साहित्य
जपान, जपानी आणि मी !....भाग २
http://www.maayboli.com/node/55981
'ध' चा 'मा' होवुन पुर्वी एक खून पुण्यात पडला होता. इथे अमेरिकेत 'र' चा 'ल' आणि 'ल' चा 'र' करीत इंग्रजी भाषेचे रोज खून पाडले जायचे. '' आय वान्त तू बीसीत रंडन अँड लोम''....हे नेहमीच.
एकीकडे जपानी लोकांची इंग्रजीशी अशी हाणामारी चालली होती तिथे मी सुद्धा आपल्या परीने जपानी भाषेची मन लावून ऐसी की तैसी करत होते.
'अहो' या शब्दाचा जपानी अर्थ होतो मूर्ख, बावळट, ईडियट असा. एकदा भर पंक्तीत मी नवर्याला अहो, अहो... अशा दणादण हाका मारल्या त्या ऐकून समस्त जपानी मंडळींची भीतीने बोबडी वळली होती. या बाईला अचानक वेडाचा झटका आला की काय म्हणून पार हबकुन गेले बिचारे....
माधुरीआज्जी.....
विषय क्रमांक २ - बाई मागच्या बाई : रुक्मिणीबाई
विषय-२ : बाई मागच्या बाई—रुक्मिणीबाई
‘कामावरून येताना दोन किलो ज्वारी नक्की आणा, विसरू नका. उद्या बाबा येणार आहेत ना. ते येतील तेव्हा पीठ तयार पाहिजे.’ हा डायलॉग मारणारी व्यक्ती म्हणजे आमच्या घराच्या कणा असलेल्या रुक्मिणीबाई!
ठराविक उपमा व ठोकळेबाजपणा विरूद्ध चळवळ: भूमिका
पावसाळा आला आहे. आता कोणत्याही क्षणी भारतात मॉन्सून, व सर्वत्र पावसाच्या कविता सुरू होतील. आम्हाला पावसाबद्दलच्या कवितांचा काही प्रॉब्लेम नाही. मात्र त्याला दिल्या जाणार्या त्याच त्याच उपमांना घाबरून आम्ही वैचारिक छत्री मे महिन्यापासून उघडून बसलो आहो. हा प्रॉब्लेम पावसापुरता मर्यादित नाही. उपमांपासून भले भले सुटलेले नाहीत. "प्रेमाला उपमा नाही, हे देवाघरचे लेणे". असे कोणीतरी गाण्यात म्ह्णताना उपमा नाही करत करत पुलंच्या रावसाहेबांच्या शिवीप्रमाणे पुढच्याच ओळीत एक निसटली आहे हे त्यांच्याही लक्षात आलेले नसावे. तसेच उपमांप्रमाणेच ठोकळेबाज वाक्ये व घटनांचाही सध्या कथांमधे प्रादुर्भाव झाला आहे.
ज्याचं त्याचं लिटफ़ेस्ट
जयपूर लिटफ़ेस्ट, दिवस पहिला, दुपार.
गोंधळलेला चेहरा घेऊन आपण डिग्गी पॅलेसचा स्नॉबिश पसारा पहात उभे असतो. दरबार हॉल, मुगल टेन्ट, फ़्रन्ट-लॉन, बैठक, चारबाग, संवाद अशी भारदस्त कार्यक्रम स्थळं. पंचतारांकित हॉटेलच्या लॉबीत शोभेलशा कलावस्तूंचे, इंटरनॅशनल क्विझिनचे स्टॉल्स. देशी-विदेशी, बहुतेक प्रसिद्ध पण आपल्याकरता अनोळखी चेहरे, त्यांचे स्टायलिश ट्रेन्च कोट, रेशमी शाली, फ़ॅशनेबल स्टोल्स, वेल-हिल्ड गरम बूट. साहित्यिक इतके ग्लॅमरस दिसतात?
कादंबरी लेखन- तंत्र, मंत्र.
" मी "
वर्तमानाला पडलेलं सुखद स्वप्नं
की, भविष्य काळाची काळजी.
जगाला पडलेला प्रश्न
कि, सहज सोपं उत्तर.
जगण्यातला तोच रटाळपणा
कि, वेगळेपणाचा घाट.
जगताना पडलेले अनेक प्रश्न
कि, उत्तर न शोधता घालवलेलं आयुष्य.
कला, साहित्य, संस्क्रती, अध्यात्माचा पाठपुरावा
कि, वासनेच्या भरात, परकीय संस्क्रतीत वाहत जाणारा भ्रष्ट समाज.
मी प्रतिक कोणाचं
आणि आदर्श कोणासाठी ?
मी पडलेला एक प्रश्न
कि, सहज सोपं उत्तर.
सुप्रसिद्ध पशु-पक्षी
लहानपणी आपल्याला सगळ्यात पहिले भेटतात ते काऊ, चिऊ, माऊ आणि भुभु. मग विठुविठु पोपट येतो. 'साळुंकी साळकी, तुझी माझी पालखी' करत साळुंकी येते. रामाच्या देवळाला पाच फेर्या मारणारी घार भेटते. ससा, कासव भेटतात ...... हळूहळू हे संग्रहालय वाढायला लागतं.
पण या कोणाला अजून खास नावं आलेली नसतात. टिप्या, मोती अशी जेनेरिक नावं असली तरी त्यांना खास व्यक्तिमत्त्व आलेलं नसतं.
पण मग पुढच्या आयुष्यात एकसेएक सुप्रसिद्ध प्राणी-पक्षी भेटू लागतात. त्यांचं खास वैशिष्ट्य असतं, त्यांना व्यक्तिमत्व असतं आणि/किंवा त्यांनी एखादी लक्षात राहणारी भुमिका तरी बजावलेली असते.