Submitted by मामी on 5 April, 2013 - 01:25
लहानपणी आपल्याला सगळ्यात पहिले भेटतात ते काऊ, चिऊ, माऊ आणि भुभु. मग विठुविठु पोपट येतो. 'साळुंकी साळकी, तुझी माझी पालखी' करत साळुंकी येते. रामाच्या देवळाला पाच फेर्या मारणारी घार भेटते. ससा, कासव भेटतात ...... हळूहळू हे संग्रहालय वाढायला लागतं.
पण या कोणाला अजून खास नावं आलेली नसतात. टिप्या, मोती अशी जेनेरिक नावं असली तरी त्यांना खास व्यक्तिमत्त्व आलेलं नसतं.
पण मग पुढच्या आयुष्यात एकसेएक सुप्रसिद्ध प्राणी-पक्षी भेटू लागतात. त्यांचं खास वैशिष्ट्य असतं, त्यांना व्यक्तिमत्व असतं आणि/किंवा त्यांनी एखादी लक्षात राहणारी भुमिका तरी बजावलेली असते.
खर्याखुर्या जीवनात किंवा गोष्टींच्या / सिनेमांच्याद्वारे सुप्रसिद्ध झालेल्या पशु-पक्ष्यांबद्दलची माहिती इथे एकत्र करूयात का? वाचताना खूप मजा येईल.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कुत्रा माणसाचा मित्र म्हणून
कुत्रा माणसाचा मित्र म्हणून सगळ्यात जास्त प्रसिद्ध प्राणी कुत्रेच असतील.
शिवाजी महाराजांचा वाघ्या कुत्रा, सरमा कुत्री, टिनटिनचा स्नोई, बास्करविलेचा भयानक हाऊंड, अॅस्टेरिक्समधला डॉगमॅट्रिक्स असे कितीतरी प्रसिद्ध कुत्रे आहेत. अजून आठवा.
चेतक घोडा
चेतक घोडा![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
माबोवर १/२ श्वानजमातीतले
माबोवर १/२ श्वानजमातीतले जगप्रसिद्ध(?) महाभाग आहेत!
सोनाली - सिंहीण - डॉ.
सोनाली - सिंहीण - डॉ. पुर्णपात्रे
माबोवर १/२ श्वानजमातीतले
माबोवर १/२ श्वानजमातीतले जगप्रसिद्ध(?) महाभाग आहेत!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
>>> कुत्रेही माबोसदस्य आहेत की काय???
विझार्ड ऑफ आझ मधल्या डोरोथीचा
विझार्ड ऑफ आझ मधल्या डोरोथीचा टोटो कुत्रा.
मुंबई पोलिसांचा हिरो...
मुंबई पोलिसांचा हिरो... 'जंजिर' कुत्रा काही दिवसां पुर्वीच गेला. १९९२च्या स्फोट मालिकेतील स्फोटकं शोधून काढण्याची त्याची कामगीरी अतुलनीय होती.
रामायणातला जटायू - गिधाड. हे
रामायणातला जटायू - गिधाड. हे एकमेव सुप्रसिद्ध गिधाड असावं.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
शोलेतली धन्नो! दूरदर्शनवर एका
शोलेतली धन्नो!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
दूरदर्शनवर एका तारकेला (अर्ध्या हळ्कुंडाने पिवळ्या झालेल्या) विचारले की तुला संधी मिळाली तर कुठली भूमिका करायला आवडेल? तर बाईसाहेबांनी 'धन्नो' असे सांगितले. मग मुलाखत कर्त्याने धन्नो ही घोडी आहे असे लक्षात आणून दिले.
पण आरडीची अफलातून कल्पना, त्या कल्पनेबरहुकुम वाजलेला सामताप्रसादजींचा तबला आणि त्या उमद्या जनावराचे सुसाट धावणे ह्या तीन गोष्टी एकत्र केल्या की जे पात्र बनते त्याचे नाव धन्नो.
