Submitted by बाळू पॅराजंपे on 29 March, 2015 - 02:50
भाजपने भारतात बुलेट ट्रेन सुरू व्हावी असं निवडणुकी आधी सूचित केलं होतं. निवडून आल्यानंतरही बोलून दाखवलं होतं. मुंबई अहमदाबाद या मार्गाचं सवेक्षण झालेलं आहे असंही सांगितलं गेलं होतं. रेल्वेमधे काय बदल व्हावेत असा भाजपाचा एक फोरम आहे, यात बुलेट ट्रेनला वाढता पाठिंबा आहे. हे सरकार बुलेट ट्रेन आणू शकेल याबद्दल शंका नाही.
पण भारतात या मार्गावर बुलेट ट्रेन यावी का ?
उत्तर हो असल्यास कारणे अपेक्षित आहेत. नाही असल्यासही कारणे अपेक्षित आहेत.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कसली ओली पार्टी.. मी घेत
कसली ओली पार्टी.. मी घेत नही.. पण उगाच अश्या उलट्यांनी मग असे नाव बदनाम होते.. या गाड्यांवर बदनामीचा दावाच ठोकायला हवे!
ठोक चांगला १० करोडचा ठोक हवे
ठोक चांगला १० करोडचा ठोक हवे तर तुझ्या गफेला पण झाल्या म्हणुन अजुन १० करोडचा ठोक
२० करोड मिळाल्यावर मायबोलीला जोरदार ओली सुकी व्हेज नॉनव्हेज बॅचलर मॅरीड सगळ्या प्रकारच्या पार्ट्या एकसाथ दे
बायदवे ते ऑब्जेक्शन
बायदवे ते ऑब्जेक्शन ओव्हररुलडचा नेमका अर्थ काय, मला कोर्ट सीन मध्ये नेहमी कन्फ्युजन होते, की जज ने कोणाची बाजू घेतलीय आणि कोणाला गपायला सांगितलेय, पुढे त्या वकीलांच्या रिअॅक्शन बघितल्याशिवाय समजतच नाही..
ओव्हररुलड = फेटाळले सस्टेन्ड
ओव्हररुलड = फेटाळले
सस्टेन्ड = मान्य
कबीर, १० करोडचा दावा खूप
कबीर,
१० करोडचा दावा खूप छोटा आहे रे..
आईच्या हातची चहा-चपाती खाऊन घराबाहेर पडलेलो.. सारे उलटले..
आईच्या हातचे जेवण अनमोल असते.. १०-१५ करोड मीच असेच त्यावरून ओवाळून फेकेन..
अप्पाकाका धन्यवाद, लक्षात
अप्पाकाका धन्यवाद, लक्षात ठेवायचा प्रयत्न राहील ! पण अश्या कन्फ्यूजवून टाकणार्या गोष्टींची लिस्ट आहे, काय काय लक्षात ठेवायचे ...
चला आपण कलटी.. बुलेट ट्रेन
चला आपण कलटी.. बुलेट ट्रेन होईल तेव्हा होईल.. आता आपली उलटी प्रूफ लोकल ट्रेन आपली वाट बघतेय..
भारतात यायची तेंव्हा येवो..
भारतात यायची तेंव्हा येवो.. पण मा.बो.वर आधी आली पायजे...आनी म्याच आन्न्नार ती पन.
ही घ्या...
अगदी मार्मिक ट्रेन
अगदी मार्मिक ट्रेन टाकलीय!
जागेवरच झुकझुक झुकझुक करतेय, धूर सोडतेय... पण पुढे मात्र जात नाही
@ पण पुढे मात्र जात नाही>>
@ पण पुढे मात्र जात नाही>> कारण ती मायबोली वर आलेली आहे!
पळाsssss... आता आपली मौत!
