदवाराची माहिती जर लिंक्ड-इन सारख्या प्रोफेशनल नेटवर्कवर तपासता आली तर चांगले इंप्रेशन पडते असे माझे निरिक्षण आहे.

वेगळा विषय.. पण म्हणून जॉब पोर्टल्स चे महत्व कमी झालेले नाही. परदेशी नोकरीसाठी ते महत्वाचे आहेतच.

दिनेशजी,

वेगळा विषय.. पण म्हणून जॉब पोर्टल्स चे महत्व कमी झालेले नाही. परदेशी नोकरीसाठी ते महत्वाचे आहेतच + १

जॉब पोर्टल्स चे महत्व कमी झालेले नाही पण अनेक सोर्सेच मध्ये सोशल मिडीया असा सोर्स आहे जो रिक्रुटमेंट टीम ला जे उमेदवार पॅसीव्ह समजले जातात. म्हणजे स्वतः नोकरीच्या जाहिराती शोधत नाहीत. जॉब पोर्टलवरचा आपला सी व्ही दर सहा महिन्यांना अपडेट करत नाहीत अश्या लोकांना सोशल मिडीयामधुन शोधले जाते.