भारतात बुलेट ट्रेन व्हावी का ?

Submitted by बाळू पॅराजंपे on 29 March, 2015 - 02:50

भाजपने भारतात बुलेट ट्रेन सुरू व्हावी असं निवडणुकी आधी सूचित केलं होतं. निवडून आल्यानंतरही बोलून दाखवलं होतं. मुंबई अहमदाबाद या मार्गाचं सवेक्षण झालेलं आहे असंही सांगितलं गेलं होतं. रेल्वेमधे काय बदल व्हावेत असा भाजपाचा एक फोरम आहे, यात बुलेट ट्रेनला वाढता पाठिंबा आहे. हे सरकार बुलेट ट्रेन आणू शकेल याबद्दल शंका नाही.

पण भारतात या मार्गावर बुलेट ट्रेन यावी का ?
उत्तर हो असल्यास कारणे अपेक्षित आहेत. नाही असल्यासही कारणे अपेक्षित आहेत.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पण भारतात या मार्गावर बुलेट ट्रेन यावी का ?
>>
>>
तुम्ही हा प्रश्न इतर सभासदां विचारण्या आधी, भारतात बुलेट ट्रेन का नसावी ह्यावर चार शब्द, वरच्या तुमच्या लेखात लिहिलेत तर चर्चा करायला अधिक सोयिस्कर पडेल असे वाटते. शिवाय जगात इतर अनेक देशात ज्यावेळी बुलेट ट्रेन सुरु करण्यात आल्या, त्यावेळी तेथील देशात वरच्या प्रकारची जिलेबी छाप चर्चा झाल्याचा काही विदा असल्यास इथे द्यावा.

भारतात बुलेट ट्रेन व्हावी का ? व्हावी की...
तिच्या वेगात रेल्वेरुळाच्या बाजुला लोटा घेऊन बसलेल पब्लिक दिसनार नाहीत नाहितर लई बेकार वाटत ते बघायला.

जर ही कल्पना यु पी ए ने आणली असती तर त्यात काही चांगले असायची शक्यता होती पण ती भाजपा/मोदीच्या काळात आली आहे म्हणजे त्यात नक्कीच काहीतरी काळेबेरे असणार आणि अंबानी/अदानी चा पण हात असणार. सो नको. आम्ही आमच्या कूर्मगतीवर हॅपी आहोत.

काय सांगता? युपीएच्या प्रत्येक गोष्टीत घोटाळा बघणारे आंधळे भक्त आता इतरांना शिकवु लागले आहेत
युपीएच्या प्रत्येक गोष्टीत चुका काढुन त्यावर धागे काढणारे आता मोदीची ने घेतलेल्या निर्णयावर धागा निघु नये म्हणुन केविलवाणी धडपड करत आहेत.

चुलखांडात घाला ती एक किमी रुळ घालायला १०० कोटि रुपये लागणार रेलवे!!! हाय त्या गाड्यांत आधी धड़ सुविधा द्या!! मग पाहु!

बाळू प्याराजम्प्ये,

उत्तम विषय. बऱ्याच लोकांचं म्हणणं पडतं की अतिद्रुत लोहशकट (=हायस्पीड रेल्वे) भारतातही आणावी. विशेषत: चीनमधील अतिद्रुत लोहमार्गाचं जाळं बघून आपल्या इथे असायला हवं असं उगीचंच वा सहाजिकंच वाटतं. तर अतिद्रुत लोहमार्गासंबंधी विवेचने (कन्सिडरेशन्स) बघूया.

१.
युरोपात (आणि जपानात) नजीकच्या विमानप्रवासास पर्याय म्हणून अतिद्रुत लोहमार्गाची सुरुवात झाली. पहिल्या ५०० किलोमीटर्सपर्यंत विमानापेक्षा लोहमार्ग बरा पडतो. हे अंतर साधारणत: मुंबई ते कर्णावती (अहमदाबाद) इतके आहे. याच्या पल्याड म्हणजे दिल्लीपर्यंत वगैरे जायचं झाल्यास विमान बरं पडावं.

