Submitted by पुरंदरे शशांक on 20 August, 2018 - 00:41
सदाबहार श्रावण
वाट हिरवी सावळी
चाले डौलात श्रावण
धारा लेऊन रेशमी
न्हातो उन्हात साजण
जाई जुई शुभ्र कळ्या
वेली घेती अंगभर
नाजुकसा पारिजात
सडा शिंपितो केशर
धारा रेशमी गळ्यात
सखा गुंफतो श्रावण
मनामनात फुलवी
इंद्रधनुचे तोरण
पालवल्या दशदिशा
थेंब झुलती पानात
दूर शीळ पाखराची
घुमे ओलेत्या रानात
सदाबहार श्रावण
येवो न ये अंगणात
हिरवाई सतेजशी
जपू सदैव मनात...
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वाह!
वाह!
सदाबहार श्रावण
येवो न ये अंगणात
हिरवाई सतेजशी
जपू सदैव मनात... हे तर भारीच.
व्यनि केलाय. कृपया चेक करा.
व्यनि केलाय. कृपया चेक करा.
छान आहे कविता.
छान आहे कविता.
सुरेख!
सुरेख!
सुन्द र च
सुन्द र च
श्रावणासारखीच सदाबहार कविता
श्रावणासारखीच सदाबहार कविता काका!
पालवल्या दशदिशा
थेंब झुलती पानात
दूर शीळ पाखराची
घुमे ओलेत्या रानात>>>>>खूप आवडलं!
सुंदर !
सुंदर !
मस्त झाली आहे
मस्त झाली आहे
सुंदर...
सुंदर...
सुंदर !
सुंदर !
छान हिरवी गार कविता..
छान हिरवी गार कविता..