हट्टीपणाचे फळ

Submitted by किशोरडी on 8 May, 2014 - 06:50

महेश आणि रमेश दोघे भाउ - भाउ. महेश लहानपणापासुनच मस्तीखोर तर रमेश शांतवृत्तीचा. महेश चाड्या करायचा खोटे बोलायचा, मिर्चमसाला लावुन इकडच्या गोष्टी तिकडे करायचा. कोणाचे काही गुपीत असेल तर मुद्दामुन सगळ्यांसमोर मोठ्याने सांगायचा. वर मी काही केलेच नाही अश्या निर्विकार चेहर्‍याने सोसायटीत फिरायचा.
महेश मोठा रमेश पेक्षा. आधी त्याचे आई-वडीलांनी फार लाड करुन ठेवलेले. त्यामुळे महेश हट्टी होत गेला. कुणाचे ही ऐकत नसे. जेव्हा रमेश जन्माला आला तेव्हा आधी चांगला वागायचा पण नंतर नंतर रमेशला येता जाता टोमणे मारणे, हळुच चिमटा काढुन रडवणे , असे करायला लागायचा. शाळेत सुध्दा असेच वागणे असायचे शिक्षक त्याची तक्रार करुन करुन कंटाळालेले होते. आई बाबा दोघे नोकरीला असल्याने घरात आजोबा जवळ असायचे रमेश ला आई माहेरी ठेवुन मग कामाला जायची. घरात दोघे असले की रडारड गोंधळात जास्त भर पडत होती. म्हणुन आजोबांकडे महेश ला ठेवायचे.

आजोबा त्याचे फार लाड सुरुवातीला करत होते. येणार्या प्रत्येक तक्रारीला आई वडीलांजवळ पोहचु देत नसत. त्यामुळे महेश आजोबांचा फायदा उचलायला सुरुवात केलेली. सोसायटी मधे दंगा मस्ती केली आणि कोणी हटकले तर बिंधास्त उलट उत्तर द्यायचा आणि म्हणायचा " जा , जा आजोबांकडे तक्रार कर. मी नाही घाबरत कुणाला"
हळु हळु आजोंबाना डोईजड महेश होउ लागला. त्याच्या कर्तुत्वामधे आजोबांचाच हात आहे हे हळु आवाजात सोसायटीत कुजबुज होउ लागली. सकाळी प्रभातफेरी मारताना समवयस्कर लोक आजोबांना टाळु लागली. फटकार्याने उत्तर देउ लागलीत. आजोबांना देखील याची चांगलीच जाणीव झाली. त्यांना आपली चुकी कळुन आली परंतु उशीर फार झालेला.
महेश आता त्यांच्या हाताबाहेर गेलेला. कधी कधी त्यांनाच सगळ्यांसमोर उलट उत्तरे द्यायला लागला. आजोबा आता हताश झालेले. हळु हळु ते आपल्यामुला समोर नातवाचा विरोध करु लागले. जे चुक होते ते चुक आहे सांगायला लागले. परंतु त्यांचे ऐकणार कोण.? आधी महेश च्या चुका लपवल्यामुळे आता महेश चे आईवडील देखील त्यांच्याकडे दुर्लक्ष करायला लागले.

अशातच एकदा परिक्षे आधी मुलांना थोडे फिरुन आणुया म्हणुन महेश आणि रमेश ला आई वडील बाहेर जत्रेत फिरायला घेउन गेले. तिथे मेरी-गो-राउंड, रेल्वेगाडी, जायंटव्हील , मिनी जायंट व्हील, कार्स सारखे खेळ होते. रमेश आणि महेश दोघे आपापल्या आवडीच्या खेळामधे खेळ्ण्यात रंगुन गेले. आई वडीलांचे लक्ष दोघांवर होते. पण मस्ती महेश जास्त करत होता.राउंड मधे फिरत्या घोड्यावर बसण्याऐवजी उभे राहणे , वेडीवाकडी कार चालवणे, मुद्दामुन त्याची टक्कर दुसर्याला देणे सारखे प्रकार करणे रंगात आलेले. अचानक मधे घोड्यावर उभे राहत असताना महेश चा तोल गेला आणि तो खाली पडला. आई वडील दोघे धावत गेले. त्याला उचलुन हॉस्पिटल मधे दाखल केले. महेश चे उजव्या हाताचे फ्रॅक्चर झालेले. किमान ३ आठवडे तरी त्याला लिहिता येणार नव्हते. शेजारपाजाराचे लोक दोष आई वडीलांनाच देउ लागले. पोराला सांभाळता येत नाही वगैरे वगैरे. परंतु त्यांना कुठे माहीत होते की महेश ने स्वतः मस्ती करुन हात फ्रॅक्चर करुन घेतलेला. वडीलांनी शाळेत अर्ज केलेला होता. शाळेचे मुख्याध्यापक आजोबांचे बालसवंगडी असल्याने महेश ला घरी पेपर देण्याची मुभा मिळाली. आता घरीच पेपर लिहायचा आहे तर महेश मनोसोक्त कॉपी केली आणि परिक्षेत पास झाला. तिकडे रमेश कमी मार्काने पास झालेला होता.