(No subject)
सकाळ मधे एक सविस्तर लेख आला
सकाळ मधे एक सविस्तर लेख आला होता. बुलेट ट्रेनपेक्षा स्वस्त विमानसेवा कशी किफायतशीर आणि सुटसुटीत आहे हे मुद्देसूद आणि आवश्यक तिथे आकडेवारीनिशी दाखवून दिलेलं होतं त्यात. जपानमधे आणि फ्रान्स मध्ये बुलेट ट्रेन आहे. चीनने मात्र शक्य असूनही शांघाय विमानतळ ते शहर इतकाच मार्ग बुलेट ट्रेनसाठी राखून ठेवलाय. ४५ किमी. ज्या ज्या देशात बुलेट ट्रेन आहे (जपान फ्रान्स अपवाद) त्या सर्व देशात टेक्नॉलॉजी डेमॉन्स्ट्रेटर म्हणूनच केवळ अल्प अंतरासाठी बुलेट ट्रेन आहे. ३० सीटर विमानं ही स्वस्त आहेत. शिवाय त्यासाठी भूसंपादनाची आवश्यकता नाही. बुलेट ट्रेनच्या कंपनांमुळे जे अपघात होतात त्याची शक्यता नाही. विमानसेवेचे फायदे अनेक आहेत . डॉमेस्टीक एअरपोर्टवर चेकिंग असतं पण त्यात फारसा वेळ जात नाही. भारतात विमानसेवेचं जाळं विस्तारलं तर आपोआपच हे बदल होतील. त्यामुळे वेळ जातो हे कारण उरणार नाही.
बुलेट ट्रेन शाॅर्ट
बुलेट ट्रेन शाॅर्ट डिस्टंससाठी (मुंबई-पुणे, मुंबई-नाशिक इ.) व्हायेबल आहे, लाॅंग डिस्टंससाठी विमान बेस्ट...
कापोचे, तुमच्या मते (व इथल्या
कापोचे, तुमच्या मते (व इथल्या इतरांच्याही मते) बुलेट ट्रेनची व्याख्या काय? हाय स्पीड ट्रेन म्हणजे बुलेट ट्रेन का या चर्चेसाठी?
तसे असेल तुमची चीनबद्दलची माहिती चुकीची आहे. माझ्या अनेक सहकर्मचार्यांकडून मी चीनमधील हायस्पीड रेल्वेबद्दल ऐकले आहे. उदा. बिजींग विमानतळावरून नानजिंग हे अंतर साधारण १०५० आहे. माझा एक सहकर्मचारी विमानतळावर भारतातून उतरून ट्रेन घेऊन ५ तासात नानजिंगमध्ये पोचत असे. जर कनेक्टिंग फ्लाइट घेतली तरी नेहेमीच सोयीची फ्लाइट मिळत नसे.
हेच मी इतर अनेक मार्गांबद्दल ऐकले आहे.
फ्रान्समध्ये मी मुलुज स्थानकावरून ४ तासात पॅरिसला पोचू शकत असे. जर एखादी मिटींग असेल वा मार्केटिंग / सेल्सचे काम असेल ज्यासाठी प्रत्यक्ष उपस्थिती आवश्यक असते तेव्हा अश्या ट्रेन्स फार उपयोगी पडतात. विमानाने प्रत्यक्ष प्रवासाचा वेळ कमी असला तरी विमानतळावर जाणे, सिक्युरिटी, डेस्टिनेशनला पुन्हा विमानतळावरून शहरात जाणे हे सर्व धरले तर बराच अधिक वेळ लागतो. बरेचदा फ्लाइट्स मध्ये दोन लेग असतात ज्याने अधिक वेळ लागतो.
हे पण वाचा
https://en.wikipedia.org/wiki/High-speed_rail_in_China
https://en.wikipedia.org/wiki
https://en.wikipedia.org/wiki/Shinkansen
चीन मध्ये बेजिंग ते शाघाय,
चीन मध्ये बेजिंग ते शाघाय, शांघाय हे नांजिन्ग ३५० किमी वर चालणारी ट्रेन आहे तर शाघाई विमानतळावर जाणारी ४३१ किमी ची मॅगलेव्ह ट्रेन आहे. बेजिंग ते शाघाय हे १३५० किमी चे अंतर ५-६ तासात तर शांघाय हे नांजिन्ग हे आंतर ७० मिनिटात पार केले जाते. बेजिंग ते शाघाय मध्ये दर अर्धा तासाला ट्रेन असते आणि १ ट्रेन मध्ये साधारण १००० माणसे बसतात. २ वर्षापुर्वी साधारण ३००० रु तिकिट होते.
शांघाई विमानतळावर जाणारी ट्रेन ३० किमी ला ९ मिनिटे घेते ( ३ मिनिटे ० पासुन ४३१ किमी पर्यन्त वाढवायला, ४३१ किमी ३ मिनिटे नंतर वेग कमी करायला ३ मिनिटे). हेच अंतर टॅक्सीनी ४५ मिनिटे लागतात (रात्रीच्या वेळी).