२.
मात्र एकदा का चारही महानगरांच्या ५०० किमीच्या परिक्षेत्रात अतिद्रुत मार्ग टाकून झाले की ते एकमेकांना जोडण्याची कल्पना जोर धरेलंच. मात्र तरीही मुंबई दिल्ली (उदाहरणार्थ) थेट गाडी सोडणं व्यावसायिक दृष्ट्या कितपत फायदेशीर ठरेल याची शंकाच आहे. तशी ३०० किमी वेगाने मुंबईहून दिल्लीस जाण्यास सुमारे ५ तास लागतील. मग तेव्हढ्याच पैशात विमानाने २ तासांत जाता येत असेल तर गाडीने का जावे? यामुळे गाडीचे भाडे विमानाच्या निम्मेतरी ठेवावे लागेल. इतक्या कमी पैशात मुंबई ते दिल्ली अतिद्रुतमार्गाची व गाडीची देखभाल करणे बरेच कठीण पडावे. अर्थात, एक गाडी विमानाच्या दुप्पट माणसे वाहून नेऊ शकते हा मुद्दा गाडीच्या पथ्यावर पडणारा आहे. त्यामुळे विमानप्रवास क्षमता शिगेला पोहोचली असेल तर गाडी सुरू करणे फायद्यात पडावे.

३.
त्यामुळे एक प्रयोग म्हणून मुंबई कर्णावती मार्ग चाचणीसाठी एकदम योग्य आहे. शासनाने या मार्गाचा अदमास घेऊन पुढील कार्यक्रम आखावा.

आ.न.,
-गा.पै.

मुंबई मध्ये राहणारे गुज्जू बेपारी लोक काय कायमचे गुजरात मध्ये राहायला जायला तयार नाहीत. तेवा फक्त बिझनेस गुजरात मध्ये करायला हि बुलेट ट्रेन उपयोगी पडेल. हिरे, शेअर याची मुख्य सेंटर तिकडे टाकायची . धंदा तिकडे न्यायाचा, बाकी रोज राहायला मुंबई .. आणि किती का खर्च असुदे या योजनेचा , उपनगरी ट्रेन चे तिकीट वाढवून टाकू , अजून काही tax मारू जनतेच्या डोक्यावर , पण बुलेट ट्रेन करू आणि गुजरात ला नक्कीच वरती आणू.

हल्ली जो तो ओळखू लागला आहे की एखादी आधुनिकतेची कास धरत विकासाची योजना आली की त्यात अच्छे दिन नेमके कोणाचे येणार आहेत.

अभि१,

तुमचं मुंबईच्या गुजरात्यांचं निरीक्षण एकदम बरोबर आहे. अर्थात हाच व्यापारी वर्ग द्रुतशकटाचा खर्च उचलू शकतो.

उपनगरी गाड्यांवर अधिभार लावूनही फारसा पैसा मिळणार नाही. त्यापेक्षा पश्चिमी समर्पित भारमार्गाद्वारे (वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट करिडॉर) अतिद्रुत प्रवासी मार्गास अर्थपुरवठा होऊ शकेल. अर्थात पसभामा पूर्णपणे चालू होण्यास आजून पाचसात वर्षे तरी जातील. तोवर अतिद्रुत मार्ग न बांधणेच बहुधा उचित ठरावे. तत्ज्ञांनी विचार करून ठेवला असेल अशी आशा आहे.

असो.

अतिद्रुत लोहमार्गाविषयी इथे थोडी माहिती आहे : http://en.wikipedia.org/wiki/High-speed_rail_in_India

आ.न.,
-गा.पै.

तुमचं मुंबईच्या गुजरात्यांचं निरीक्षण एकदम बरोबर आहे. अर्थात हाच व्यापारी वर्ग द्रुतशकटाचा खर्च उचलू शकतो.

उपनगरी गाड्यांवर अधिभार लावूनही फारसा पैसा मिळणार नाही. त्यापेक्षा पश्चिमी समर्पित भारमार्गाद्वारे (वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट करिडॉर) अतिद्रुत प्रवासी मार्गास अर्थपुरवठा होऊ शकेल. अर्थात पसभामा पूर्णपणे चालू होण्यास आजून पाचसात वर्षे तरी जातील. तोवर अतिद्रुत मार्ग न बांधणेच बहुधा उचित ठरावे. तत्ज्ञांनी विचार करून ठेवला असेल अशी आशा आहे.

तुम्ही आधी मराठीत लिहा पाहू Proud Proud

भारतात बुलेट ट्रेन व्हावी का ?

चांगला प्रश्न विचारलात,

कोणाला पाहीज्जे ईथे बुलेट ट्रेन,
ब्रिटीशांनी भारतात रेल्वे आणली १८५४ मध्ये, तेव्हांपासुन १९४७ पर्यंत ब्रिटीशांनी ५३,००० किमी लांबीचे रेल्वे
रुळ टाकले. मग गेल्या ६५ वर्षांत स्वतंत्र भारतामध्ये भारत सरकारने ( काँग्रेस ने) त्यात ११,००० किमी
वाढवली. म्हणजे ब्रिटीशांनी ९० वर्षांत ५३,००० किमी रेल्वे बनवली आणि भारत सरकारने ६५ वर्षांत ११,०००
किमी.

