लेख विभाग
' व्यक्तीचित्रण ' या प्रकारातील लेख कोणत्या विभागात लिहीता येईल ?
' व्यक्तीचित्रण ' या प्रकारातील लेख कोणत्या विभागात लिहीता येईल ?
विषय-२ : बाई मागच्या बाई—रुक्मिणीबाई
‘कामावरून येताना दोन किलो ज्वारी नक्की आणा, विसरू नका. उद्या बाबा येणार आहेत ना. ते येतील तेव्हा पीठ तयार पाहिजे.’ हा डायलॉग मारणारी व्यक्ती म्हणजे आमच्या घराच्या कणा असलेल्या रुक्मिणीबाई!
'कॅप्टन' ह्या व्यक्तिविशेषणाशी ओळख २००३-०४ च्या दरम्यान कधीतरी झाली. ते ही विश्वेशची त्यांच्या गृपमधे एन्ट्री झाली म्हणून.
गृप म्हणजे ट्रेकींगचा गृप. "चलाहो नवरे, मजा येते" ह्या वाक्याच्या जोरावर आधी विश्वेशची गृपमधे वर्णी लागली. तेव्हा आम्ही नुसते फोटोतच ट्रेकवारी करायचो. सानिका लहान होती. ती ५ वर्षाची झाल्यावर मग परत एकदा तेच वाक्य "चलाहो नवरे, जमेल" आलं. ह्यावेळी ते माझ्यासाठी होतं म्हणून त्या वाक्याचं बोट धरुन आमचही शेपूट त्या गृपमधे जोडलं गेलं आणि मग खऱ्या अर्थाने कॅप्टनची ओळख व्हायला सुरूवात झाली.
साधारण साडेपाच फूट उंचं, पाचवारी साडी, पदर डोक्यावरुन घेऊन पुढे ओढून घेतलेला, वय.. जाऊदे ना तसही ते सगळं मला कळलं नंतर जेव्हा प्रत्यक्ष समोर उभ्या ठाकल्या. आधी ऐकू आला तो स्पेशली ट्रेनमधे विक्री करणाऱ्या प्रत्येकाने कमावलेला असतो तोच खास आवाज.
"दिलवाले दुल्हनीया ले जायेंगेऽऽऽ, दिलवाले दुल्हऽऽनीया ले जायेंगे.." असं चिरफाड करत दोन तीन वेळा आळवत मग पुढच्या लाईनमधे "आऽऽप भी सोनाऽऽ लेऽऽ जाओऽऽ" असं समेवर येणं. हे आधी आलं ऐकू मला.
" आईला आठवडयापुर्वीचा टाइम्स ऑफ़ इंडिया हवा आहे " एका भिजलेल्या सशीणीचा आवाज.
" दोन मिनिट थांब , देतो काढून " खणखणीत स्वरातील आवाज
" हं! , हा घे पेपर , नीट व्यवस्थित घेऊन जा, एक लक्षात ठेव पेपरची घड़ी मोड़ायची नाही , त्यावर काही लिहायचं नाही , डाग पाडायचे नाहीत आणि मुख्य म्हणजे काम झाल्यावर लग्गेच पेपर परत करायचा . काय समजलं का ? "
यावर भिजलेली सशीण ( पक्षी :: अस्मादिक ) काय बोलणार ! तिला तर कधी एकदा पेपर हातात पडतोय आणि पळून जातेय अस झालेलं. निवृत्त सैन्याधिकारी श्री दिनकर राव उर्फ़ राव आजोबा यांच्याशी झालेला हा अस्मादिकांचा पहिला आणि शेवटचा संवाद (?)
“मी जेव्हा कधी मरेन ना, तेव्हा प्लीज जॅमी आल्याशिवाय मला आग लावू नकोस” रात्री अडीच वाजता डोळ्यांत पाणी आणून मी नवर्याला झोपेतून उठवून सांगितलं. नवरा कंप्लीट गोंधळात. त्याला संदर्भच समजत नव्हता. जॅमी नुसता खदाखदा हसत होता. “पण तुला आगच लावायची असेल तर आताच लावून टाकू” या त्याच्या वाक्याने नवरा ताडकन जागा झाला. जॅमीची नईनवेली बायको मात्र “हे चाललंय काय?” मोडमध्ये होती. तसंही जॅमीशी लग्न झाल्यापासून ती कायम याच मोडमध्ये आहे आणि राहील. कारण, जॅमी ही व्यक्तीच तशी आहे.