एक वेल नाजुकशी..
एक वेल नाजुकशी..
एक वेल नाजुकशी
झुले दारा-उंबर्यात
येता झुळुक वार्याची
कशी डोलते तालात
वेल झुरते सुकते
सल कळेना कुणास
पान झडुनिया सारे
उरे फांदोर्यांच्या सोस
स्पर्श होता अनामिक
वेल थरारे आतून
रस जीवनाचा पुन्हा
वाहे अंगाअंगातून
कोंब इवलेसे उभे
तेज मावेना दिठीत
वेल आंदोळत स्वैर
शुभ्र फुले ओंजळीत
वेल जपूनशी ठेव
उरी सुकत-फुलत
मुग्ध साथ देई मना
येवो थोर झंझावात
------------------------------