साधारणतः १००० -१५०० किमी पर्यन्त ट्रेन व्हायेबल असते आणि त्यानंतर प्लेन सेवा. ५०० किमी ला हायस्पीड ट्रेन सेवा खुपच चांगली कारण २ तासात प्रवास पुर्ण होतो तर विमानाला त्याच गोष्टी साठी ८ तास लागतिल. In general सगळीकडे ट्रेन शहरात आणि विमानतळे शहराबाहेर आहेत. ७ चे विमान असेल तर मुम्बई सिटीमधुन ४ ला निघावे लागेल आणि जर बुलेट ट्रेन असेल तर तेवढ्या वेळात ट्रेन ५०० किमी जाईल. (जर विमानतळ नवी मुम्बईला गेले तर आजुन लवकर निघावे लागेल)
पॅरीस वरुन amsterdam , Nice & frankfurt , तोक्यो ते ओसाका ला हाय स्पीड ट्रेन आहेत हे त्याच कारणासाठी
टण्या, बुलेट ट्रेन याचा अर्थ
टण्या,
बुलेट ट्रेन याचा अर्थ चुंबकीय ढकललहरींवर चालणारी घर्षणबलविरहीत लोहगाडी असा अर्थ मी घेतला आहे. माझ्या माहीतीप्रमाणे हिलाच बुलेट ट्रेन असे नाव दिले गेले आहे. हाय स्पीड ट्रेन कुठली त्याची कल्पना नाही.
http://www.esakal.com/Tiny.aspx?K=y800W
हाय स्पीड ट्रेन म्हणजे ताशी १६० किमी पेक्षा जास्त वेगाने धावणारी नेहमीची रेल्वे असेल तर दहा वर्षांपूर्वी मुंबई अहमदाबाद रेल्वेचा वेग ताशी १६० करण्याबाबत रेल्वेला चाचपणी करायला सांगितली होती. रेल्वेने अभ्यासपथक नेमले होते. त्यांच्या अहवालानुसार सध्याचे रूळ आणि सुरक्षा हे हायस्पीड साठी अनुकूल नसल्याने तो बेत रहीत केला गेला. राजधानी एक्सप्रेस १६० किमी वेगाने जाऊ शकते. आहे ते जाळे सक्षम केलं तर हाय स्पीड ट्रेन्स अस्तित्वात येतील. २०१३ साली पुन्हा एकदा अभ्यासगट नेमला गेला होता, त्याची बातमी.
http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai/-/articleshow/...
९८००० कोटी रूपये मुंबई अहमदाबाद रेल्वेसाठी हा खर्च अवाढव्य आहे. मुंबई दिल्ली साठी तो तीनपट धरा. या खर्चात विमानसेवा किफायतशीर असेल की बुलेट ट्रेन ? मी दक्षिण आफ्रिकेत एअर टॅक्सीचा अनुभव घेतला आहे. जोहान्सबर्ग ते केप टाऊनला अक्षरशः एकामागे एक फ्लाईट्स असतात. आंतरराष्ट्रीय विमानतळावरून स्थानीय विमानतळाकडे आम्ही सगळे कनेक्टींग फ्लाईट पकडण्यासाठी अक्षरशः धावत जात असताना तिथल्या अधिका-याने इतकी घाई करण्याची गरज नाही, लगेच दुसरी फ्लाईट आहे अशी माहीती दिली. इतर शहरांसाठी अर्धा तास थांबावं लागतं. पण हे चालू शकेल आपल्याकडे.
सकाळ मधे विमानसेवा आणि बुलेट ट्रेन यांची तुलना आलेली होती. शांघाय शहरात बुलेट ट्रेन आहे. हा प्रवास ४५ मिनिटांचा आहे. या देशांमधे सर्व थरात विकास झालेला असल्याने अशा योजनांवर पैसा खर्च केल्याने कुणाला काही वाटणार नाही. मुंबई अहमदाबाद रेल्वेची कनेक्तीव्हिटी उत्तम असताना अशी योजना आणणे कितपत योग्य आहे ? एकीकडे बिहार सारख्या राज्याला द्यायला पैसे नाहीत असे केंद्राने नुकतेच कळवलेले असताना ही उधळपट्टी योग्य वाटते का ? ( योजना खरंच किफायतशीर असती तर गोष्ट वेगळी. हिचं व्याजच प्रचंड असनार आहे. शिवाय देखभालीचा खर्च, चालवण्याचा खर्च पाहता विमानसेवेपेक्षा ती स्वस्त असेल का ?)