महेश रोज येताजाता त्याला कमी मार्क मिळाले म्हणुन चिडवायचा. पण रमेश ने कधी उलट उत्तर दिले नाही की तु घरात बसुन कॉपी करुन जास्त मार्क मिळवलेस. महेश ला स्वतःवर जास्त गर्व होता. येता जाता मित्रांना फुशारक्या मारत होता. बघा मी कसा जास्त अभ्यास करतो . माझे मार्क बघा. आहेत का माझ्यापेक्षा जास्त . अश्या थापा सोसायटीत मारत होता. हळु हळु त्याचे मित्र त्याच्यापासुन लांब होत चाललेले. आजोबांनी त्याला फार समजावले परंतु तो मानला नाही. काही दिवसांनी हात व्यवस्थीत झाला.

एकदा बोलता बोलता महेश रमेश ला आपल्या अपघाता विषयी बोलला.
"रमेश तु फुकट मेहनत करतोस मला बघ परिक्षेत कसे छान मार्क मिळाले"
"दादा, तु घरात बसुन पेपर लिहिलास मी शाळेत बसुन"
" मग काय झाले, तुला काय वाटले मी घरात बसुन कॉपी केली ?"
"मी कुठे बघायला आलेलो?"
" आणि जर केली असेल तर कुणाच्या बापाला घाबरत नाही, पकडुन दाखवा, सिध्द करुन दाखवा मग बोला"
"दादा तु आपल्या रुम मधे होतास शिक्षक आजोबांशी बोलत होते. आणि तुला जे मार्क मिळाले ते तुझ्या आधी वर्षाच्या मार्कांपेक्षा कितीतरीपटीने जास्त आहे.?
"हा मग त्यात काय?"
" सहामहिन्यात इतकी प्रगती ? शक्य आहे काय?"
" हे बघ रमेश मी कॉपी केली . पण तु सिध्द करु शकतोस का ? नाही ना मग शांत बस."
" अश्याने तुझेच नुकसान आहे ही तर सहामाही होती वार्षिक परिक्षेत काय करणार तु?"
" काय नुकसान वगैरे होत नाही. वार्षिक परिक्षेत दुसरी शक्कल लढवु"
"म्हणजे"
" अरे येड्या, मी काय अचानक नाही पडलो. मुद्दामुन पडलो हातावर, मला माहीत होते की हात फ्रॅक्चर होणारच"
"पण तुला दुखले असेल ना इतकी रिक्स का ?"
"मर्द को दर्द नही होता प्यारे, आणि रिक्स तर घ्यायचीच होती. नाहीतर परिक्षेत पास झालोच नसतो, अभ्यास कुठे झालेला माझा"
" मग हे तु मुद्दामुन केलेस? आई बाबा किती काळजीत होते"
" अरे याला म्हणतात थोडी रिक्स आणि जास्त सहानभुती" माझे काय नुकसान झाले फक्त हात थोडासा फ्रॅक्चर झाला बस पण आई बाबांची मित्रांची सहानभुती मिळाली. मला परिक्षेला घरात बसायला मिळाले कॉपी करायला मिळाली , आरामात पास झालो मी ." कुछ पाने के लिये कुछ खोना पडता है."
" मह्णजे तु वार्षिक परिक्षेत सुध्दा असेच काहीतरी उपद्व्याप करनार का ?"
"म्हणजे काय नक्कीच" मला परिक्षा काहीही करुन पास करायचीच आहे. त्यासाठी मी काहीही मार्ग पत्करेन"

रमेश ला आश्चर्याचा मोठा धक्का बसलेला. महेश मुद्दामुन सगळे करत होता. आणि बोलणी आई वडीलांना बसलेली सोसायटीची नातेवाईकांची . रमेश ने हा प्रकार परत घडु नये हा निश्चय केला.
काही दिवसांनी त्याने आईला ही सगळी गोष्ट सांगितली. आईला सुध्दा आश्चर्याचा धक्का बसला. आपला मुलगा परिक्षेत पास होण्यासाठी असे काही अघटीत करुन घेईल याची कल्पना देखील नव्हती. परंतु महेश ला सरळ तोंडावर विचारल्यावर तो दुसरे काहीतरी करायची शक्यता होती म्हणुन आई ने आपल्याला महेश ची योजना कळाली आहे हे दाखवले नाही. सर्व प्रकार वडीलांच्या कानावर घातला.

