गेल्या तीन वर्षांप्रमाणे यंदाही मायबोलीवर आपण लेखनस्पर्धा आयोजित केली होती. मनोविकास प्रकाशन हे या स्पर्धेचे प्रायोजक होते.
स्पर्धेसाठी दोन विषय होते व एकूण ४८ प्रवेशिका या स्पर्धेत होत्या.
ज्येष्ठ संपादक श्री. संजय आवटे यांनी पहिल्या विषयाचं व श्रीमती सुजाता देशमुख यांनी दुसर्या विषयाचं परीक्षण केलं.
गुणांकन करताना कुठली प्रवेशिका कोणी लिहिली आहे, हे परीक्षकांना माहीत नव्हतं. तसंच शब्दमर्यादेचा नियमही शिथिल करण्यात आला.
बायकोने नोकरी करावी अन नवऱ्याने घर सांभाळावे हे हल्ली हल्ली क्वचित दिसू लागलय. भारतात तर अजूनही दुर्मिळच, पण आपल्या मागच्या पिढीत "हाऊस हजबंड"चा किताब गेसफुली व्हित डिग्नीटी सांभाळणारा माणूस म्हणजे "बाबा"......
विषय-२ : बाई मागच्या बाई—रुक्मिणीबाई
‘कामावरून येताना दोन किलो ज्वारी नक्की आणा, विसरू नका. उद्या बाबा येणार आहेत ना. ते येतील तेव्हा पीठ तयार पाहिजे.’ हा डायलॉग मारणारी व्यक्ती म्हणजे आमच्या घराच्या कणा असलेल्या रुक्मिणीबाई!
क्षमस्व, येथील लिखाण काही कारणास्त्व काढुन टाकले आहे.
'रसिक, विचक्षण, सज्जन, संयमी, आश्वासक, मायाळू, असीम, आनंदकंद, प्रतिभावान, सुगम'....म्हंटले तर शब्दकोशातले शब्द...नाही म्हंटले तर काही नाही! हल्ली जगण्याच्या संज्ञा वेगाने बदलत आहेत आणि शब्दार्थही. किंबहुना जिथे प्रत्येक हृदयातच काहीना काही बोच आहे तिथे नित्य पाझरत असणार्या कडवट, विषादी भावनांमुळे सरळ साध्या शब्दांनाही एक विषारी छटा मिळाली आहे. समूहात राहूनही माणसाचे 'बेट'च नव्हे तर त्या 'बेटावर राहणारा एकटा माणूस' अशी अवस्था झाली आहे. रक्ताच्या नात्यांमध्ये संवाद दुष्कर होऊ लागलेत. सुखाची व्याख्या करणारी वर्तुळे आकसत आकसत जखडणार्या पाशांसारखी संकुचित होत चालली आहेत.
महेश NEWS शब्द कसा तयार झाला ? सांग. आता पाचवीपासुन तुम्हाला इंग्रजी विषय चालू झाला आहे ना मग सांग पाहू. आता नुकताच ABCD शिकून जेमतेम एक वर्ष झालेल्या मला हे कळणे शक्यच नव्हते, आणि तेव्हा गुगल सोडाच पण कॉम्प्युटर, सेलफोन तर नाहीच पण साधा लॅन्डलाईनचा फोन पण नव्हता, म्हणजे फोन ओ फ्रेन्ड ऑप्शन पण नाही अजिबात. ज्यांनी प्रश्न विचारला त्यांनाच साकडे घालायचे आम्ही, मग आमचे विठोबा काका अगदी खुशीत येऊन सांगणार अरे सोपे आहे North, East, West, South मधले सुरूवातीचे अक्षर घ्यायचे की झाला NEWS, बातम्या कशा चोहो बाजुंनी येत असतात. हे असे सांगितले की आम्ही खुश.
'कॅप्टन' ह्या व्यक्तिविशेषणाशी ओळख २००३-०४ च्या दरम्यान कधीतरी झाली. ते ही विश्वेशची त्यांच्या गृपमधे एन्ट्री झाली म्हणून.
गृप म्हणजे ट्रेकींगचा गृप. "चलाहो नवरे, मजा येते" ह्या वाक्याच्या जोरावर आधी विश्वेशची गृपमधे वर्णी लागली. तेव्हा आम्ही नुसते फोटोतच ट्रेकवारी करायचो. सानिका लहान होती. ती ५ वर्षाची झाल्यावर मग परत एकदा तेच वाक्य "चलाहो नवरे, जमेल" आलं. ह्यावेळी ते माझ्यासाठी होतं म्हणून त्या वाक्याचं बोट धरुन आमचही शेपूट त्या गृपमधे जोडलं गेलं आणि मग खऱ्या अर्थाने कॅप्टनची ओळख व्हायला सुरूवात झाली.
२६ मे २०१४, या ऐतिहासीक दिनी नरेंद्र मोदींनी आपल्या देशाचे १५ वे प्रधानमंत्री म्हणुन शपथ ग्रहण केली. आता पुढे काय? "अच्छे दिन" की "बुरे दिन"? पंतप्रधानपद ग्रहण केल्यापासुन मोदी झटुन कामाला लागले आहेत. "अच्छे दिन" चे स्वप्न आता प्रत्यकक्षात कसे उतरावयाचे ह्याचे नियोजनही सुरु झाले असावे, असे संकेत मिळत आहेत. आणि सोबतच "बुरे दिन" येतील की काय अशी शंका यावी, अश्या घटनापण घडलेल्या आहेत. काय विचारताय, कोणते आहेत ते संकेत आणि घटना? चला तर पाहुयात मग आणि विचार करुयात पुढे काय होवु शकेल ह्याचा.