निवडणूक

निवडणूक

Submitted by Asu on 20 October, 2019 - 06:29

निवडणूक

निवडणूक ही दसरा-दिवाळी
धुळवड शिमगा की होळी?
मुखी कुणा पडे शिरापुरी
कुणा मुखी मीठ भाकरी
पंचवार्षिक सण असे, निःसंशय निर्विवाद
समतावाद मुर्दाबाद, लोकशाही जिंदाबाद

रंग पक्षांचे जरी वेगळे
अंग तयांचे एकच सगळे
कुणी काळे, कुणी गोरे
निवडून येता सगळे बगळे
जनसेवेचा बुरखा घेऊ, जगणे करू आबाद
समतावाद मुर्दाबाद, लोकशाही जिंदाबाद

शब्दखुणा: 

नरेंद्र मोदींचे अभिनंदन!

Submitted by भरत. on 23 May, 2019 - 06:12

लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा स्पष्ट बहुमत मिळवल्याबद्दल नरेंद्र मोदी, भाजप आणि त्यांच्या समर्थकांचे अभिनंदन!

विषय: 
शब्दखुणा: 

'नोटा’ आणि मते !

Submitted by कुमार१ on 19 May, 2019 - 23:10

लेखाच्या शीर्षकातून जो अर्थ ध्वनित होतोय तो या लेखाचा विषय बिलकूल नाही ! ‘नोटा’ या मराठी शब्दाशी आपल्याला इथे काहीही कर्तव्य नाही. इंग्लिश लघुनाम NOTA यावर हा लेख आहे. या लेखात ‘नोटा’ हा जो मतदानाचा एक पर्याय आहे, त्याचा उहापोह करीत आहे. एखाद्या मतदारसंघात उभे असलेल्या उमेदवारांपैकी आपल्याला जर कोणीच पसंत नसेल, तर “वरीलपैकी कोणीही नाही” अर्थात ‘नोटा’ हा पर्याय आपण निवडू शकतो. गेल्या काही वर्षांपासून हा पर्याय भारतात लागू केला गेला. त्याचा वापरही काही मतदार करीत असतात. या विषयावर अनेक माध्यमांत बराच काथ्याकूट झालेला आहे. हा पर्याय योग्य का अयोग्य याबाबत अनेक मतांतरे आहेत.

विषय: 
शब्दखुणा: 

निवडणूक माझा दृष्टिकोन…

Submitted by दत्तात्रय साळुंके on 3 May, 2019 - 12:27

निवडणूक माझा दृष्टिकोन…

कुणीतरी म्हटलय मतदान एक श्रेष्ठ दान आहे. हे कोणीतरी म्हणजे दुसरे तिसरे कोणी नाही तर माझ्यातला एक अगदी किरकोळ मी.

शब्दखुणा: 

महाराष्ट्रातील नगरपालिकांच्या निवडणुका

Submitted by धनि on 28 November, 2016 - 10:47

आजच (२८ नोव्हेंबर २०१६) महाराष्ट्रातील बहुतांश नगरपालिकांच्या निवडणूकांचे निकाल जाहीर झाले. मायबोलीवर सर्व भागातील जनता वावरत असते. महानगरांमधील लोक प्राधान्याने असले तरी इतर गावांमधीलही लोक असतातच. आणि बरेच लोक जे महानगरांमध्ये राहतात त्यांना त्यांच्या मूळ गावात काय चालू आहे याची हालहवाल माहिती असतेच.

निवडणूक

Submitted by अनिकेत भांदककर on 20 October, 2014 - 13:17

आली निवडणूक
वाजला दिंडोरा,
गल्ली-बोळ्यात
नेत्यांचा हिंडोरा.

कुणाला जयभीम
कुणाला राम-राम,
उन्हात फिरून नेत्यांचा
निघतोय घामच-घाम.

जमविली पोर
आणल्या गाड्या,
प्रचारासाठी आता
राल्याच-राल्या.

कुणाला मोबाईल
कुणाला देशी,
निवडणुकीच्या दिवसात
नाहीच राहत कुणी उपाशी.

पिंजून होतोय वार्ड
गल्यापण सुटत नाही,
निवडणूक झाल्यावर नेता
कुणालाच दिसत नाही.

कधी वाटतोय नोटा
कधी वाटतोय साडी,
नेता आपल्या जनतेची
अचूक पकडतो नाडी.

मोठे- मोठे दावे
अन आश्वासनांची खैरात,
विजयी झाल्यावर मग
संपूर्ण गावभर वरात.

जाती-धर्माचे दाखले
देऊन ठेवतो अचूक बोट,

आठवणीतील निवडणूक प्रचार घोषणा ...

Submitted by ऋन्मेऽऽष on 16 October, 2014 - 13:31

नव्वदीचे मजेशीर दशक .........

ताई माई अक्का,
विचार करा पक्का ..
आणि हातावर मारा शिक्का !

विळा हातोडा तारा, यावर शिक्का मारा !

लक्षात ठेवा,
आमची निशाणी
धनुष्यबाण .. धनुष्यबाण .. धनुष्यबाण

अरे हा आवाऽऽज कोणाचा
....... शिवसेनेचा !

एक जलेबी तेल मे
अमुक तमुक जेल मे ..

गली गली मे शोर है
अमुक तमुक चोर है ..

..
..

विषय: 

निवडणूक २०१४ - मतमोजणी - निकाल

Submitted by महेश on 15 May, 2014 - 23:31

१६ मे २०१४ रोजी भारतीय वेळेनुसार सकाळी ८:०० वाजता मतमोजणीस सुरूवात झाली.
सुरूवातीला भाजप आणि मित्रपक्ष यांना मिळालेल्या जागा ५०% पे़क्षा कमी दिसत होत्या.
१०० जागांच्या निकालानंतर हलके हलके हे प्रमाण वाढण्यास सुरूवात झाली असुन,
आत्ता हा लेख लिहित आहे तोपर्यंत ३०० जागांबद्दल कळाले आहे.

भाजप आणि मित्रपक्ष - १६६
काँग्रेस आणि मित्रपक्ष -६२
तिसरी आघाडी - ७२

भाजप सद्ध्या तरी ५५% पेक्षा जास्त आघाडीवर आहे.
अजुन काही काळाने पुर्ण निकाल कळू शकेल.

नरेन्द्र मोदी यांचा वाराणसी आणि बडोदा या दोन्ही ठिकाणी विजय
लालकृष्ण आडवानी यांचा गांधीनगरमधे विजय
सुषमा स्वराज यांचा विदिशामधे विजय

लोकसभा निवडणुका २०१४

Submitted by नंदिनी on 5 March, 2014 - 00:50

आज लोकसभा २०१४ निवडणूका जाहीर झालेल्या आहेत. ७ एप्रिलपासून निवडणुका घेतल्या जातील. आचारसंहिता लागू झालेली आहे.

निवडणुकासंदर्भामध्ये चर्चा करण्यासाठी हा धागा. या निवडणु़का नरेंद्र मोदी, राहुल गांधी आणि केजरीवाल व्यतिरीक्त अजूनही हजारो लोक लढवत असतील तेव्हा निव्वळ या तिघांनाच सर्व फुटेज देऊ नये ही विनंती.

आपपल्या शहरतील, भागातील उमेदवारांविष्यी अधिक लिहिल्यास उत्तम.

Pages

Subscribe to RSS - निवडणूक