हम आपके है मधला टफी अजूबा
हम आपके है मधला टफी
अजूबा मधले गरुड
तेरी मेहेरबानिया मधला कुत्रा ही काही चटकन आठवलेली ऊदाहरणे
हॅरी पॉटरमध्ये तर अनेक
हॅरी पॉटरमध्ये तर अनेक सापडतील. हॅपॉ फॅन्स कुठे गेले सगळे?
तर बाईसाहेबांनी 'धन्नो' असे
तर बाईसाहेबांनी 'धन्नो' असे सांगितले. > :d
दूरदर्शनवर एका तारकेला
दूरदर्शनवर एका तारकेला (अर्ध्या हळ्कुंडाने पिवळ्या झालेल्या) विचारले की तुला संधी मिळाली तर कुठली भूमिका करायला आवडेल? तर बाईसाहेबांनी 'धन्नो' असे सांगितले. मग मुलाखत कर्त्याने धन्नो ही घोडी आहे असे लक्षात आणून दिले. >>> खरं की काय? कोण होती ती महान स्त्री?![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
हाथी मेरे साथी मधला रामु
हाथी मेरे साथी मधला रामु (हत्ती) माय फेव.
आणि तेरी मेहेरबानिया मधला मोती (कुत्रा).
मीही अनेक जातीचे खुप कुत्रे पाळले आहे. राणी, राजा, दामिनी ( एका मराठी मालेकेवरुन इनस्पायरड होवुन ठेवलेले नाव.) आणि शेवटी जॅकी. तो एका डॉबरमॅन होता जॅकी. ही वॉज सो क्युट लाईक एनिथींग. जॅकी हा त्याच्या जन्मानंतर आठवड्या भराने आमच्या घरी आणण्यात आला. त्याला मी कापसाच्या बोळ्याने आणि बॉटलने दुध पाजलं आहे.
त्याचा अपघात झाला आणि मी कुत्रे पाळणे सोडुन देले.
अलिबागला ट्रेनच्यामध्ये आला आणि बरोबरोबर दोन ट्रॅकच्या मध्ये झोपला एक खरचट्ल्याचा निशाणा आला नाही त्याला पण त्याचा हार्ट फेल झाला. लोकांना वाटले कुत्र्याचा कधी हार्ट फेल होतो का ? पण मी माझ्या हातानी त्याला पुरल आहे. तेव्हा माझं मन मलाच माहीती कीती कातरलं होतं.
धन्स मामी तुमचा हा विषय वाचुन माझ्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या.
पु.ले.शु.
जग्गू बंदर, मस्त कलंदर सध्या
जग्गू बंदर, मस्त कलंदर
सध्या बाळगोपाळांमधे तूफान प्रिय असलेल्या "छोटा भीम" मधले हे माकडही तितकेच गाजत आहे.
हॅरी पोटरचे घुबड -
हॅरी पोटरचे घुबड - हेडविग
रॉनचा उंदीर - स्क्रॅबर(?)
"भालू" सिनेमा पाहिला तेव्हा
"भालू" सिनेमा पाहिला तेव्हा ११ वर्षांचा असेन. एखादा कुत्रा इतके काही करतो ही त्यावेळी फार आश्चर्याची गोष्ट वाटली होती.
जंगलबुक मधले मोगलीचे साथीदार-
जंगलबुक मधले मोगलीचे साथीदार- बगीरा, का, भालु, अकडु, पकडु आणि शेरखान, तबाकी इ.
आणि हर्मायोनीचा बोका -
आणि हर्मायोनीचा बोका - क्रूकशँक
हनुमान, वाली, सुग्रीव, अंगद,
हनुमान, वाली, सुग्रीव, अंगद, जटायू, जांबुवंत, सोनेरी हरीण ऊर्फ मारिच
(संदर्भ - रामानंद सागर यांचे रामायण. 'ते माकडछाप/अस्वलछाप झेंडे असलेले आदिवासी होते' वगैरे वाद घालत बसणार्यांसाठी स्पष्ट करत आहे.)