दिवस जात होते . वार्षिक परिक्षा जवळ येत होती. महेश ला असे काही करायची हुक्की आलेली. तो सारखा बाबांच्या मागे फिरायला जाउया म्हणुन मागे लागलेला . आईला संशय आलेला पण हा काय करतोय हे बघायचे होते म्हणुन आई बाबा नी फिरायला जायचे म्हणुन ठरवले. महेश आणि रमेश दोघांना घेउन ते जत्रेत आले. महेश ला बाबांनी ताकिद देउन ठेवलेली मागच्या वेळे सारखी मस्ती करायची नाही. महेश ने सुध्दा सुरुवातीला लहान रेल्वेगाडीत बसणे, कार चालवणे, घसरगुंडीवरुन खाली येणे सारखे खेळ खेळायला सुरुवात केली. रमेश बिचारा आईने सांगितल्या प्रमाने शांतपणे इतरखेळ खेळु लागला.

रमेश मेरी-गो-राउंड मधे घोड्यावर शांतपणे बसुन खेळाण्याचा आनंद घेउ लागला. महेश घसरगुंडीवर मस्ती करायला सुरुवात केलेली परंतु त्याच्या मनाप्रमाने गोष्टी घडत नव्हत्या . निघायचा वेळ जवळ जवळ येत होता संध्याकाळ होत होती. आजच्या दिवशी त्याला काहीतरी करायचेच होते उद्यापासुन घराबाहेर पडणे बंद होणार होते. अभ्यास नेहमी प्रमाणे झाला नव्हता.

तितक्यात महेश ने रमेश मेरी-गो-राउंड वर बसलेला बघितला. मनात आनंदाच्या उकळ्या फुटु लागल्या. रमेश ला बसवले तर मला देखील बसवतीलच. मग मला शेवटच्या दिवशी इस्पित साध्य करुन घेता येईल मी परिक्षते पास होईल. महेश धावतच रमेश जवळ गेला आणि मला सुध्दा बसु दे म्हणायला लागला. वडीलांना संशय आला त्यांनी सरळ नाही म्हणुन सांगितले. महेश हट्टाला पेटला. सगळ्यांसमोर रडायला लागला.

"बाबा मला पण घोड्यावर बसायचे आहे"
"नाही, मागच्या वेळेला तु यावरुनच पडलेला आहेस, उद्यापासुन परिक्षा सुरु होणार आहे. त्यामुळे अजिबात नाही"
"नाही मला बसायचेच आहे."
"अजिबात नाही. सांगितलेले कळत नाही."
"नाही. तो कसा बसला ????"
" तो शांतपणे बसला आहे तुझ्यासारखा मस्ती करत नाही"
" मी पण नाही करणार"
" नाही म्हणजे नाही. बाकीच्या ४ खेळ खेळायला जा"
"नाही मला ते ४ खेळ नाही हाच खेळ खेळायचा आहे"
" मागच्यावेळेच्या अनुभवावरुन अजिबात तुला खेळायला देणार नाही. तुझ्यामुळे इतर मुलांना देखील त्रास होतो. आम्हाला देखील बोलण्या बसल्या आहेत आजोबांच्या नातेवाईकांच्या"
" रमेश ला बसवले मला नाही तुम्ही आमच्या दोघांमधे भेदभाव्व करत आहेत"
"तुला जे वाटेल ते वाटुन घे. तुला नाही म्हणजे नाहीच"

आपले इस्पित साध्य होत नाही कळल्यावर महेश ने रस्त्यातच बसकन मारली आणि भोकाड पसरायला सुरुवात केली.
"भ्याआआआअ. तुम्ही रमेश चेच लाड करतात माझे नाही. त्यालाच घोड्यावर बसवतात मला नाही"
माझ्याबरोबरच तुमचा दुजभाव होत आहे. मी काय सावत्र आहे काय?
आई-मुलगा मला खेळायला देत नाही. "

त्याचे रडणे ऐकुन आजुबाजुचे सुध्दा लोक जमा होउ लागली. पण त्यातले बरेच जण महेश च्या मस्तीखोर स्वभावाला आणि त्याच्या हट्टीपणाला चांगलेच ओळखुन असल्यामुळे महेशला सांत्वना मिळण्याऐवजी त्याचे जाहीर हसेच होउ लागले. शेवटी त्याला आपले रड्णे थांबवुन चुपचाप घरी परतावे लागले. घरी जाताना सगळेच त्याच्याकडे बघुन हसत होते.

अभ्यास नीट केला नसल्याने शेवटी महेश परिक्षेत नापास झाला.

घडामोडींवर आधारीत Wink

कोणीही कुणाच्याही बाबतीत संदर्भ जोडुन पाहिल्यास लेखक जवाबदार नाही Biggrin

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रिया,

दोन ओरिजिनल आय डी तात्विक चर्चा करताना आपल्यासारख्या ड्यु आय डीं नी मधे पडू नये.