मनाचा सुमार
चालला बाजार
नच अंतपार
याला दत्ता ॥
हवेपणाला या
अंतर पडेना
स्वप्नांची सरेना
मोजदाद ॥
एक मिळताच
चिकटे दुजाला
मोहाच्या झाडाला
लाख फुले ॥
का रे तडफड
व्यर्थ धडपड
जरी डोईजड
उतरेना ॥
मोहात धावते
पापाला बुजते
अडते रडते
रात्रंदिन ॥
विक्रांत मनाला
वाहितो तुजला
स्वीकारा दयाळा
दत्तात्रेया॥
डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in
००००
फुलपाखरु..
एक होते रंगेबेरंगी
फुलपाखरु..
त्याचे 'मन'
ऐसे नाव..
ईवलेसे नाजुक
पंख तयाचे
त्यावर सुंदर नक्षी
संस्कारांची.
फुलपाखराच्या
पंखावरचे काही रंग
लाल-गुलाबी
स्वप्नांचे
बालपणीच्या आठवणींचे
उमलणार्या फुलांचे
चांदण्या रातींचे
तर
काही रंग आहेत.,मात्र
निळे-काळे
नको त्या
कटु आठवणींचे
भळभळत्या जखमांचे
चुलीतल्या विस्तवाचे..
विकांताला गाडीतून असेच फिरून येत होतो. कोपरखैरणेला पेट्रोल भरायला थांबलो. हमरस्त्याच्या जवळच असलेल्या पंपावर फारच थोड्या जागेत सगळा कारभार होता. आधीच्या सिग्नलला एका रिक्षावाल्याने टायरमध्ये हवा कमी आहे सांगितले म्हणून पंपावर हवा भरायचे ठरवले तर थोडी लाईन होती. थोडीच जागा असल्याने माझ्या गाडीने पंपावर पेट्रोल भरत असलेल्या गाडीचा रस्ता अडवला होता. त्याचे पेट्रोल भरून झाल्यावर हॉर्न वाजवून मला इशारा दिला. सुदैवाने मागे थोडी जागा असल्याने मी गाडी मागे घेतली. मोकळ्या झालेल्या जागेतून जाताना त्या ड्राईवरने हात दाखवला. मैत्रिणींबरोबर बोलण्यात गुंग असलेल्या मला का कोण जाणे त्याचे ते वागणे खटकले.
अश्रू
नयनात सांजवेळी,
दाटून आले पाणी
सांगू कशी कळेना,
ती मागची कहाणी
ना झाली विस्मृत ,
ती जगलेली गाणी
खोल दाटली स्मरणात,
ती ओथंबलेली वाणी
क्षणार्धात पालटले जग,
भरले ते आसवांनी
वाऱ्यासवे सुखसंवेदना,
गेल्या आहेत विरूनी
नुसतीच राहीली इथे,
एक तुझी आठवण स्मरणी
नवीन जग तूझेच,
ते वसलेले पाहूनी
विरक्त झाले या प्रेमात,
अशी तिलांजली वाहूनी
काही आशा ना उरली आता,
या भंगलेल्या मनी
सूकले हे फूल,
न देत वास
जरि भिजले अश्रूंनी
.....प्रांजली
वेदना
न सांगाता येतं,
ते होते दु:ख
अन् जे भडभडत,
चरफडत
ओकलं जातं,
तो असतो राग.
न संपते
ती असतेच निराशा
अन् जिला
म्हणतात
आशा,
तो असतो
जीवनाचा भाग.
देहाला जाणवतो
तो असतो स्पर्श
अन् स्पर्शात
आकळत जाते,
ती असते
भावना
मनाला भिडतात,
ते असतात शब्द
अन् जे
शब्दात सांगता येत नाही
ती असते वेदना
.....प्रांजली
विचार
मन आपलं कधीच पूर्ण शांत नसतं,
कोणत्या ना कोणत्या विचारांचं
काहूर माजतं असतं.
स्वप्नाळू दुनिया रंगीन मोठी असते,
विचारांच्या वादळाला मात्र
कधी तीही अपवाद नसते.
शून्य मनात...
मन शून्यत्वाचा विचारच करते,
विचारांच्या गतीला तर
इथेही काही स्थिरता नसते.
भावना-विवशता मोठी चमत्कारीक असते,
विचारांच्या वाक्यांना इथे
शब्दांचीच काही जोड नसते.
मन माझे हळवेसे गीत आहे,
आनंदाचे सुरेल संगीत आहे,
हळुवार भावनांची नाजुकशी प्रीत आहे,
जीवन जगण्याची सुंदरशी रीत आहे,
स्वप्नांच्या झऱ्याचा निरंतर सा स्रोत आहे,
मन माझे हळवेसे गीत आहे...
मन माझे कोकिळेची तान आहे,
सुरांचे संमिश्र मधुरसे गान आहे,
बेधुंद वाऱ्याचा वेग बेभान आहे,
जपून ठेवावे असे पिंपळाचे पान आहे,
मन माझे हळवेसे गीत आहे...
माधवी समीर जोशी, ठाणे
काही दिवसांपूर्वी टीव्हीवर माझे अतिशय आवडते गाणं मन मंदिरा लागले.खरंच आपले मन एखाद्या मंदिरा सारखं असते. आपण मंदिरात कशी देवांची नित्य पूजा अर्चना करतो तसेंच रोज मनात सकारात्मक विचार रुजवावें लागतात. सणासुदीला जशी मंदिराची कानाकोपऱ्यात साफसफाई होते तशीच मनातील नकारात्मक विचारांची कोळीष्टके दूर करावी लागतात.
मन थाऱ्यावर , जग जाग्यावर
मन कसकसलं,जग विस्कटले
मन उभारलं,जग विस्तारले
मन विहरलं, जग बहरलं
अनिल अवचट ह्याच्या ह्या ओळी मनाविषयी सगळे सांगून जातात.हल्ली सगळेच जण मानसिक तणावाखाली वावरताना दिसतात.
सदाबहार श्रावण
वाट हिरवी सावळी
चाले डौलात श्रावण
धारा लेऊन रेशमी
न्हातो उन्हात साजण
जाई जुई शुभ्र कळ्या
वेली घेती अंगभर
नाजुकसा पारिजात
सडा शिंपितो केशर
धारा रेशमी गळ्यात
सखा गुंफतो श्रावण
मनामनात फुलवी
इंद्रधनुचे तोरण
पालवल्या दशदिशा
थेंब झुलती पानात
दूर शीळ पाखराची
घुमे ओलेत्या रानात
सदाबहार श्रावण
येवो न ये अंगणात
हिरवाई सतेजशी
जपू सदैव मनात...
मन, पाऊस....
काळे काळे ढग येता
जाते सारे अंधारून
मन बसे कोपर्यात
बावरून सुनसान
येती थेंब टपटप
एक साखळी धरून
लय भिनता पुरती
चिंबतान होते मन
भिने गारवा मनात
पुन्हा पुन्हा थरारुन
मूकपणे गाळी आसू
जाते थिजून थिजून
काळी रात्र सरे जेव्हा
येई पुन्हा उजाडून
ऊन्ह रेशमी बिलगे
मन जाई आसावून
कोंब इवले नाजूक
ऊन्ह झेलती मस्तीत
कंच हिरव्या ओठांत
दहिवर चमकत....