तक्षक, वासुकी, उलुपी
(पोपटाचा डोळा फोडायला सांगितल्यावर जेव्हा कौरव-पांडव जनतेने डोळा सोडून इतर सगळे फोडले, तेव्हा द्रोणाचार्यांनी वैतागून 'एवढे साधे येत नाही, माणसे आहात की डुक्कर!' असे शिष्यांना झापले होते असे ऐकीवात आहे. त्यांना फेमस प्राणी म्हणून घ्यावे का नाही हा अभ्यासाचा प्रश्न आहे.)
समस्त नवरे मंडळी (कधी ना कधी तरी बायकोने 'काय बाई शर्थ झाली! एक काम सांगितलं तर धड करता येत नाही, माणूस आहे की....' असे नवर्याला ऐकवले असतेच असे ऐकीवात आहे. अगदी अरण्यात यक्षप्रश्नाची उत्तरे देता न आल्याने चार नवरे गायब झाले, तेव्हा द्रौपदीने हेच वाक्य युधिष्ठिराला ऐकवून वर 'जा हो, तुम्हीच बघून या आता' असा आदेश दिल्याचे उल्लेख आहेत म्हणे. असो.)
हॅग्रिडकडचे प्राणी - बकबीक
हॅग्रिडकडचे प्राणी - बकबीक आणि ते ड्रॅगनचे पिल्लू ज्याच्या अंड्याच्याबदल्यात तो तीन तोंडी कुत्र्याचे रहस्य सांगतो. त्याचे तो बारसंपण करतो पण नाव नाही आठवत आता.
गारफिल्ड
गारफिल्ड
नाग नागिण म्हटले की हिंदी
नाग नागिण म्हटले की हिंदी सिनेमातले इच्छाधारी नाग व ते मेल्यावर बदला घेणार्या नागिणी
लासी कम होम मधली लासी...
लासी कम होम मधली लासी...
मामी, आता नाव नाही आठवत त्या
मामी, आता नाव नाही आठवत त्या बाईचे. तशीही एक / दोन चित्रपटातच येऊन गेली होती ती.
लासी कम होम मधली लासी >> अगदी. तिचे ते सोनेरी रेशमी केस..... आजकालच्या सगळ्या शँपूच्या मॉडेल्सपेक्षा पण भारी होते ते.
8 below मधले सगळे कुत्रे पण अविस्मरणीय आहेत. पण त्यांना नावं नाहीयेत ना?
Free willy मधला व्हेल.
Andre मधला सील हे अजून काही आवडते.
स्टुअर्ट लिटील मधला स्टुअर्ट
स्टुअर्ट लिटील मधला स्टुअर्ट उंदीर आणि सगळीच्या सगळी मांजरे.. एकाचे नाव स्नोबेल होते वाटते.
'काल' मधले वाघ, रेखाच्या 'खुन
'काल' मधले वाघ, रेखाच्या 'खुन भरी मांग' मधील घोडा, 'मैने प्यार किया' मधलं कबुतर, दिल्ली ६ मधील 'मसकली' !![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
एट बिलो मधल्या सगळ्या
एट बिलो मधल्या सगळ्या कुत्र्यांना नावं आहेत. कसले मस्त कुत्रे आहेत ते.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
विकीकाकांकडून साभार :
In Eight Below there are three Alaskan Malamutes (Buck, Maya and Shadow) and five Siberian Huskies (Max, Truman, Dewey, Shorty, and Old Jack).
रामायणातील खार.. (खारीचा
रामायणातील खार.. (खारीचा वाटा)
कृष्ण-कालियामर्दन वाला कालिया
कृष्ण-कालियामर्दन वाला कालिया नाग![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
Pages