अमेरीकेत आहे का बुलेट ट्रेन ?
साहिल शहा , अनुमोदन. हेच
साहिल शहा , अनुमोदन.
हेच सांगायचे होते. फ्रान्स आणि जपान सोडले तर इतर देशांमधे बुट्रे कमी अंतरासाठीच आहेत.
@ टण्या
तुमचे मुद्दे इथे आहेत.
http://www.traveller.com.au/planes-v-fast-trains-tortoise-and-the-air-1c6hh
पण आपण दुस-या देशाकडून व्याजाने पैसे उभारून हा प्रकल्प राबवतोय. तसंच या देशांचं रेल्वेजाळे हायस्पीड ट्रेन्ससाठी सक्षम होतंच. आपल्याला ते सर्व शून्यातून करायचं आहे, भूसंपादन, कुंपण हा खर्च यात धरला गेला आहे का याबद्दल माहीती मिळत नाही. तो वेगळा असल्यास खर्च आणखी अवाढव्य होईल. त्यामुळे इतर देशांप्रमाणे ती स्वस्त नसेल असा अंदाज आहे. असो. सकाळमधला लेख उत्तम होता, पण लिंक हटवलेली दिसतेय.
कश्याला पाहिजे बुलेट ट्रेन न
कश्याला पाहिजे बुलेट ट्रेन न हायस्पीड ट्रेन? आधी इतर बैलबंड्या दुरुस्त करा म्हणाव! ८० वर्षात डेक्कन क्वीनचा वेग वाढवता आला नाही ... चालले बुलेट ट्रेन काढायला
७०० अन ८०० किमी कापायला १२ न १५ तास घेते रेल्वे ... ते सुधारवाव आधी.
समजा दर अर्धा तासाला एक ट्रेन
समजा दर अर्धा तासाला एक ट्रेन असेल आणि प्रत्येक ट्रेन मध्ये १००० माणसे आणि १००० रुपये तिकिट असेल. जर १६ तास दोन्ही बाजुनीगाड्या चालल्या तर ८०% occupancy मध्ये दिवसाला ५ कोटी रुपये मिळतिल . त्यातday to day चा खर्च जाउन ५०% उरतिल. ( सध्या ३५० रु तिकिट असुन ८% फायदा आहे). तर २.५ कोटी दिवसाला फायदा आणि ९०० कोटी वर्षाला मिळतिल ते ९८,००० कोटीच्या १% टक्के आहे. सरकारी पातळीवर व्यापार करयाचा असल्यास ५% तरी return on investment मिळायला हवे. (१ वर्षाला ५००० कोटी तरी सुटले पाहिजेत) त्यासाठी एक तर तिकिट् दर ३००० ठेवावा लागेल किंवा गाड्याची संख्या वाढवावी लागेल.
बिहार ला द्यायला पैसे नाहीत म्हणुन बुलेट ट्रेन करायची नाही हे चुकिचे आहे. जपान बिहार ला लोन द्यायला पैसे देणार नाही पण ट्रेन साठी पैसे देतिल. आणि ९८,००० कोटी पैकी बरेच पैसे मजुरी देण्यात जातिल. ट्रेन बनल्यावर सगळ्यात जास्त नोकर्या बिहारच्या माणसानाच मिळातिल त्यामुळे बिहारी लोकाचे राहाणिमान वाढेल.
आपल्याकडे किंवा चायना , जपान फ्रांस मध्ये प्रवास करणारी माणसे जास्त असल्यामुळे आणि प्रवासाचे अंतर ५००- १००० किमी असल्याने हायस्पीड ट्रेन feasible आहे. एअर टॅक्सी किंवा विमान उपयोगाचे नाही.
चुंबकीय ढकललहरींवर चालणारी घर्षणबलविरहीत लोहगाडी ४०० पेक्षा जास्त स्पीड देते जी शांघाई विमानतळावर उपलब्ध आहे. फ्रांस आणि बाकी चायना मध्ये आपल्या सारख्या धावतात त्या २५०- ३५० किमी पर्यन्त जाउ शकतात.
