गोष्ट एका वेन्धल्याची
स्वतःच्या अस्तित्वाची
दमलेल्या स्वप्नांची
गुरफटलेल्या नात्यांची
आणी अजाण वाटेवर चालणाऱ्या
माझ्या त्या निष्पाप मनाची
काळजावर पाय ठेवून
तरी मी चालतच होतो
अनुत्तरीत प्रश्नांची
उत्तरे मी शोधत होतो
आणी समजूत मी काढत होतो
माझ्या त्या निष्पाप मनाची
वाटेत त्या मला भेटले ते अनेक
रखडत रखडत चालत होता तो प्रत्येक
झुंज होती त्याची त्या दिवसाची
अपेक्षा होती ती उद्याच्या आनंदाची
अशीच एक आशा होती
माझ्या पण त्या निष्पाप मनाची
चालताना त्या वाटेत आला होता वीट
नकोसा वाटला असेल आयुष्याला त्या मी
हरता हरता पुरता हरलो होतो मी
जीवनाच्या तालमीत स्वतःच
चीत पडलो होतो मी
अजून एकदा उठण्याची
पुन्हा ह्या जगात जगण्याची
कला विसरलो कि काय
अशी स्थिती होती
माझ्या त्या निष्पाप मनाची
पण हळूच पाहिले शेजारी
तर चालत होता तो अनवाणी
पायात माझ्या होते वाहन
तरी ठरलो मी त्याहून अडाणी
जागली परत एक किरण उमेदीची
अजून काहीतरी गाठण्याची
स्वतःला परत सिद्ध करण्याची
उद्याचा दिवस हा माझा असेन
अशी निरागस इच्छा होती
माझ्या त्या निष्पाप मनाची