मन

पाऊस असाही ...

Submitted by पुरंदरे शशांक on 21 July, 2015 - 00:15

पाऊस असाही ...

माझ्या मनात पाऊस
येतो अधून मधून
खुणावित जातो वेडा
जरा डोळे मिचकून

घोंघावत रोरावत
येतो वाभरा बनून
आवरावे कसे याला
कसे घालावे बांधून

रेशमाच्या झालरींनी
करी नाजूक शिंपण
याचे विभ्रम पहाता
जातो आश्चर्य पावून

ऊन-पावसाचे नाते
उलगडे असासून
शब्दरुप गर्द पान
येई वर तरारून .....
----------------------------------------

शब्दखुणा: 

एक वेल नाजुकशी..

Submitted by पुरंदरे शशांक on 5 March, 2015 - 22:23

एक वेल नाजुकशी..

एक वेल नाजुकशी
झुले दारा-उंबर्‍यात
येता झुळुक वार्‍याची
कशी डोलते तालात

वेल झुरते सुकते
सल कळेना कुणास
पान झडुनिया सारे
उरे फांदोर्‍यांच्या सोस

स्पर्श होता अनामिक
वेल थरारे आतून
रस जीवनाचा पुन्हा
वाहे अंगाअंगातून

कोंब इवलेसे उभे
तेज मावेना दिठीत
वेल आंदोळत स्वैर
शुभ्र फुले ओंजळीत

वेल जपूनशी ठेव
उरी सुकत-फुलत
मुग्ध साथ देई मना
येवो थोर झंझावात
------------------------------

शब्दखुणा: 

रे मना....

Submitted by मनी मानसी.... on 24 January, 2015 - 06:20

कधी कधी काहीच सुचेनासं होतं हल्ली.…
भावनांचा कल्लोळ अन
शब्दांची घुसमट असह्य होते...
खोटया संवेदनांच्या लख्ख प्रकाशाने
होरपळणाऱ्या मनाला संवेदनाहीन अंधाराची ओढ लागते....
मग वाटतं बंद करून टाकावीत मनाची दारं,
अगदी कायमचीच...
श्वासही थांबवावा...
कोंडलेल्या भावना आणि गुदमरलेले शब्द
मोकळे तरी होतील...
कायमचे. ....
मग अगदी सोपं होईल
रित्या मनाची तिरडी बांधणं....
अगदीच सोपं.....

-- मानसी.

मन

Submitted by मी कल्याणी on 21 February, 2014 - 22:37

मन घुंघुर घुंघुर
लडिवाळ त्याचा नाद|
सवे दारी-अंगणात
पारिजात पारिजात|

मन खळखळ लाट
मन शंखले-शिंपले|
ओंजळीत साठवले
नभ सूर्य चंद्र तारे|

मन मोगर्‍याचे फूल
मन कस्तुरी दरवळ|
पहाटेच्या नीरवात
मन काकड्याचा स्वर|

मन माथी मोरपीस
मन सुरेल बासरी|
उभ्या 'सावळ्या'च्या संगे
मन चैतन्याच्या सरी|

मन समईची वात
त्यात 'मी'पण जळावे|
मन सोने उजळता
मन 'सावळे'ची व्हावे|

लय जुळता सख्याची
मन होई निराकार|
मागे उरे माझे मन
त्यात 'सावळा' साकार||

गंध दरवळला मनी

Submitted by गंधा on 26 May, 2013 - 05:56

आज दुपारी घरची आठवण आली आणि माझे डोळे पाणावले. आणि काय योगायोग तेवढ्यात मोबायिल वाजला म्हणून पाहू लागले तर गंधालीचा मिस-कौल आला होता. हे पाहून मला खूप बर वाटले होते. गांधली माझी जीवा-भावाचीच म्हणा ना तशी मैत्रिण.फार वर्षाची नव्हे तर सहा महिन्यांच्या कालावधीत अतूट मैत्री ठेऊन जपणारी अशी.

शब्दखुणा: 

मन करतयं शिमगा अजून

Submitted by मंदार खरे on 27 March, 2013 - 00:08

वाळलेली झावळी
गवताची पेंढी
मोडका पाट
तुटलेली बॅट
जुना पुठठ्याचा बॉक्स
फाटलेला सॉक्स
जमलं तर मागून
नाही तर चोरुन

मग आगीचा लोळ
होळीचं रिंगण गोल
छोटयाश्या टेपवर संगीत
हलवाईची भांग रंगीत
कुणाच्याही नावाने बोंबा
मोठयांचाही मग पाठींबा
श्रीफळ भाजलेले खाऊन
अख्खी रात्र जागून

आग कधीच शमलेली
चाळ सुद्धा पडलेली

धूर मात्र येतोय अजून
मन करतयं शिमगा अजून

शब्दखुणा: 

मनाचा नादच खुळा....."©मंदार खरे"!!!

Submitted by मंदार खरे on 30 January, 2013 - 04:20

मनं पुढं पुढं जातं
नाही दावणीला येतं
अश्‍व वेगानं पळ्तं
वारा काना गेल्यागतं

मन विक्षिप्त ते किती
खेटरापाशी प्रेम करी
डोळ्या देखल जिव देण्यार्‍याच्या
प्रिती नाही याच्यी उरी

मन किती ते अस्थिर
आभाळातल्या पतंगा परी
गटांगळ्या वरती खालती
हेलकावत जाई दूरी

मन खोल नि अथांग
नाही रुंदी यास पोत
कळला म्हणता म्हणता
नवखा अजूनच होतं

मना नाही या उतारा
विषारी सर्प तो बरा
मन वाटे सरड्यासम
रंग बदले भरा भरा

शब्दखुणा: 

निष्पाप मन

Submitted by तुषारमय on 19 January, 2013 - 10:04

गोष्ट एका वेन्धल्याची
स्वतःच्या अस्तित्वाची
दमलेल्या स्वप्नांची
गुरफटलेल्या नात्यांची
आणी अजाण वाटेवर चालणाऱ्या
माझ्या त्या निष्पाप मनाची

काळजावर पाय ठेवून
तरी मी चालतच होतो
अनुत्तरीत प्रश्नांची
उत्तरे मी शोधत होतो
आणी समजूत मी काढत होतो
माझ्या त्या निष्पाप मनाची

वाटेत त्या मला भेटले ते अनेक
रखडत रखडत चालत होता तो प्रत्येक
झुंज होती त्याची त्या दिवसाची
अपेक्षा होती ती उद्याच्या आनंदाची
अशीच एक आशा होती
माझ्या पण त्या निष्पाप मनाची

चालताना त्या वाटेत आला होता वीट
नकोसा वाटला असेल आयुष्याला त्या मी
हरता हरता पुरता हरलो होतो मी

शब्दखुणा: 

नकाशा

Submitted by स्वातीपित्रे on 29 November, 2012 - 00:24

विचारांचे चक्र आणि चक्राकार विचार कधीकधी डोके भंडावून सोडतात. हे सर्व का कशासाठी? कोणासाठी? कधीपर्यंत? चिचार आणि भाषा खरे तर आपणच तयार केलेली, आपल्याला आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींचा अर्थ समजून घेता यावा आणि त्याप्रमाणे आपल्याला क्रिया करता यावी, आपले निर्णय घेता यावेत, सर्वांशी संवाद साधता यावा आणि तोही दर्जेदार, म्हणून. पण कधीकधी आजूबाजूला इतके काही घडत असतं- गोष्टी, बातम्या , शब्द ह्यांचा भडीमार होत असतो को त्यातले अचूकपणे काय घ्यावे आणि काय सोडावे समजत नाही.

विषय: 
शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - मन