ईतकी भयानक वेगाने परगती करुन देखील काँग्रेस भारतावर ६० वर्षे राज्य करत होतीच की. म्हणजे जनतेला
विकास नकोय, फक्त ६५ व र्षांच्या घोषणा हव्यात.

आता पाच वर्षांनी परत काँग्रेस चेच राज्य येईल तेंव्हा हे सगळे बासनात बांधुन ठेवता येईलच, आणि पुढच्या ६०
वर्षांत होता होइल तिकती रेल्वे वाढवली म्हणजे विकासच विकास !!

आता पाच वर्षांनी परत काँग्रेस चेच राज्य येईल तेंव्हा हे सगळे बासनात बांधुन ठेवता येईलच, >> खरे बोलल्या बद्दल धन्यवाद Rofl शेवटी फेकाड्याचा भ्रम तुटला म्हणायचा

आता कचरा पेटीतुन किळसवाणी प्राणी येईल बघा.

बीळातुन बाहेर आलेच प्राणी !!

६५ वर्षात ११००० किमी सारखा भयंकर विकास करणार्यांना परत राज्य कारायचे डोहाळे लागलेत,

:G:

:G:

:G:

कोंढा जन्मला तेंव्हा चतकोर फुटाचा होता.

बावीस वर्षात आईने त्याला साडेपाच फूट मोठा केला.

पुढे बावीस ते सत्तर वर्षे कोंढा बायकोच्या हातचे खात होता.

पण तरी तो त्यानंतर तो एक दोन इंचच वाढला.

Proud

आली बुलेट ट्रेन तर काय वाईट आहे? तेवढेच वेगात पोहोचू...
पण त्या तरी वेळेवर सुटणार, पोचणार का? नाहीतर उपयोग काय?

वेगात जाऊनसुद्धा वेळेवर येणे कधी जमते का भारतीयांना? नेहेमी उशीरा.
अगदी चाळीस वर्षे परदेशात राहूनहि भारतीयांचा कार्यक्रम असला की सगळे उशीरा! मारे बाता मारतात किं मी किती हुषार, अमुक रस्त्याने आलो, दहा मिनिटे कमी लागतात (नि एक तास उशीरा आलेले असतात)

नुसते दररोज वेळेवर येऊन शिस्तीने काम केले तर बाकी काही सुधारणा नाही केल्या तरी भारताची उत्पादन शक्ति नि वेग दसपट वाढेल.

त्यापेक्षा मालगाड्या करा बुलेट ट्रेन, निदान माल तरी इकडून तिकडे लवकर पोचेल.

काउ,
जन्मला तेंव्हा माणुस म्हणुन
आणि आता तो सर्व योनि मधुन फिरत फिरत शेवटी काउ झाला अस होउ शकत की,
आणि ५०० वर्षांपुर्वी एका "कागलकर" नावाच्या ब्राम्हण कुटूंबाचा मोघल कृपेने "महम्मदी" कसा झाला ?

:G:
:G:

ह्या वर्षीच्या रेल्वे बजेट मध्ये भाजपा सरकार ने येत्या पाच वर्षांत रेल्वे रुळांची लांबी १,३८,००० किमी ईतकी करण्याच ठरवल आहे.

म्हणजे काउ च्या बायकोने त्याला ६५ वर्षे खुजा करुन ठेवला होता त्या काउ ला आता सरकार २०% वाढवणार आहे !!

http://zeenews.india.com/business/budget-2015/rail-budget-2015-overview-...

ह्या वर्षीच्या रेल्वे बजेट मध्ये भाजपा सरकार ने येत्या पाच वर्षांत रेल्वे रुळांची लांबी १,३८,००० किमी ईतकी करण्याच ठरवल आहे..

....

Proud

त्यातलं एक वर्ष झालं ! रूळ वाढले का ?

.....

कोंढा म्हणतो काँग्रेस काळात एकुण ६६ हजार किमि रेल्वे होती.

बातमी म्हणते २० % वाढवुन एक लाख अढतीस हजार किमि करणार ?

६६ हजारचे वीस टक्के वाढुन एक अडतीस कसे होतात ? की दरवर्षी २० % ?

मोदीना जरा नीट विचारुन लिहा .

Pages