२६ मे २०१४, या ऐतिहासीक दिनी नरेंद्र मोदींनी आपल्या देशाचे १५ वे प्रधानमंत्री म्हणुन शपथ ग्रहण केली. आता पुढे काय? "अच्छे दिन" की "बुरे दिन"? पंतप्रधानपद ग्रहण केल्यापासुन मोदी झटुन कामाला लागले आहेत. "अच्छे दिन" चे स्वप्न आता प्रत्यकक्षात कसे उतरावयाचे ह्याचे नियोजनही सुरु झाले असावे, असे संकेत मिळत आहेत. आणि सोबतच "बुरे दिन" येतील की काय अशी शंका यावी, अश्या घटनापण घडलेल्या आहेत. काय विचारताय, कोणते आहेत ते संकेत आणि घटना? चला तर पाहुयात मग आणि विचार करुयात पुढे काय होवु शकेल ह्याचा.
२०१४ च्या लोकसभेच्या निवडणुकीत दारुण पराभव झालेल्या, बर्याच तथाकथीत राष्ट्रीय पक्षाची मान्यता निवडणुक आयोग काढून घेणार असल्याच समजतय !!
निवडणुक आयोग राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, बहुजन समाज पक्ष आणि भारतीय कम्युनिस्ट पक्ष या सारख्या
पक्षाची राष्ट्रीय मान्यता काढून घेणार आहे. याचा अर्थ येत्या वर्षात निवड णुकीच्या रींगणात फक्त तीन पक्ष
उरतील. ते म्हणजे, भाजप, काँग्रेस आणि सीपीआएम.
महेश आणि रमेश दोघे भाउ - भाउ. महेश लहानपणापासुनच मस्तीखोर तर रमेश शांतवृत्तीचा. महेश चाड्या करायचा खोटे बोलायचा, मिर्चमसाला लावुन इकडच्या गोष्टी तिकडे करायचा. कोणाचे काही गुपीत असेल तर मुद्दामुन सगळ्यांसमोर मोठ्याने सांगायचा. वर मी काही केलेच नाही अश्या निर्विकार चेहर्याने सोसायटीत फिरायचा.
आज लोकसभा २०१४ निवडणूका जाहीर झालेल्या आहेत. ७ एप्रिलपासून निवडणुका घेतल्या जातील. आचारसंहिता लागू झालेली आहे.
निवडणुकासंदर्भामध्ये चर्चा करण्यासाठी हा धागा. या निवडणु़का नरेंद्र मोदी, राहुल गांधी आणि केजरीवाल व्यतिरीक्त अजूनही हजारो लोक लढवत असतील तेव्हा निव्वळ या तिघांनाच सर्व फुटेज देऊ नये ही विनंती.
आपपल्या शहरतील, भागातील उमेदवारांविष्यी अधिक लिहिल्यास उत्तम.
काल तामिळनाडूच्या मंत्रिमंडळाची तातडीची बैठक झाली व त्यात राजीव गांधींच्या सातही मारेकर्यांना सोडण्याचा निर्णय घेण्यात आल्याची बातमी आत्ताच वाचली आणि मनात काही प्रश्न उपस्थित झाले.
१. आपल्या देशाच्या पंतप्रधानाच्या मारेकर्यांना असे मोकळे सोडणे उचित वाटते का?
२. त्यातील ३ आरोपींच्या दयेच्या अर्जावर गेली ११ वर्षे केंद्राने काहीच निकाल दिला नाही म्हणून सर्वोच्च न्यायालयाने त्यांची फाशीची शिक्षा जन्मठेपेत बदलली. केंद्राने एवढा उशीर लावण्यामागे काय कारणे आहेत / असतील?
३. हाच न्याय तामिळनाडू सरकारने बाकी ४ जणांना का लागू केला नाही?
सध्याचं राजकारण : केवळ पैसा आणि प्रसिद्धीसाठीच.....
आपण सध्या घोटाळयांनी वेढलेल्या आणि भ्रष्टाचाराच्या अत्युच्च शिखरावर असलेल्या देशात राहतोय याबद्दल कुणाचंच दुमत नसावं. मला या गोष्टीची खूप लाज वाटतेय आणि खूप निराशाही आलीय की आपण जे आपलं मत देतोय ते मत म्हणजे केवळ या लोकांच्या दहा पिढ्यांचं कल्याण करण्याचीच परवानगी देतोय की काय ! या नेत्यांना आम्हा सामान्य जनतेबाबत काडीचीही आस्था नाही. हे केवळ असच मानत आलेत की आपल्याला भ्रष्टाचार नी घोटाळे करायला अधिकृत परवानगी देणारे(मतदान) हे खुळे लोक.बस्स !!! या व्यतिरिक्त काहीही नाही.
गेल्या २ वर्षात भारतात विक्रमी संख्येनी घोटाळे उघडकीला आले. काही घोटाळे उघडकीला येण्यामागचे कारण म्हणजे विविध पक्षांमधील नेत्यांमधे चाललेली आपापसातली चाललेली लाथाळी तसेच दोन पक्षांमधे चालले राजकारण हे आहे. तर उरलेल्या घोटाळे उघडकीस येण्याचे कारण त्या घोटाळ्यामधे न झाकता येणारा भ्रष्टाचार आहे. हे घोटाळे आधी होत नव्हते असे नाही पण आज एवढा वारेमाप पैसा या आधी भारतात नव्हता. पण त्याहूनही महत्वाची गोष्ट म्हणजे आज इतके बातम्यांच्या चॅनल्सचे पीक आधी आलेले नव्हते.