स्वत:पासून दू ऽऽ र पळून जाण्याचा
फसावा दुबळा प्रयत्न
अन् अडकून पडावे आयुष्यभर
घाटमाथा; आडवळणी दऱ्याखोऱ्यात
तसा तुझा सर्वव्यापी वावर
सरंजामशाही तोऱ्यात
औसे-पुनवेला येतो तुझ्या भेटीला
हिंदकळत... डुचमळत...
अनवट वळणे; खाचखळगे तुडवत
म्हणशील तर हवापालट
चेंज ऑफ टेस्ट
पूर्वजन्माची कार्मिक लेणदेण,
नसते कशाचीच खात्री -
पण पडलेच पदरात पुण्यबिण्य
तर नॉट अ बॅड बार्गेन..!
कधी कधी काहीच सुचेनासं होतं हल्ली.…
भावनांचा कल्लोळ अन
शब्दांची घुसमट असह्य होते...
खोटया संवेदनांच्या लख्ख प्रकाशाने
होरपळणाऱ्या मनाला संवेदनाहीन अंधाराची ओढ लागते....
मग वाटतं बंद करून टाकावीत मनाची दारं,
अगदी कायमचीच...
श्वासही थांबवावा...
कोंडलेल्या भावना आणि गुदमरलेले शब्द
मोकळे तरी होतील...
कायमचे. ....
मग अगदी सोपं होईल
रित्या मनाची तिरडी बांधणं....
अगदीच सोपं.....
-- मानसी.
वेदना समजण्याची क्षमता, हा मी समज करून घेतलेला अर्थ, शब्दार्थ जाणकारांनी दुरुस्ती करावी त्यांचे स्वागत. मी किती संवेदनक्षम ( सेन्सिटीव्ह ) आहे हे आहार, विचार, संस्कार आणि परिस्थितीशी संबंधित आहे. ह्याची जाणीव मला निद्रानाशाच्या आजारातून झाली - नशीब माझे भाग १. ह्याचे शास्त्रीय कारण रक्ताचा दर्जा बदल व शरीरातील आम्लाचे प्रमाण असावे. मी कोणत्या / किती विषयांशी संवेदनक्षम असावे ह्याची प्राथमिकता बाल वयात माझे पालक ठरवतात, मग शिक्षकवर्ग त्यांच्या कुवती नुसार त्यात भर घालतात, नंतर सामाजिक परिस्थिती त्यात चढ उतार घडवते.