मॅगलेव्ह ट्रेन ला सुरवातिला जास्त पैसे लागतात पण maintenance चा खर्च कमी येतो. बाकीच्या हायस्पीड गाड्याच्या पटरीला maintenance भरपुर आहे.
अमेरिकेत सरासरी अंतर १००० किमी पेक्षा जास्त असल्याने हायस्पीड ट्रेन feasible नाही. फक्त न्युयार्क ते राजधानी हा एकच मार्ग feasible वाटतो.
>> फक्त न्युयार्क ते राजधानी
>> फक्त न्युयार्क ते राजधानी हा एकच मार्ग feasible वाटतो.<<
एलए-वेगस विचारात आहे, पुढे एलए-सॅन फ्रॅंसिस्को सुद्धा विचारात घेतील. अवाढव्य देश आणि मर्यादित लोकसंख्येमुळे मार्केट लिमीटेड आहे...
बिहार ला द्यायला पैसे नाहीत
बिहार ला द्यायला पैसे नाहीत म्हणुन बुलेट ट्रेन करायची नाही हे चुकिचे आहे >>> तुम्हाला समजले नसावे असे वाटते. प्रोजेक्ट किफा. असता तर विरोध नस्संअस म्हटल होतं. जपानने कर्ज दिले तरी ते फेडायचे आहेच ना? आपण मंगोलिया, नेपाळ, भूतान्लA किती पैसे दिलेत हे ही जरा ध्यानात घ्या.
एकाच पट्ट्यात विकासाचे केंद्रीकरण हा कॅज्युअली बघण्याचा विषय नव्हे. जिथे काहीच नाही तिथे विकास झाला तर जीडीपीत भरच पडते. आधीच्या पोष्टीत म्हटल्याप्रमाणे विकास सर्व थरात पोहोचल्याने अशा बाबींवर झालेला खर्च अनाठायी म्हणता येत नाही. याकडे पाहण्याचा चष्मा भिन्न असू शकतो.
वाहतुकीचे नवी तंत्रज्ञान येऊ घातले आहे. ते सुटसुटीत, वेगवान आणि किफा. वाटतेय. काय खर्च व्हायचा तो एकदाच होऊ द्यावा. तोवर लांबच्या अंतरासाठी ह. से. आहेच.
पण मी काय म्हणतो. बुलेट ट्रेन
पण मी काय म्हणतो. बुलेट ट्रेन घेण्यापेक्षा आता येत्या ५ वर्षात नविन तंत्रज्ञान येत आहे निर्वात पोकळी तयार करून त्यातून ट्रेन तरंगत अतिवेगाने पाठवायची यात ताशी वेग १५०० ते ३००० किमी मिळू शकेल. हे तंत्रज्ञान वापरण्यास उत्तम आहे. सरकारने यावर अवश्य विचार करावा.
जयंत याबद्दल उल्लेख केला
जयंत
याबद्दल उल्लेख केला होता.
https://m.facebook.com/story.php?story_fbid=1136275596399437&id=15188947...
नाही कापोचे हे वेगळे आहे. मी
नाही कापोचे हे वेगळे आहे.
मी सांगतोय ती संकल्पना वेगळी आहे. निर्वात पोकळी तयार करून त्यातून गाडी पाठवायची अर्थात हे करणे अत्यंत मुश्किल काम आहे कारण निर्वात पोकळीवर पृथ्वीवरच्या हवेचा महाप्रचंड दबाव असेल. पण स्विझर्लँड मधे जो प्रयोग चालू आहे त्यात निर्वात पोकळी तयार केली होती (अणु एकमेकांवर आदळण्याचा प्रोग्राम) त्यावरून ही संकल्पना शास्त्रज्ञ यांना सुचली आहे. या दिशेने एक प्रयोग सुध्दा यशस्वी झाला आहे ताशी वेग ३००० किमी होता.
कन्सेप्चुअल डिझाइन तयार आहे
कन्सेप्चुअल डिझाइन तयार आहे का?
इथे मुंबई मध्ये गेली किती तरी
इथे मुंबई मध्ये गेली किती तरी वर्ष रोज १०/१५ लोक मरतायत. इथे बघा २००८ मधली एक लिंक. ती पण सांगते कि रोज १० लोक मरतात. मग आपले प्राधान्य कशाला पाहिजे ? हा साधा सरळ प्रश्न आहे.
http://www.ibnlive.com/videos/india/killer-trains-288579.html
Mumbai's death trap: 10 railway commuters die per day
Pages