लेखनस्पर्धा २०१४

विषय क्र. २ - विठोबाकाका

Submitted by महेश on 6 July, 2014 - 14:04

महेश NEWS शब्द कसा तयार झाला ? सांग. आता पाचवीपासुन तुम्हाला इंग्रजी विषय चालू झाला आहे ना मग सांग पाहू. आता नुकताच ABCD शिकून जेमतेम एक वर्ष झालेल्या मला हे कळणे शक्यच नव्हते, आणि तेव्हा गुगल सोडाच पण कॉम्प्युटर, सेलफोन तर नाहीच पण साधा लॅन्डलाईनचा फोन पण नव्हता, म्हणजे फोन ओ फ्रेन्ड ऑप्शन पण नाही अजिबात. ज्यांनी प्रश्न विचारला त्यांनाच साकडे घालायचे आम्ही, मग आमचे विठोबा काका अगदी खुशीत येऊन सांगणार अरे सोपे आहे North, East, West, South मधले सुरूवातीचे अक्षर घ्यायचे की झाला NEWS, बातम्या कशा चोहो बाजुंनी येत असतात. हे असे सांगितले की आम्ही खुश.

विषय: 

विषय क्र. २ - ’लक्ष्मी देणार्‍या मावशी"

Submitted by कविन on 4 July, 2014 - 04:22

साधारण साडेपाच फूट उंचं, पाचवारी साडी, पदर डोक्यावरुन घेऊन पुढे ओढून घेतलेला, वय.. जाऊदे ना तसही ते सगळं मला कळलं नंतर जेव्हा प्रत्यक्ष समोर उभ्या ठाकल्या. आधी ऐकू आला तो स्पेशली ट्रेनमधे विक्री करणाऱ्या प्रत्येकाने कमावलेला असतो तोच खास आवाज.

"दिलवाले दुल्हनीया ले जायेंगेऽऽऽ, दिलवाले दुल्हऽऽनीया ले जायेंगे.." असं चिरफाड करत दोन तीन वेळा आळवत मग पुढच्या लाईनमधे "आऽऽप भी सोनाऽऽ लेऽऽ जाओऽऽ" असं समेवर येणं. हे आधी आलं ऐकू मला.

विषय क्र. २ आंखो मे क्या!

Submitted by नंदिनी on 3 July, 2014 - 10:30

गर्दीमधल्या चेहर्‍यांची एक गंमत असते. हे चेहरे स्वत:शी फार प्रामाणिक असतात. “चार लोकांमध्ये” असूनदेखील कसलाही अभिनय करत नसतात. सच्चे असतात. मला म्हणूनच गर्दीमधल्या अशा चेहर्‍यांकडे बघत फिरायला फार आवडतं. प्रवासामध्ये किंवा इतरत्र कुठेही लोकांचे चेहरे निरखायचा, त्या चेहर्‍यामागे नक्की कसला विचार चालू असेल ते बघायचा मला एक आगळाच छंद आहे. ही व्यक्ती मला जशी दिसली तशीच प्रत्यक्षातही असेल असं नाही, किंबहुना, या व्यक्तींकडे बघताना माझा जो काही चष्मा होता त्यातूनच मी पाहिलं असणार.

विषय क्रमांक २ : माझा पहिला मित्र

Submitted by अमेय२८०८०७ on 3 July, 2014 - 06:06

गाण्याची दोन पुस्तके उघडी आहेत, पेटी अर्धी मांडीवर अर्धी जमिनीवर आहे, आजोबांचं गाणं अगदी रंगात आलंय आणि पेटीच्या उंचीची (!) आम्ही दोन तीन नातवंडं पेटीसमोर हलणार्‍या भात्याची गंमत जमिनीला नाक लावून बघत बसलोय..... आजोबांच्या अगदी पहिल्या आठवणींचे हे दृश्य-चित्र आहे. काही वेळाने कोणातरी नातवंडाला त्या पेटीच्या समोरील छिद्रात बोट घालून बघायची हुक्की यायची आणि सुरांनी साथ सोडल्यामुळे त्यांचं गाणं ब्रेक लागल्यासारखं थांबायचं. अर्थात नातवंडांवर रागवायचं वगैरे असतं हे त्यांना माहितच नव्हतं. फारफारतर .."अगं ह्या सगळ्यांना एकदम कुणी आत सोडलंय?

विषय क्र. १:- मोदी जिंकले ! पुढे काय ?

Submitted by उदयन.. on 3 July, 2014 - 04:26

मोदी जिंकले... आता पुढे काय? असा प्रश्न कोणी मला सहज जरी विचारला तर माझे उत्तर "जय हरी विठ्ठल करत बसा" हेच असेल. मोदींचा अडवाणी न होता पहिल्या झटक्यात पंतप्रधानपदाची खुर्ची मिळाली यातच नशीब, कष्ट, योग्य दिशा वगैरे वगैरे सगळी विशेषणे लागलेली आहेत. मोदींना सत्तेवर आणण्यात जितका वाटा भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांचा होता त्यापेक्षा जास्तच वाटा काँग्रेसचा होता हे स्वतः मोदी देखील मान्य करतील. जशी २००९ साली भाजपाने मनमोहनजींविरुद्ध मोहीम उघडून स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतलेला तशीच मोहीम काँग्रेसने मोदींच्या विरोधात उघडून कुर्‍हाडीवर पाय मारून घेतला.

विषय: 

विषय क्रमांक २ - 'राव आजोबा '

Submitted by जाई. on 29 June, 2014 - 18:00

" आईला आठवडयापुर्वीचा टाइम्स ऑफ़ इंडिया हवा आहे " एका भिजलेल्या सशीणीचा आवाज.

" दोन मिनिट थांब , देतो काढून " खणखणीत स्वरातील आवाज

" हं! , हा घे पेपर , नीट व्यवस्थित घेऊन जा, एक लक्षात ठेव पेपरची घड़ी मोड़ायची नाही , त्यावर काही लिहायचं नाही , डाग पाडायचे नाहीत आणि मुख्य म्हणजे काम झाल्यावर लग्गेच पेपर परत करायचा . काय समजलं का ? "

यावर भिजलेली सशीण ( पक्षी :: अस्मादिक ) काय बोलणार ! तिला तर कधी एकदा पेपर हातात पडतोय आणि पळून जातेय अस झालेलं. निवृत्त सैन्याधिकारी श्री दिनकर राव उर्फ़ राव आजोबा यांच्याशी झालेला हा अस्मादिकांचा पहिला आणि शेवटचा संवाद (?)

विषय क्र. २ जॅमी

Submitted by नंदिनी on 25 June, 2014 - 22:34

“मी जेव्हा कधी मरेन ना, तेव्हा प्लीज जॅमी आल्याशिवाय मला आग लावू नकोस” रात्री अडीच वाजता डोळ्यांत पाणी आणून मी नवर्‍याला झोपेतून उठवून सांगितलं. नवरा कंप्लीट गोंधळात. त्याला संदर्भच समजत नव्हता. जॅमी नुसता खदाखदा हसत होता. “पण तुला आगच लावायची असेल तर आताच लावून टाकू” या त्याच्या वाक्याने नवरा ताडकन जागा झाला. जॅमीची नईनवेली बायको मात्र “हे चाललंय काय?” मोडमध्ये होती. तसंही जॅमीशी लग्न झाल्यापासून ती कायम याच मोडमध्ये आहे आणि राहील. कारण, जॅमी ही व्यक्तीच तशी आहे.

विषय: 
Subscribe to RSS - लेखनस्पर्धा २०१४